राफेल

एखाद्या गोष्टीबाबत सजग असणं माहितीगार असणं जाणकार असणं आणि त्या विषयात तज्ञ असणं ह्यात फरक असतो केवळ माहितीच्या जीवावर जाणकार आणि तज्ञ समजणाऱ्या लोकांची फेसबुकवरील संख्या अभूतपूर्व आहे जो उठतो तो नाक्यावर उभा असल्यासारखा कंमेंट करतो परिणामी जे तज्ञ आहेत त्यांच्या पोस्ट मिळवणे दुरापास्त होत चालले आहे मला जर राफेल डील बाबत सजग व्हायचं असेल तर मी संरक्षण क्षेत्रात आणि विमान उत्पादनात काम केलेल्या लोकांच्याकडून ज्ञान मिळवीन राजकारणी आणि पत्रकार लोकांना आपण प्रत्येक विषयात तज्ञ आहोत असं नाटक करावं लागत अशी लोकशाहीमुळे ह्या लोकांची समजूत झालेली दिसते मला अद्याप असा राजकारणी वा पत्रकार भेटायचा आहे जो प्रामाणिकपणे म्हणेल मला ह्या विषयातलं काहीही कळत नाही एव्हढं नॉलेज नसतं रे बाबांनो एका व्यक्तीला ! निदान मला तरी ९९. ९९९९९९% विषयातलं शष्प  पण कळत नाही त्यामुळं प्रतीक्रिया देणार कशा ? मै मेरी औकातमे रहना चाहता हूँ रहने दो ना भाई !
श्रीधर तिळवे नाईक

मुख्य मुद्दा वेगळाच आहे राफेल हे एक उदाहरण आहे राजकारणी व पत्रकारांना तज्ञतेचं नाटक करावं लागतं हे मान्यच आहे पण मी ना राजकारणी आहे ना पत्रकार मग मी रिऍक्शन का द्यावी तीही एखाद्या तज्ञ माणसासारखी ! अज्ञान मान्य करण्याची कुणाचीही इथे तयारी नसते सगळे सगळ्या विषयातील स्पेशॅलिस्ट असल्यासारखे बोलत असतात बोला तुमचे तेही स्वातंत्र्य मला मान्य आहे मला फक्त त्यात खेचू नका कारण मला माझे अज्ञान स्पष्ट दिसत असते राफेलची जडणघडण समजून घेतानाच माझ्या अकलेचं दिवाळं निघालं आणि समोरच्या माझ्या मित्राला मी स्पष्ट सांगितलं कि हे माझ्या डोक्यावरून जातंय तो कॉस्ट का ज्यादा ह्याच स्पष्टीकरण विमानाच्या संरचनेच्या आधारे देत होता आता हे जर मला समजत नसेल तर मी स्वतःला तज्ञ समजू नये भारतीय लोक सर्वात ज्ञानी असतात म्हणूनच ते इतके पुढे गेलेत ज्या समाजाला स्वतःची लायकी कळत नाही तो आपली लायकी वाढवू शकत नाही तो फक्त पुष्पक विमाने उडवत राहतो आणि राफेल विमानं आयात करत राहतो अहंकार ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे दुर्देवाने हे अहंकारी माणसाला कळत नाही असो 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट