महाकृती लिहिताना उदाहरणार्थ  कादंबरी (महाकथा )  पात्रे कशी निर्माण करायची हा एक कळीचा प्रश्न असतो आणि वास्तववादी लेखक हा प्रश्न स्वतः अनुभवलेल्या वास्तवातून त्या वास्तवातील व्यक्तींतून पात्रे निर्माण करून सोडवतो सर्वच वास्तववादी लेखक हे करत असतात मीही काहीवेळा हे केलेले आहे मग नेमाडेंच्याबाबत एव्हढा गदारोळ का वास्तववादी लेखकाने आकाशातून पात्रे आणायची काय नेमाडेंना योग्य जागी मीही झोडपले आहे पण पात्रे हा नेमाडे ह्यांना झोडपण्याचा विषय होऊ शकत नाही एकीकडे कलावाद मांडायचा आणि दुसरीकडे कलेच्या बाहेर जाऊन वास्तवाची चौकशी करायची हा मूर्खपणा आहे हां तुम्ही जर साहित्याचे समाजशास्त्र मानत असाल तर लेखकाने कादंबरीत मांडलेले वास्तव आणि प्रत्यक्ष वास्तव ह्यांच्यातील तफावत मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आपण समीक्षक म्हणून आणि लेखक म्हणून काय आहोत हे ज्याने त्याने प्रथम तपासलेले बरे
श्रीधर तिळवे नाईक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट