गांधी shridhar tilve

गांधी सर्वात प्रथम मुमुक्षु होते मोक्ष हा केवळ त्यांचा ध्यास न्हवता तर श्वास होता गांधी वैष्णव होते आणि सर्वच वैष्णवांच्याप्रमाणे गीता हा त्यांचा मुख्य धर्मग्रंथ होता ह्या धर्मग्रंथानुसार  गांधी वैश्य होते वर्णव्यवस्थेच्या मध्यभागी होते आणि त्यांना वर्णव्यवस्था व आश्रमव्यवस्था मान्य होती गीतेनुसार राजयोग , ज्ञानयोग , भक्तियोग आणि कर्मयोग हे मोक्षाचे चार मार्ग आहेत गांधींनी त्यांच्या कलानुसार कर्मयोग निवडला कर्मयोग्याला सत्य , अहिंसा , अपरिग्रह , अचौर्य आणि ब्रम्हचर्य ह्या पाच यमाचे व स्वच्छता वैग्रे नियमांचे पालन करणे अत्यावश्यक गांधींनी हे करून दाखवलं ज्ञानयोगी आणि कर्मयोगी ह्यांना आश्रम काढणे आवश्यक गांधींनी आश्रम काढला

गांधींनी हे सर्व केलं म्हणून ते मोठे नाही झाले तर ह्यापुढे जाऊन त्यांनी जे केलं ते महत्वाचे


गांधींचा मोठेपणा त्यांच्या मुमुक्षु असण्यात नाही तर त्या मुमुक्षुपणाला भारतीय स्वातंत्र्याशी जोडण्यात आहे मुमुक्षु होण्याची पहिली अट स्वातंत्र्य आहे ते नसेल तर तुम्ही मोक्षाची साधना करूच शकत नाही जर एखाद्या राजाने तुम्हाला ठारच मारायचे ठरवले तर तुम्ही साधना करणार कशी ? म्हणजेच तुम्हाला मला जिवंत राहण्याचं स्वातंत्र्य आहे हे ठणकवण्याची वेळ येतेच मग तुमच्यावर आणि जर एखादा राज्यकर्ता माझं जिवंत राहण्याचंच स्वातंत्र्य आपल्या मस्तीत अमान्य करत असेल तर त्याला हे सांगावंच लागत कि बाबा मला हे स्वातंत्र्य तू दिलेलं नाही ते निसर्गानं वा देवानं दिलेलं आहे तेव्हा ही झुंडशाही थांबव

गांधींचं मोठेपण त्यांच्या वैष्णव असण्यात नाही तर सगळ्या वैष्णवांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायला लावण्यात आहे संतांच्या नादाला लागून जे वैष्णव फक्त टाळ कुटत बसले होते आरत्या करत बसले होते त्यांना गांधीजींनी घराबाहेर काढून सार्वजनिक कृती करायला लावलं हे करतांना मार्ग संतांचाच निवडला म्हणजे इंग्रजांना मंबाजी मानले आणि त्यांच्या हृदय परिवर्तनासाठी प्रयत्न केले

गांधीजी गीतेत थांबले नाहीत त्यांनी ती गीता सार्वजनिक जीवनात आणली महाभारतात पांडव कौरवांना मदत करतात तशी मदत त्यांनी इंग्रजांनाही केली पण कौरव सुधारावेत म्हणून कृष्णाप्रमाणे ते प्रयत्न करत राहिले आणि मग कुरुक्षेत्र अटळ झाले तेव्हा १९४२ साली त्यांनी भारत छोडो ची घोषणा दिली कुरुक्षेत्रावर हिंसा अटळ असते त्यामुळेच १९४२ ला हिंसेच्या घटना घडल्या तेव्हा त्यांनी एरव्ही माघार घेण्याचे धोरण बदलून हिंसेकडे कानाडोळा केला कारण हे डू ऑर डाय वाले युद्ध आहे ह्याची त्यांना कल्पना होती

हळूहळू त्यांच्या हेही लक्ष्यात यायला लागलं कि वर्णव्यवस्था चुकीची आहे जातीव्यवस्था चुकीची आहे आणि मग ते ह्याबाबतही क्रांतिकारक झाले सुरवातीला वर्णव्यवस्था टिकली पाहिजे म्हणणारे गांधी मी ह्यापुढे फक्त आंतरजातीय लग्नच अटेंड करणार अशी शपथ घेऊन बसले आणि ही शपथ त्यांनी आचरणातही उतरवली गांधींचं मोठेपण ह्या आत्मपरिवर्तनात आहे

गांधी वैश्य होते पण ते तिथेच थांबले नाहीत गिऱ्हाईकाशी कसं वागायचं आणि ग्राहकसेवा सेवा म्हणूनच कशी करायची त्याचे धडे त्यांनी दिले उद्योगपतींना त्यांनी समाजाचे ट्रस्टी बनवले आणि त्यांचा फायदा सामाजिक बनवला त्यांच्यामुळेच टाटा बजाज आणि बिर्ला सारखे उद्योगपती सामाजिक उत्तरदायित्व मानू लागले

गांधी कर्मयोगी होते पण ते तिथंच थांबले नाहीत त्यांनी भारतीयांना कर्माबाबत समता आणि आदर शिकवला भंगीकाम आणि वकिली ही दोन्ही सारखीच तुल्यबळ कामे आहेत हे त्यांनी दाखवले तेही स्वतः ही दोन्ही कामं करून त्यांनी विणकरकाम सुतारकाम वैगरे कामं स्वतः करून सर्व ओबीसी कामांना प्रतिष्ठा दिली आणि त्यांच्याकडे आलेल्या क्षत्रिय आणि ब्राम्हणांनाही ही कामे करायला लावून श्रमप्रतिष्ठा शिकवली आज ब्राम्हण कुठलंच काम हलकं समजत नाहीत त्याला गांधी जबाबदार आहेत

गांधी ज्ञानयोगी होते पण ते तिथे थांबले नाहीत ते शिका आणि  संघटित व्हा म्हणाले नाहीत तर शिक्षणासाठीही  आधी संघटित व्हावं लागतं हे ते ओळखून होते त्यांनी शिक्षणही संघटित केलं . त्यामुळं शिक्षणासंदर्भात नुसत्या हवेतल्या गोष्टी करून ते थांबले नाहीत आपल्या अनुयायांद्वारा त्यांनी शेकडो शिक्षण संस्था निर्माण केल्या आणि भारतभर शैक्षणिक संस्थांचे जाळं त्यांनी विणलं ज्यात शिकणारे प्रामुख्याने बहुजन , ओबीसी आणि अस्पृश्य होते

त्यांचा आश्रम हीही एक शिक्षण संस्था होती आणि ती सर्व धर्म वर्ण रंग जात लिंग ह्यांना खुली होती

सत्य , अहिंसा , अचौर्य , अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ह्या यमांना त्यांनी केवळ वैयक्तिक कर्मयोगात ठेवलं नाही तर त्यांना आपल्या सामाजिक जीवनाचा आणि कर्मांचा कणा बनवण्याचा ध्यास त्यांनी घेतला वेळप्रसंगी त्यांना हत्यार बनवण्याचा प्रयत्न केला त्यातूनच त्यांचा आग्रह जन्मला हा आग्रह ब्रम्हचर्यासारख्या यमाबाबत अमानवी वाटला तर सत्य आणि अहिंसेबाबत मानवी !त्यामुळेच सत्याग्रह आणि अहिंसाग्रह स्वीकारले गेले तर त्यांच्या ब्रम्हचर्याग्रहाची टवाळी केली गेली . एका अर्थाने संपूर्ण सार्वजनिक जीवनाचे अध्यात्मिकरण करण्याचा हा प्रयत्न होता

थोडक्यात गांधींनी संपूर्ण भारताचाच आश्रम केला आणि हा केवळ चमत्कार होता तो फक्त त्यांनाच जमला कारण त्यांची जेनयुनिटी !

गांधी कळायला थोडी परिपक्वता यावी लागते ती सर्वांनाच येत नाही मग त्यांची निंदानालस्ती होते आणि टोकाला जाऊन हत्याही ! परिपक्व ब्राम्हण सर्वोत्तम कारण तो मोक्ष प्राप्त केल्यानंतरच परिपक्व होतो व असा मोक्ष प्राप्त केलेला ब्राम्हण समाजाला योग्य दिशेने न्हेऊ शकतो पण त्याचबरोबर हेही खरे कि अपरिपक्व ब्राम्हण सर्वाधिक धोक्याचा असतो कारण तो पूर्ण समाज चुकीच्या दिशेने वा चुकीच्या हत्येकडे न्हेऊ शकतो . गांधी हत्या हे ह्याचे उत्तम आणि लज्जास्पद उदाहरण आहे .

श्रीधर तिळवे नाईक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट