मुख्य सामग्रीवर वगळा
नोंदी श्रीधर तिळवे नाईक

गौतम बुध्दाचा सगळा उपदेश हा आर वाल्या साठी आहे पार गेल्यानंतर आर समोर केलेला . हा उपदेश हा आरच्या काळजीपोटी नाही तर करुणेपोटी आपोआप आलेला ! तो गौतम बुद्धाचा निर्णय आहे आणि तोही त्यांनी  घेतलेला आहे . त्याउलट  लाओत्से त्याने आर सेल्फी काढणाऱ्यांसाठी सोडून दिलेला !

म्हणूनच पुस्तक लिहिण्यासाठी सक्ती करावी लागली . हे सर्व भाषिक आहे नितीन आणि एकेकाळी मी त्यात यथेच्छ डुंबलोय मात्र ते कविता बनून येते तेव्हा येते . सर्वच भाषिक फेक असते ही कविता  त्याला अपवाद नाही मी लिहिलेले आणि आता येते ते सर्व सफेद झूठ आहे . पण आवश्यक आहे अन्यथा व्यवहार अशक्य आहे . भाषा ही ह्या अर्थाने आवश्यक माया (दुसरा शब्द सापडत नाहीये ) आहे .



----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------अनंत फक्त असतं ऑन ऑफ ह्या फक्त भाषिक अभिव्यक्ती आहेत त्या त्या क्षणाच्या

आपण ह्या दिवसाच्या नाईक ट्रॅव्हल्सच्या बसपासून ते फोंड्याला मला मिळालेल्या रिक्षावाल्यापर्यंतच्या सर्व घटना माझ्या घरातले फोन वैगरे ह्यांची पूर्ण चौकशी करूं शकता . कृपया ह्याला आव्हान समजू नका . तुमच्या शंकेचे निवारण व्हावे एव्हढीच इच्छा आहे .


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------पूर्वजांच्याविषयी खोटं बोलणं हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे
=======================================
भारताच्या संसदीय इतिहासात प्रथमच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष फेल गेलेत भाजपला सत्ता कशी राबवायची ते कळत नाहीये , काँग्रेसला सत्तेशिवाय कसं रहायचं ते उमजत नाहीये आणि विचारवंत व जनता दोघांनाही ह्या दोघांचं काय करायचं ते समजत नाहीये
श्रीधर तिळवे नाईक
==============================================

मोदीजींनी आपला विकासाचा प्रचार मुद्दा फारच डोक्यात घेतलाय असं दिसतंय पण त्यांना निवडून देणाऱ्या लोकांच्यात हिंदू धार्मिक लोकांची संख्या किमान ३० टक्के आहे आणि धर्माबाबतचं एकही आश्वासन भाजपने पूर्ण केलेलं नाहीये हिंदूंना हवा आहे समान नागरी कायदा तो हे सरकार आणेल असं दिसत नाहीये राममंदिरचा तर आत्तापत्ताही नाही हे मुद्दे सोडून गोरक्षणासारखे किरकोळ मुद्दे भाजपने मोठे केलेत मुस्लिमांचे बहुपत्नीत्व थांबवावे ही हिंदूंची इच्छा आहे ते सोडून जणू तलाक चा हिंदूंना काडीचाही फायदा नसलेला मुद्दा भाजपने गाजवला एकंदरच आपण सत्तेवर का आलोय ह्याचं काडीइतकंही भान भाजपला नाहीये भावनांच्या आधारे तुम्ही फक्त एकदा झुलवू शकता दुसऱ्यांदा नाही हे कुणीतरी मोदींना सांगणे आवश्यक आहे

==========================================================
शिक्षा वाढवली म्हणजे कायद्याची जरब वाढवणे असा भारतीय राज्यकर्त्यांचा गैरसमज आहे कि काय कोण जाणे कायद्याची जरब शिक्षेपेक्षा अधिक किती गुन्हेगारांना शिक्षा झाली व होतीये त्यावर अवलंबून आहे . शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये हे जुने तत्व झाले खरे नवे तत्व शंभर निरपराधी सुटलेच पाहिजेत पण

-------------------------------------------------------------------------------------------------------------------========================================================================आमच्या सर्व परम मित्रांना कळवण्यात येते कि त्यांनी कृपया दारू , सिगारेट , वेश्यागमन , गर्द आदी नशा , बायकांना उठसुठ शिव्या देणे  ह्यांचा त्याग करावा आणि हे जर जमणार असेल तर किमान ह्यासंदर्भातील पोस्टमध्ये कसल्याही संदर्भात आमच्या नावाचा उल्लेख करू नये ही विनंती
श्रीधर तिळवे नाईक
=======================================================

स्वप्नीलजी , तुम्ही कवितेची नस पकडणारे आणि त्यावरून तिचे पूर्ण निदान करणारे निष्णात वैद्यासारखे आहात . धन्यवाद ह्या विश्लेषणासाठी आणि खूप  प्रेम आणि करुणा !
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सौष्ठवला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने काही टिपणे श्रीधर तिळवे नाईक
टिपण १

सौष्ठवच्या पहिल्या अंकाला निघून  पंचवीस वर्षे पूर्ण होतायत . सर्व संबंधितांचे जाहीर आभार . विशेषतः भालचंद्र कुबल , जयराज साळगावकर , आशुतोष आपटे , मंगेश बनसोड , आल्हाद भावसार , राहुल सरवटे , अविनाश धर्माधिकारी , मंदार फणसे , कीर्तिकुमार शिंदे ,सतीश पाध्ये ,  सलील वाघ , मनोज जोशी , अभिजीत देशपांडे , नितीन रिंढे ,निवि कुलकर्णी , सचिन केतकर , ज्ञानदा ,हेमंत दिवटे , मंगेश काळे , भुजंग मेश्राम , संतोष क्षीरसागर ,
ऋत्विक काळसेकर , महेश म्हात्रे , दिलीप लाठी , शंकर सारडा , केशव मेश्राम  ह्या साऱ्यांच्याशिवाय हे अशक्य होते . ह्या साऱ्यांचे मनापासून आभार !सौष्ठवचे साहित्यात योगदान आहे कि नाही आणि असलेच तर त्याचे स्वरूप काय ह्याची चर्चा मराठी साहित्य करेल न करेल कदाचित सौष्ठव काळाच्या उदरात कसलीही चर्चा न होता नाहीसे होईल पण एक नक्की आमचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि खिशातले पैसे टाकून अंक काढले गेले . मंगेश बनसोड व राहुल सरवटे ह्यांनी प्रत्येकी एका अंकाचे उत्कृष्ट संपादन केले त्यांचे कधीतरी जाहीर आभार मानायचे होते ते आत्ता मानून  घेतो . सौष्ठवला ज्या वाचकांनी प्रतिसाद दिला त्यांचेही आभार .  साठोत्तरीविरुद्धची आरपार लढाई पुरेसे मटेरियल न मिळाल्याने आणि अनेकजण साठोत्तरीला जाऊन मिळाल्याने अशक्य झाली तरी प्रयत्न केला हेही काही कमी न्हवते . आजही मराठी साहित्य प्रबोधनवादी , रोमँटिक आणि आधुनिक साहित्यात अडकून पडले आहे . देशीवादी नवता ही प्रस्थापित होऊ घातलीये खरी पण देशीवादाच्या नावाखाली अनेक गाढवांच्या अंगावर घोड्याची झूल चढवून त्यांना रेसकोर्समध्ये पळवण्याची कॉन्स्पिरसी चालू आहेच . अश्या बॅकग्राउंडवर आम्ही पुरेसे प्रयत्न केले नाही असेही वाटते . मराठीत आमचे सहोदर  भावंड अभिधा आमच्यामुळे रोमँटिसिझम मधून बाहेर पडून आणि  चौथ्या नवतेला अपनवून सर्वसमावेशक होऊन अधिक व्यापक झाले सौष्ठवला सर्वसमावेशकता अमान्य असल्याने असे झाले का असाही प्रश्न निर्माण होतोच माझ्या आयुष्यात मी अभिजित देशपांडे मन्या जोशी नितीन रिंढे मंगेश बनसोड आदींना सोबत घेऊन अभिधात गेल्याने फक्त अभिधालाच फायदा झाला आणि सौष्ठवला फक्त तोटाच झाला असा एक आरोप होतो पण मला वाटते कि त्यावेळी मला सौष्ठवपेक्षा  चौथी नवता महत्वाची वाटली होती आणि हेमंत दिवटे त्यावेळी चौथ्या नवतेला फ्लॅटफॉर्म द्यायला फुल टू तयार होता चळवळ चालणे महत्वाचे असते कुणाच्या नावाने ती चालते हे महत्वाचे नाही त्यामुळे अभिधात शिरण्याचा माझा निर्णय चुकीचा होता असे मला वाटत नाही . तरी पण ह्या निर्णयामुळे जे दुखावले गेले त्यांचीही कधीतरी  क्षमा मागणे गरजेचे आहे ती  आता ह्या निमित्ताने मागतो . असो .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सौष्ठवला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून टिपण दुसरे
सौष्ठवचे फसलेले तीन प्रयोग

सौष्ठव चालू करायचे ठरवले तेव्हा सुरवातीला काहीतरी धमाका हवा असे ठरले आणि ऋत्विक काळसेकरने एक अभिनव कल्पना मांडली ती म्हणजे साहित्य संमेलनात दिंडी निघते तिला कौंटर म्हणून आपण ज्ञानेश्वरी , तुकारामाची गाथा पासून कोसलापर्यंत सगळ्यांची एक तिरडी बांधायची आणि साहित्य संमेलनाच्या दारात ती जाळायची आम्ही तयारी सुरु केली पण ऋत्विकला काही अशा अडचणी आल्या कि प्लांनिंग बाजूला पडले

सौष्ठव हे वेगवेगळ्या संपादकांनी काढायचे असे ठरले त्यानुसार पहिला अंक मी संपादित केला तर दुसरा मंगेश बनसोडने  नंतर आम्ही अभिधाला जॉईन झालो तिथे मी दोन तीन अंकात हेमंत दिवटे बरोबर संपादक होतो व पुढे अभिधात हेमंत दिवटे अभिजित देशपांडे मन्या जोशी नितीन रिंढे असे मिळून चार संपादक झाले ह्या दरम्यान  बांधकाम चालू आहमुळे जे वादळ आले त्यामुळे सौष्ठवला संपादक भेटेना म्हणून पुन्हा मी संपादक तर मंगेश सहाय्य्क संपादक असे चालू ठेवले मात्र काही झाले तरी नवीन पिढीचा संपादक आणायचा हे माझ्या कायम डोक्यात होते असा संपादक भेटला राहूल सरवटेच्या रूपाने ! राहुल कीर्ती शिंदे आणि मंदार फणसे हे मला भेटले ते अविनाश धर्माधिकारी ह्यांच्यामुळे !त्यांनी त्यावेळी सौष्ठवला खूपच मदत केली . त्यातीलच एक संपादक झाला हे समाधान पण ते फार काळ टिकले नाही राहूलला कोलंबिया युनिव्हर्सिटीची फेलोशिप मिळाली आणि साहेब उडाले ते थेट अमेरिकेला सौष्ठवची सामाजिक बांधिलकी पहिल्यापासूनच प्रखर होती ती पेलणारा संपादक भेटेना आणि जुने सगळे जगण्याच्या व्यापात गुंग ! ह्याचवेळी फेसबुक आले आणि सौष्ठव काढण्याची गरजच संपली .

सौष्ठव हे काही केल्या एका आकारात व एका प्रकारात काढायचे नाही असे मी ठरवले होते त्यानुसार पहिला अंक पोस्टर पोएटरी आकारात आला आशुतोष आपटेने त्याचा लोगो वैग्रे डिझाईन केला होता तर पेंटरचा आमचा ग्रुप होता त्यांनी हा अंक मस्त सजवला कालनिर्णयने स्पॉन्सरशिप दिल्याने तो देखणा झाला  दुसरा अंक मेन्यू कार्डासारखा काढला ज्याचे डिझाईन भालचंद्र कुबलने केले होते व संपादन मंगेशने ! समकालीन दलित कविता ह्या विषयावर !तिसरा अविनाश धर्माधिकारी ह्यांच्या '' तुम्ही आम्ही आपण सगळेच ''ची पुरवणी म्हणून! पुढचे  कैक अंक पुरवणी म्हणून निघाले . ह्यानंतर पुढची झेप काय हा एक प्रश्न होता ह्याचवेळी अरुण मुंज ह्या आमच्या मित्राला वर्तमानपत्र काढायची बुद्धी झाली आणि सौष्ठव रविवार पुरवणी म्हणून वर्तमानपत्राच्या आकारात काढायचे ठरले पण एका राजकीय नेत्याला अरुण डोईजड होणार असे वाटले आणि त्याने अरुणची चांगलीच कोंडी केली आणि प्लॅन बारगळला पण ह्यानिमित्ताने वर्तमानपत्र उभारणी हे प्रकरण जवळून अनुभवले ह्यानंतर एक काम आले ते थेट आखातातून एक नवीन टीव्ही चॅनेल उभा करण्याचे झाले पुन्हा मेहनत ह्या चॅनेलला सौष्ठव हा एक टीव्ही शो म्हणून उभा करण्याचे घाटले .प्रत्यक्षात एका वर्षाची मेहनत पाण्यात घालून उंट अरबस्थानला निघून गेला . फायदा एकच झाला  टीव्ही चॅनेल उभा करणे हे किती कचकचीचे काम आहे ते अनुभवले ह्यानंतर आम्ही पुन्हा मॅगेझीन टाईप कागदी आकाराकडे परतलो आणि कागदात थांबलो . सौष्ठवची ई आवृत्ती काढावी अशी सूचना अधूनमधून आली पण मी ती धुडकावली कारण तोवर मला एका हिंदी फिल्मचे डिरेक्शन मिळाले होते . २०१२नंतर  कला साईडलाईनच झाली आणि मोक्ष एके मोक्ष सुरु झाला .

सौष्ठवच्या ह्या फसलेल्या  प्रयोगाची वा अर्धवट झालेल्या प्रयोगाची जबाबदारी पूर्ण माझी !
श्रीधर तिळवे नाईक
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सौष्ठवला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून टिपण तिसरे
सतीश तांबे ह्यांनी मी चौथी नवता इथे मांडावी अशी सूचना केली होती त्यांच्या सूचनेचा मान ठेऊन इथे जास्तीत जास्त सुलभ भाषेत चौथी नवता म्हणजे काय ते मांडत आहे .
सौष्ठवची भूमिका काय होती ?
१ सौष्ठवच्या मते मानवी जीवनात चौथी नवता ही अटळ गोष्ट आहे आणि तिचे मूळ पाश्चात्य देशात आधीच घातले गेले होते पाश्च्यात्य देशातील सर्व उत्तरवादी चळवळी आणि थर्ड वेववादी चळवळींनी ह्याचे बीज घातले होते जसे ह्या  उत्तरवादी चळवळी आणि थर्ड वेववादी चळवळींचे मूळ आधीच्या मॉडर्न मुव्हमेंटमध्ये होते भारतातील देशीवादी चळवळी आणि सबाल्टर्न चळवळी ह्या मात्र परंपरा आणि आधुनिकतेतच घुटमळत राहिल्याने ह्या समाजाला पुढे घेऊन जाण्याऐवजी मागे घेऊन जाणाऱ्या ठरल्या आज ना उद्या ह्या चळवळी भारतातल्या हिंदुत्ववादी आणि मुसलमानवादी चळवळींना मदत करणार आहेत आणि ह्यांचा देशीवाद हा अंतिमतः हिंदुत्ववाद आणि शरीयतवाद ह्यांचे रूप घेणार आहे . म्हणूनच देशीवादाचा पाडाव करणे हे अत्यंत आवश्यक कार्य आहे
२ देशीवाद स्वतःला कितीही पुरोगामी म्हणत असला तरी प्रत्यक्षात तो वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था ह्यांचे समर्थन करतो त्यामुळे सर्वांनी विशेषतः ओबीसी , स्त्रिया, दलित आणि आदिवासी ह्या सर्वांनी त्याचा पाडावंच केला पाहिजे
३ शिव , बुद्ध ,महावीर ,चार्वाक , मौर्य , सातवाहन , गुप्त , वर्धन , बसवेश्वर , शिवाजी महाराज , प्रथम बाजीराव , यशवंतराव होळकर , रामकृष्ण परमहंस , विवेकानंद , शाहू महाराज , फुले , नारायण गुरु , पेरियार , आंबेडकर , महात्मा गांधी आणि बिरसा मुंडा ह्यांची पूजा करण्याऐवजी त्यांची तार्किक चिकित्सा करून परिवर्तनवादी विचार नव्या काळाला अनुरूप पद्धतीने घडवला पाहिजे . वेळप्रसंगी त्यांचे जिथे चुकले आहे ते खुल्या दिलाने मान्य करून ते कसे दुरुस्त करता येईल ते पाहिले पाहिजे .
४ . लेखक फक्त स्वतःच्या भूमीत राहून नाही तर पृथ्वीवर उभे राहून लेखन करतो आणि देश न्हवे तर अवकाश आणि काळ ह्यांच्च्यात वावरत असतो अवकाश हा जितका रिअल असतो तितकाच तो डिजिटल असतो चिन्हसृष्टीय असतो
५मानवी समुदायता  ही प्रथम निसर्गीय मग वैश्विक मग सृष्टीय मग प्रतिसृष्टीय अश्या तऱ्हेने अपडेट होत गेली आणि तिचे लेटेस्ट अपडेट व्हर्जन चिन्हसृष्टी आहे आणि ती टीव्ही संगणक लॅपटॉप इंटरनेट वैग्रे अनेक सेमिऑडिटीजद्वारा ती चिंक्रान्त होत आहे स्मार्टफोन , टॅब्लेट्स , फेसबुक वैग्रे आत्ताच्या सेमिऑडिटीज ! चिन्हसृष्टी सर्वच कमोडिटीजचे रूपांतर सेमिऑडिटीजमध्ये करत चालली आहे आणि तिचे अंतिम सेमिऑडिटींक रूप मानवी क्लोन आणि क्लोनड ब्रह्माण्ड आहे जे साध्य करण्याच्या दिशेने तिचे अपडेटीकरण होत चालले आहे
मराठी व भारतीय कला व साहित्यविश्वाला ह्याचे  भान देणे हे गरजेचे आहे आणि सौष्ठव ह्या भानप्रक्रियेला वेगवान करण्यासाठी जन्माला घातले आहे
६ भारतीय इतिहास हा आतापर्यंत फक्त वैदिक , ब्राह्मणी , वैष्णव , हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन , पुरुषी ,  युरोपियन , अमेरिकन पद्धतीने लिहिला गेला असून तो आता शैव , जैन , बौद्ध , लिंगायत , शीख , स्त्रीय , जमातीय , आशियाई पद्धतीने लिहिला जाणे आवश्यक आहे . त्यातूनच पुढेमागे जगाचा खरा जागतिक इतिहास उदयाला येईल .
७ जागतिकीकरण समजून घ्यायचे असेल तर चिन्हसृष्टीकरण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे समजून घ्यायचे असेल तर मूलभूत गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे जागतिकीकरणामुळे चिन्हसृष्टी अस्तित्वात आलेली नसून चिन्हसृष्टीकरणामुळे जागतिकीकरण अस्तित्वात आले आहे . नव्वदोत्तरी पिढी जागतिकरणाचा ढोल पिटून मूळ सत्याचा अपलाप करत आहे . कॉलनीजमुळे व्यापारवाद (मर्चंटालिझम ) अस्तित्वात आला न्हवता तर व्यापारवादामुळे कॉलनीज अस्तित्वात आल्या त्याचप्रमाणे पुढे ह्या व्यापारवादाचे रूपांतर औद्योगिकवादात (इंडस्ट्रियालिझम ) झाल्यावर कॉलनीवादाचे (कलोनियालिझम ) रूपांतर  साम्राज्यवादात झाले . ह्याचप्रमाणे चिन्हसृष्टिवादामुळे जागतिकीकरण अस्तित्वात आले असून त्याचा स्वीकार आपण विवेकाने आणि आपल्या टर्म्स आणि कण्डिशनवर केला पाहिजे . जागतिकीकरणाला आंधळा विरोध करणाऱ्या सर्व चळवळी ह्या कालबाह्य होत जाणे अटळ आहे त्यामुळेच देशीवाद आणि त्याचा जागतिकीकरणाला असलेला विरोध हा पुराण्या ब्राह्मण पंडितांनी औद्योगिकीकरणाला केलेल्या विरोधासारखा आहे तो आज ना उद्या जुनाट ठरणे अटळ आहे .
८ चिन्हसृष्टीकरणाला विरोध करणे आणि चिन्हसृष्टीकरणात माणसाची झालेली घुसमट व्यक्त करणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत . आधुनिक आणि उत्तराधुनिक कलेने औद्योगिक आणि उत्तरौद्योगिक जगातील माणसाची झालेली घुसमट आणि आनंदता व्यक्त केली चौथी नवता हीही चिन्हसृष्टीकरणातला नवा चिन्हमानव त्याची संवेदनशीलता , शरीरशिलता , बुद्धीशीलता वैग्रे आपल्या साहित्यात व कलेत सादर करते

श्रीधर तिळवे नाईक
-------------------------------------------------------------------------------------------------------------------




Shridhar Tilve is with Satish Tambe.
3 hrs
सौष्ठवला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून लेख तिसरा
सतीश तांबे ह्यांनी मी चौथी नवता इथे मांडावी अशी सूचना केली होती त्यांच्या सूचनेचा मान ठेऊन इथे जास्तीत जास्त सुलभ भाषेत चौथी नवता म्हणजे काय ते मांडत आहे .
सौष्ठवची भूमिका काय होती ?
१ सौष्ठवच्या मते मानवी जीवनात चौथी नवता ही अटळ गोष्ट आहे आणि तिचे मूळ पाश्चात्य देशात आधीच घातले गेले होते पाश्च्यात्य देशातील सर्व उत्तरवादी चळवळी आणि थर्ड वेववादी चळवळींनी ह्याचे बीज घातले होते जसे ह्या उत्तरवादी चळवळी आणि थर्ड वेववादी चळवळींचे मूळ आधीच्या मॉडर्न मुव्हमेंटमध्ये होते भारतातील देशीवादी चळवळी आणि सबाल्टर्न चळवळी ह्या मात्र परंपरा आणि आधुनिकतेतच घुटमळत राहिल्याने ह्या समाजाला पुढे घेऊन जाण्याऐवजी मागे घेऊन जाणाऱ्या ठरल्या आज ना उद्या ह्या चळवळी भारतातल्या हिंदुत्ववादी आणि मुसलमानवादी चळवळींना मदत करणार आहेत आणि ह्यांचा देशीवाद हा अंतिमतः हिंदुत्ववाद आणि शरीयतवाद ह्यांचे रूप घेणार आहे . म्हणूनच देशीवादाचा पाडाव करणे हे अत्यंत आवश्यक कार्य आहे
२ देशीवाद स्वतःला कितीही पुरोगामी म्हणत असला तरी प्रत्यक्षात तो वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था ह्यांचे समर्थन करतो त्यामुळे सर्वांनी विशेषतः ओबीसी , स्त्रिया, दलित आणि आदिवासी ह्या सर्वांनी त्याचा पाडावंच केला पाहिजे
३ शिव , बुद्ध ,महावीर ,चार्वाक , मौर्य , सातवाहन , गुप्त , वर्धन , बसवेश्वर , शिवाजी महाराज , प्रथम बाजीराव , यशवंतराव होळकर , रामकृष्ण परमहंस , विवेकानंद , शाहू महाराज , फुले , नारायण गुरु , पेरियार , आंबेडकर , महात्मा गांधी आणि बिरसा मुंडा ह्यांची पूजा करण्याऐवजी त्यांची तार्किक चिकित्सा करून परिवर्तनवादी विचार नव्या काळाला अनुरूप पद्धतीने घडवला पाहिजे . वेळप्रसंगी त्यांचे जिथे चुकले आहे ते खुल्या दिलाने मान्य करून ते कसे दुरुस्त करता येईल ते पाहिले पाहिजे .
४ . लेखक फक्त स्वतःच्या भूमीत राहून नाही तर पृथ्वीवर उभे राहून लेखन करतो आणि देश न्हवे तर अवकाश आणि काळ ह्यांच्च्यात वावरत असतो अवकाश हा जितका रिअल असतो तितकाच तो डिजिटल असतो चिन्हसृष्टीय असतो
५मानवी समुदायता ही प्रथम निसर्गीय मग वैश्विक मग सृष्टीय मग प्रतिसृष्टीय अश्या तऱ्हेने अपडेट होत गेली आणि तिचे लेटेस्ट अपडेट व्हर्जन चिन्हसृष्टी आहे आणि ती टीव्ही संगणक लॅपटॉप इंटरनेट वैग्रे अनेक सेमिऑडिटीजद्वारा ती चिंक्रान्त होत आहे स्मार्टफोन , टॅब्लेट्स , फेसबुक वैग्रे आत्ताच्या सेमिऑडिटीज ! चिन्हसृष्टी सर्वच कमोडिटीजचे रूपांतर सेमिऑडिटीजमध्ये करत चालली आहे आणि तिचे अंतिम सेमिऑडिटींक रूप मानवी क्लोन आणि क्लोनड ब्रह्माण्ड आहे जे साध्य करण्याच्या दिशेने तिचे अपडेटीकरण होत चालले आहे
मराठी व भारतीय कला व साहित्यविश्वाला ह्याचे भान देणे हे गरजेचे आहे आणि सौष्ठव ह्या भानप्रक्रियेला वेगवान करण्यासाठी जन्माला घातले आहे
६ भारतीय इतिहास हा आतापर्यंत फक्त वैदिक , ब्राह्मणी , वैष्णव , हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन , पुरुषी , युरोपियन , अमेरिकन पद्धतीने लिहिला गेला असून तो आता शैव , जैन , बौद्ध , लिंगायत , शीख , स्त्रीय , जमातीय , आशियाई पद्धतीने लिहिला जाणे आवश्यक आहे . त्यातूनच पुढेमागे जगाचा खरा जागतिक इतिहास उदयाला येईल .
७ जागतिकीकरण समजून घ्यायचे असेल तर चिन्हसृष्टीकरण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे समजून घ्यायचे असेल तर मूलभूत गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे जागतिकीकरणामुळे चिन्हसृष्टी अस्तित्वात आलेली नसून चिन्हसृष्टीकरणामुळे जागतिकीकरण अस्तित्वात आले आहे . नव्वदोत्तरी पिढी जागतिकरणाचा ढोल पिटून मूळ सत्याचा अपलाप करत आहे . कॉलनीजमुळे व्यापारवाद (मर्चंटालिझम ) अस्तित्वात आला न्हवता तर व्यापारवादामुळे कॉलनीज अस्तित्वात आल्या त्याचप्रमाणे पुढे ह्या व्यापारवादाचे रूपांतर औद्योगिकवादात (इंडस्ट्रियालिझम ) झाल्यावर कॉलनीवादाचे (कलोनियालिझम ) रूपांतर साम्राज्यवादात झाले . ह्याचप्रमाणे चिन्हसृष्टिवादामुळे जागतिकीकरण अस्तित्वात आले असून त्याचा स्वीकार आपण विवेकाने आणि आपल्या टर्म्स आणि कण्डिशनवर केला पाहिजे . जागतिकीकरणाला आंधळा विरोध करणाऱ्या सर्व चळवळी ह्या कालबाह्य होत जाणे अटळ आहे त्यामुळेच देशीवाद आणि त्याचा जागतिकीकरणाला असलेला विरोध हा पुराण्या ब्राह्मण पंडितांनी औद्योगिकीकरणाला केलेल्या विरोधासारखा आहे तो आज ना उद्या जुनाट ठरणे अटळ आहे .
८ चिन्हसृष्टीकरणाला विरोध करणे आणि चिन्हसृष्टीकरणात माणसाची झालेली घुसमट व्यक्त करणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत . आधुनिक आणि उत्तराधुनिक कलेने औद्योगिक आणि उत्तरौद्योगिक जगातील माणसाची झालेली घुसमट आणि आनंदता व्यक्त केली चौथी नवता हीही चिन्हसृष्टीकरणातला नवा चिन्हमानव त्याची संवेदनशीलता , शरीरशिलता , बुद्धीशीलता वैग्रे आपल्या साहित्यात व कलेत सादर करते
श्रीधर तिळवे नाईक
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

LikeShow more reactions
Comment
Comments
नितिन भरत वाघ सगळेच मुद्दे विसंगतीने भरलेले आहेत. त्याविषयी बोलायला नको.

1
Manage


LikeShow more reactions
Reply3h

Reply3h
नितिन भरत वाघ ते सविस्तर बोलूच. इथे नको. डॉक्युमेंटेशन होणं आवश्यक वाटतं.
Manage


Reply3h
नितिन भरत वाघ तुम्ही स्वतः प्रचंड देशीवादी लिहिता आणि इतरांना देशीवाद टाळा म्हणता, हे कसे?

1
Manage


LikeShow more reactions
Reply3h
Shridhar Tilve माझी मांडणी मार्गी देशी पोटी जमाती ह्या सर्वांना इंटरनेटेड करून त्यांना वैश्विक परिप्रेक्ष्यात मांडण्याची आहे . देशीवाद मार्गी नाकारतो अनेकदा पोटीची विशेषतः स्त्रीवादाची खिल्ली उडवतो मला हे अमान्य आहे मी स्वतः डेकॅथलॉन सिरीजमध्ये स्थानिकवादी लिखाण केले आहे पण ते करतानाही माझा जागतिक आधार तुटलेला नाही 
मुंबईत आल्यावर मी अधिकाधिक मार्गी झालो आहे माझ्या लिखाणात कुठे देशीवाद आहे ते तुम्हाला दाखवावे लागेल


2
Manage


LikeShow more reactions
Reply3h
नितिन भरत वाघ तुम्ही मागच्या दोन पिढीतले सर्वात जास्त आणि सर्वात महत्वाचे देशीवादी कवी / लेखक आहात. हे मी दाखवून देईल. नुसती विधानं किंवा आरोप करणार नाही. फार वेळ घेऊन, वाचून अभ्यास करुन जबाबदारीने म्हणतोय. तुम्ही देशीवादी लेखक आहात. 
मुद्दा 2 - तुमची मांडणी देशीवाद
ाचेच एडव्हान्स स्वरुप आहे. 
3 - देशीवादाची निश्चित आणि अंतिम अशी सैद्धान्तिक मांडणी झालेली नाही. ती प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे देशीवादाला होणारा विरोध अपूर्णतेतून होणारा विरोध आहे.


2
Manage


Reply3h
संतोष पद्माकर नितीन अगदी समर्पक आहे तुझे मत...

2
Manage


Like
Reply2h
नितिन भरत वाघ देशीवाद टाळून मुद्दा क्रमांक 6 कसा अस्तित्त्वात येईल?

1
Manage


LikeShow more reactions
Reply3h
Shridhar Tilve अहो हे सहज शक्य आहे शैव बौद्ध जैन हे जागतिक धर्म झाले आहेत तुम्ही जे झेनकथांच्या अनुवादाचे काम केलेत ते झेन देशी कि देशीवादी कि मार्गी व देशी ह्यांचा समतोल ? तर त्याचे उत्तर मार्गी व देशी ह्यांचा समतोल हेच आहे त्यातील बौद्ध मार्गी तर जपानी छटा देशी

2
Manage


Reply3h
नितिन भरत वाघ मला वाटतं परत तो मुद्दा नीट मांडावा.
Manage


Reply2h
Sambhaji Nageshkar तिरडीची कल्पना अप्रतिम ! प्रत्यक्षात आली असती तर तिळवे अजरामर झाले असते 😂

1
Manage


LikeShow more reactions
Reply3h
नितिन भरत वाघ प्रत्येक लेखक भूमीवर उभं राहूनच लिहितो. महाराष्ट्रात राहून पंजाबातल्या लोड़ी गीतं कोणी लिहीत नाही.

3
Manage


LikeShow more reactions
Reply3h
Shridhar Tilve पण नामदेव पंजाबात जाऊन पंजाबीत लिहिते झाले कारण ते मार्गीवादी होते दुसरी गोष्ट लोडी गीत मराठीत का लिहिलं जाऊ नये ? उलट नव्या पिढीने हे करावेच आपण जर इंग्लिशमधून सॉनेटस व मुक्तछंद उर्दूतून गझल जपानीजमधून हायकू आणू शकतो तर आपल्या प्रादेशिक भाषांतले फॉर्म का आणू नयेत ?

1
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ नामदेव पंजाबात जावून पंजाबी लिहिते झाले, या पहिल्या वाक्यातच सगळं काही आलं.

1
Manage


Reply2h
Shridhar Tilve ह्या न्यायाने महाराष्ट्रात राहून मराठीत लिहिणारा प्रत्येकजण देशीवादी होईल

2
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ कमी अधिक तसंच असतं.

1
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ ड्रैगन वगैरे आपल्या फँन्टसीत नाहीत म्हणून लेखनात येत नाही.

1
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ कारण ते आपल्या सामाजिक धारणांत नाहीत.

1
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ मुळात लिहिताना मला वाटतं नाही, कोणी लेखक ठरवून देशीवादी वगैरे लिहितो.

1
Manage


Reply2h
Shridhar Tilve तसं नसतं देशीवाद मराठी लेखकांना मराठी परंपरेत राहून लिखाण करण्याची सक्ती करतो ही सक्ती नाकारणारे लोक सुरवातीपासून झालेत उत्तरप्रदेशाचा वैष्णव कृष्ण त्यामुळेच विठ्ठल रूपात विरघळून विठ्ठलालाच वैष्णव केले जाते आणि त्यातून वारकरी पंथ निर्माण होतो उत्तरेची वैदिक परंपरा तर मराठीच्या टाळक्यावर नाचतेच आहे

1
Manage


Reply2h
Shridhar Tilve माझ्या कवितेत ऍनाकोंडा अनेकदा प्रतिमा म्हणून आलेला आहे ड्रॅगन अपवादात्मक त्याचे काय

2
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ अपवादात्मक आहे ते.
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ आणि त्याचा कॉनटेक्स्ट परत देशीच असेल.

1
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ तुमच्या कवितेबद्दल काहीच अर्ग्युमेंट नाही. ती ग्रेटच आहे.
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ सक्ती अशी कोणीच करु शकत नाही सर.
Manage


Reply2h
Shridhar Tilve आता धारणांचा प्रश्न तर ह्यापुढच्या जगात आपल्या धारणा ह्या जागतिक होणे अटळ आहे
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ चॉईस असतो. बरं सक्ती मानली तर तुम्ही स्वतः चौथ्या नवतेसाठी पैरामिटर्सची यादीच दिली आहे.
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ अर्थात धारणा जागतिक होतील, पण त्या भारतीय संदर्भातच.
Manage


Reply2h
Shridhar Tilve लिहिताना संपूर्ण लेखक उपस्थित असतो आणि एकदा का व्यावहारिक भाषेत तुम्ही देशीवादी दृष्टिकोन स्वीकारला तर परंपरा अप्रत्यक्षरीत्या तुमचा पाठलाग करायला सुरवात करतेच त्यामुळेच आपला व्यावहारिक दृष्टिकोन चौथी नवतावादी ठेवावा म्हणजे लिखाण करतांना अप्रत्यक्षरित्याही मार्गी देशी पोटी जमाती ह्यांची संपूर्ण उपस्थिती राहते व साहित्य आधिक दर्जेदार होते

1
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ मला एक चौथी नवतावाला लेखक कवी सांगा जो दर्जेदार लिहितो.
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ 'व्यावहारिक' भाषेत देशीवादी दृष्टिकोण कसा स्विकारतात?
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ मला वाटतं तुमची वरची कमेंट फारच कन्फ्यूज्ड आहे.
Manage


Reply2h
Shridhar Tilve नितिन भरत वाघ सलील वाघ सुरवातीचा मनोज जोशी

1
Manage


Reply1h
Shridhar Tilve तुमची कादंबरी

1
Manage


Reply1h
नितिन भरत वाघ पण याच्यावर ऑब्जेक्शन घेता येऊ शकते. मनोज जोशी दर्जेदार नाही. आधीचाही नाही, नंतरचाही नाही.
Manage


Reply1h
नितिन भरत वाघ सलिल वाघ इतके थोर आहेत की त्यांना माझा दुरुनच प्रणाम. 😉
Manage


Reply1h
Shridhar Tilve व्यवहारात देशीवादी होताच येत नाही हाच तर माझा मुद्दा आहे आणि जे व्यवहारात शक्य नाही ते साहित्यात कसे शक्य होईल ?

1
Manage


Reply1h
Shridhar Tilve सलील वाघांच्या साहित्याला दुरून प्रणाम कि व्यक्तीला

1
Manage


Reply1h
नितिन भरत वाघ तुम्ही 'व्यावहारिक' भाषेत देशीवादी दृष्टिकोण कसा स्विकारतात हे सांगायला हवे. 
रादर, व्यवहारात देशीच भाषा वापरतात.
Manage


Reply1h
नितिन भरत वाघ साहित्याला.
Manage


Reply1h
Shridhar Tilve असे तर प्रत्येकाबाबतीत करता येईल मी उदाहरण देत जाईन तुम्ही प्रणाम करत जाल
Manage


Reply1h
नितिन भरत वाघ म्हणजे तुम्ही ज्याला दर्जेदार म्हणाल त्याला आम्ही पण दर्जेदार म्हणायचं?
Manage


Reply1h
Shridhar Tilve म्हणजे तुम्ही ज्याला दर्जेदार नाही म्हणाल त्याला आम्हीही नाही म्हणायचं
Manage


Reply1h
नितिन भरत वाघ ते तर मान्यच आहे ना.
Manage


Reply1h
Shridhar Tilve शेवटी आवडनिवड वैयक्तिक होत जाते

1
Manage


Reply1h

Reply1h
Ashok Baabar · Friends with Satish Tambe and 35 others
शेवटी आवडनिवड वैयक्तिक होत जाते means it is relative. Theory of relativity is nothing but a theory of Desivad in an Indian multicultural context.
Manage


Reply49m
Shridhar Tilve and as it is borned in Europe and you accept it in INDIA means you also like NEMADE combining MARGI AND DESHI which is inevitable
Manage


Reply45mEdited
नितिन भरत वाघ माझा या संदर्भातला एक निष्कर्ष मांडून थांबतो. चौथ्या नवतेच्या परिमाणांमध्ये बसण्यासाठी झ्याटा पण कळत नसताना अनेकांनी वेगळी कविता म्हणजे जागतिकीकरणातली, लिहायला सुरुवात केली आणि ते यादीवाले कवी होऊन बसले. आणि स्वतःची कविता हरवून बसले. चौथ्या नवतेने एका आख्ख्या पिढीला वाटेला लावले. ज्या लोकांनी जागतिकीकरणाचे सगळे फायदे उचलले, तेच त्या विरोधात गळे काढून रडत होते, हा मोठाच विरोधाभास होता /आहे. तिळवेंनी स्वतःची कविता सुरक्षित ठेवली बाकीच्यांची पार नासवली, बर्बाद केली. चौथ्या नवतेचं हे मोठंच योगदान. थोडक्यात तिळवेंनी एका पिढीची कविता भरकटवली.

1
Manage


LikeShow more reactions
Reply3h
Shridhar Tilve ड्रॅगन आता खेळणे म्हणून मराठी घरात दाखल झालेला आहेच

2
Manage


LikeShow more reactions
Reply2h
नितिन भरत वाघ खेळणेच. सबकॉन्शस मध्ये त्याला स्थान नाहीय.

2
Manage


Reply2h
Shridhar Tilve ते हळूहळू निर्माण होईल
Manage


Reply2h
नितिन भरत वाघ म्हणजे परत देशीय संदर्भात.
Manage


Reply2h
Ashok Baabar · Friends with Satish Tambe and 35 others
आता शैव , जैन , बौद्ध , लिंगायत , शीख , स्त्रीय , जमातीय , आशियाई पद्धतीने लिहिला जाणे आवश्यक आहे . त्यातूनच पुढेमागे जगाचा खरा जागतिक इतिहास उदयाला येईल . This is desivad.मानवी समुदायता ही प्रथम निसर्गीय मग वैश्विक मग सृष्टीय मग प्रतिसृष्टीय अश्या तऱ्हेने अपडेट होत गेली आणि तिचे लेटेस्ट अपडेट व्हर्जन चिन्हसृष्टी आहे आणि ती टीव्ही संगणक लॅपटॉप इंटरनेट वैग्रे अनेक सेमिऑडिटीजद्वारा ती चिंक्रान्त होत आहे. This is desivadi ideology.


1
Manage


LikeShow more reactions
Reply2h
Shridhar Tilve Ashok Baabar हे तरं वैदिक करतात तसे झाले त्यांना जसे सगळे वेदात सापडते तसे तुम्हाला देशीवादात सगळं सापडायला लागलं काय ? आमचे मुद्दे ढापून त्यांना देशीवादाचा मुलामा चढवणे अप्रतिमच !
Manage


LikeShow more reactions
Reply1h
नितिन भरत वाघ मला वाटतं बाबरांची कमेंट परत वाचावी.

1
Manage


LikeShow more reactions
Reply1h
Ashok Baabar · Friends with Satish Tambe and 35 others
Sridhar seems to me a staunch desivadi.


1
Manage


LikeShow more reactions
Reply1h

LikeShow more reactions
Reply1h
Ashok Baabar · Friends with Satish Tambe and 35 others
Back to Buddha and Back to Basavanna are two most influential revolutions in the 20th and 21nd century, respectively. The first is 20th century Desivad and the second is 21nd century Desivad. Going back to Buddha is the first NAWATA and Going back to Basavanna is the second NAWATA.
Manage


LikeShow more reactions
Reply1h
Satish Tambe Shridhar Tilve माझ्या कोऱ्या पाटीला ह्यातील बरेचसे मुद्दे कळणेच शक्य नाही आणि fiction लिहिताना आजवर त्यामुळे काही अडले आहे असेही वाटत नाही . 
तरीही >> लेखक फक्त स्वतःच्या भूमीत राहून नाही तर पृथ्वीवर उभे राहून लेखन करतो आणि देश न्हवे तर अवकाश आणि काळ ह
्यांच्च्यात वावरत असतो अवकाश हा जितका रिअल असतो तितकाच तो डिजिटल असतो चिन्हसृष्टीय असतो << ह्यातील पहिले वाक्य मला महत्वाचे वाटते . हे मेट्रो / ग्लोबल जाणिवेला जवळचे आहे , जिची मराठीमध्ये रीतसर गळचेपी सुरु आहे . तसेच >> जागतिकीकरणाला आंधळा विरोध करणाऱ्या सर्व चळवळी ह्या कालबाह्य होत जाणे अटळ आहे त्यामुळेच देशीवाद आणि त्याचा जागतिकीकरणाला असलेला विरोध हा पुराण्या ब्राह्मण पंडितांनी औद्योगिकीकरणाला केलेल्या विरोधासारखा आहे तो आज ना उद्या जुनाट ठरणे अटळ आहे . << हे भान देखील महत्वाचे आहे . हे २ मुद्दे लक्षात घेता चवथी नवता , हि रुजणे आवश्यक आहे. बाकी देशीवाद / वास्तववाद हे ढवळेपवळे नांगरु देत त्यांच्या आसपासचं रान ! तो रवंथ दात घशात जाईपर्यंत सुरूच राहील . राहू दे . 

आता पुन्हा सवड मिळेल तेव्हा , वाचकांच्या आकलनासाठी ,>> चिन्हसृष्टीकरण<< ही संज्ञा जरा खुलासेवार सांगा . हा त्रास सुरूच राहील. कंटाळा येईल तेव्हा खुश्शाल सोडून द्या !
Manage


LikeShow more reactions
Reply1h
Shridhar Tilve तुमच्यामुळे ही संधी मिळाली धन्यवाद चिन्हसृष्टीकरणाबद्दल प्रयत्न करतो


===============================================================================================================================================भांड हा मुळात एक प्राचीन शैव रंगप्रकार नाट्यप्रकार आहे ज्याचा उल्लेख भरताच्या नाट्यशास्त्रात आहे ( मी तो माझ्या थिएटर वर्गात कधीकधी शिकवतो ) भांडात काम करणाऱ्या नटनट्यांनाही  पुढे भांड म्हणण्यात येऊ लागले हे लोक आदिवासी राज्यात राजदरबारी वा लोकदरबारी यूरोपातील विदुषकाप्रमाणे विनोदिका सादर करत ग्रीक रंगमंचावरही सुरवातीला भांडच सादर होत आणि त्यातूनच पुढे कॉमेडी जन्मली हे रंगप्रकार बिनधास्तपणे देव देवतांची टर  उडवत नंतर श्रमण ,ख्रिश्चनिटी , वैष्णव , हिंदू  हे अतिगंभीर धर्म आले आणि त्यांनी ह्या रंगप्रकारांचा गळाच घोटला परिणामी भांडांची सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळाली पुढे ह्यांची एक जमात व जात बनली  गेलेली  प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी हे लोक मुस्लिम झाले मुस्लिमांना हिंदू देव देवतांची उडवली गेलेली चेष्टा हवीच असल्याने त्यांनी ह्यांना प्रोत्साहनच दिले तुकारामांनी हा अभंग लिहिला तेव्हा त्यांच्या आतला वैष्णव जागा होता ज्याला भांडांनी  देवदेवतांची उडवली गेलेली चेष्टा वा टर सहन होणे शक्यच न्हवते तुम्ही इथे भांडांना ट्रोलर म्हणून पेश करताय म्हणून हे लेखन ! मला त्यांच्याविषयी फक्त करूणा आहे . सुदैवाने मुस्लिमांच्यात आता हे लोक मौलवी म्हणून स्थिर होतायत काश्मीर व कर्नाटकात शेख बनून व्यापार करतायत . ( जाता जाता नाट्यप्रेमींसाठी -आधुनिक काळात मराठीत सादर झालेला उत्कृष्ट आधुनिक भांड म्हणजे चटाटो (चटईला टाचणी टोचण्याचा मंत्र ) )

सुनील तांबे ह्यांच्या पोस्टवरची प्रतिक्रिया
===============================================================================================================================================पहिली गोष्ट मोदी लोकांच्या नजरेत काय आहेत ते मी सांगतोय दुसरी मोदींचा शैवपणा ह्यावर मी लिहिले आहे आणि ibn लोकमत च्या प्रोग्रॅमवेळीही बोललो होतो नकुलीशांचे दोन शिष्य होते पहिला पतंजलीनाथ दुसरा लकुलीश मोदी लकुलीश कुळ आणि रामकृष्ण मठातून आलेत लकुलीश कुळाने गुजरातमध्ये जे भव्य मंदिर उभं केलंय त्याचेही उदघाटन त्यांनीच केलं होतं दोन्ही कडच्या गुरूंचा आशीर्वाद घेऊनच त्यांनी राजकारणात पाऊल टाकलंय ते शंकराचे निस्सीम भक्त आहेत आणि शिवमंदिरांना ते सातत्यांना भेटी देत असतात त्याचा खोल परिणाम शैव मतदारांच्यावर होतो . राहुल गांधींना गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराला गेल्यावर हे कळाले तेव्हा त्यांनीही मीही मूळचा काश्मिरी शैव पंडित आहे आणि शिवभक्त आहे असे सांगायला सुरवात केली जी चांगली राजकीय खेळी होती मोदी वैदिक झालेत का तर नाही ती त्यांची निष्ठा नाही पण ते  हिंदू शैव असल्याने वेदांना आदर देतात इतकेच बाकी वैदिकांची वर्णजातीव्यवस्था त्यांना मान्य नाही पण ते तसे राहतीलच ह्याची मलाही खात्री नाही कारण शंकराचार्यांनी शैविकरण घडवण्यासाठी  वैदिक धारेत प्रवेश केला आणि पुढे ते स्वतःच वर्णजातीव्यवस्थेचे समर्थक बनले मोदींचे शंकराचार्य होणारच नाहीत ह्याची कसलीही खात्री नाही हिंदू शैव ही माझ्यासाठी कायमच शंकास्पद कॅटेगरी राहिलीये ही कॅटेगरी कोणत्याही क्षणी वर्णवादी आणि जातीवादी बनू शकते दुर्देवाची गोष्ट अशी आहे कि शैवांच्यापैकी ९० % शैव हे हिंदू शैव आहेत . त्यांना  मार्गावर आणण्यासाठी शैव हा स्वतंत्र धम्म म्हणून मी पुढे आणायला सुरवात केली पण त्याला मान्यता मिळणे कठीण दिसते शैव बुद्ध जैन हे आगम एकत्र आले तर वैदिकब्राह्मणी ताकतींना थांबवता येईल असे मला वाटते ह्यालाच मी आगमवाद म्हणतो

हा आगमवाद स्वीकारला नाही तर हिंदू शैव भाजपमध्ये जाणे अटळ आहे आणि हे हेरूनच वैदिक डोक्यांनी फार काळजीपूर्वक मोदींचे नेतृत्व पुढे आणले आहे आणि त्यांना हवा तो रिझल्ट मिळतोही आहे हळूहळू ओबीसी भाजपमध्ये स्थिरावतांना दिसतोय ओबीसींनी ह्यापूर्वी वैदिकांच्याकडे अनेकदा डोकी गहाण टाकली आहेत एकदा का ओबीसींची डोकी गहाण पडली कि वैदिक  मग सावकाश वैदिक वर्णव्यवस्था आणायला सुरवात करतात हा इतिहास आहे

संघ मोदींच्या सहाय्याने आपले फाउंडेशन ओबीसीबीसीत स्थिर करतोय एकदा हे फाउंडेशन स्थिर झाले कि शंकराचार्यांना जसे बाजूला सारले गेले आणि त्यांची शैव ओळख पुरती मिटवली गेली तसेच काहीसे मोदींचेही केले जाईल पूर्वी भारतभर विजयासाठी शंकराचार्य आवश्यक होते आता मोदी आवश्यक आहेत जोवर मोदी निवडणूक जिंकतायत तोवर भाजप मोदींना हात लावणार नाही ज्यादिवशी मोदी पराजित त्यादिवशी मोदींच्या जागी वैदिक नेतृत्व आणलं जाईल आणि एकदा हे नवे नेतृत्व विजयी झाले कि वर्णव्यवस्था मागून येणे अटळ !

आशियात इस्लाम देशात  इस्लामिक राजवटी आलेल्या आहेतच आता हिंदुस्तानात हिंदू राजवट आणण्याचा प्रयत्न चालू आहे कदाचित असेही होऊ शकते कि जे शंकराचार्यांना जमले नाही ते मोदींना जमेल म्हणजे आरसेसच संपूर्ण शैव होऊन जाईल

श्रीधर तिळवे नाईक
================================================================================================================================================अटलजी गेले हिंदुत्ववादाचा विवेक गेला कट्टरतेची सारासारबुद्धी गेली वैदिक संस्कृतीचा उदारमतवाद गेला यज्ञ संस्कृतीतील दुर्मिळ ऋजुता गेली

ते जिथे उभे होते ती जागा निंदेने भरलेली जागा होती ही सारी निंदा त्यांनी आयुष्यभर वैभवासारखी मिरवली तुम्ही चुकीच्या पार्टीत आहात असे लोक म्हणू लागल्यावर तुमचा चष्मा चुकीचा आहे हे सांगायला त्यांनी कमी केले नाही ते मवाळ पाण्यासारखे होते पण भली भली धरणं फोडायची ताकत त्यांच्यात होती आणि शेवटी त्यांनी काँग्रेसचे धरणही फोडले . हिंदुत्ववादावर त्यांची अविचल निष्ठा होती ह्या निष्ठेनेच शेवटी त्यांना पंतप्रधान पदापर्यंत पोहचवले ते उत्तम आणि शालीन वक्ते होते त्यांचे भाषणातील दीर्घ विराम त्यांच्या व्यक्तिमत्वातील ठहराव अधोरेखित करत होते हा माणूस अभिजात संस्कृतीला दरवळ पुरवतो ह्याची त्यांना पाहिले तरी खात्री पटत असे .

त्यांना माझी मनापासून आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट