इतिहासाचे ब्राम्हनायझेशन , बौद्धायझेशन आणि संस्कृतायझेशन १ श्रीधर तिळवे नाईक
इतिहासाचे ब्राम्हनायझेशन , बौद्धायझेशन आणि संस्कृतायझेशन हा भारतीय भूतकाळाच्या आकलनातील फार मोठा अडथळा आहे त्यामुळे सुरवातीला फक्त संस्कृतमध्ये जी साधने आहेत तीच प्रमाण मानणे जगभर बौद्ध धर्म पसरलाय म्हणून भारतातही बौद्ध धर्म पसरला होता असे गृहीत धरून जैन आणि शैवांचे अस्तित्वच नाकारणे जे जे मुस्लिम , ख्रिश्चन , बौद्ध ह्या जागतिक धर्मांना धरून नाही ते ते हिंदू बँनरखाली बॅनराईझ करणे
असे अनेक उद्योग आपल्या इतिहासकारांनी केलेले दिसतात
त्यातूनच तुर्किश मुघल आणि अफगाणी रिसोर्सेसकडे दुर्लक्ष्य करून भारतीय इस्लामचे अस्तित्वच नाकारणे जैन आणि शैवांचे ग्रंथ दुर्लक्षित करून जास्तीत जास्त श्रेय गौतम बुद्धाला आणि बौद्धांना देणे हेही त्यातूनच उद्भवले त्याला एन्काउंटर म्हणून सेक्युलर इतिहासकारांनी इस्लामचा इतिहास ग्लोरिफाय केला पण त्यांनीही इमानइतबारे शैवांना साईडलाईनच केले ब्राह्मण क्षत्रियांना हिंदू आयडेंटिटी सामर्थ्य पुरवत राहिली तर दलितांना बौद्ध पण लोच्या झाला तो वैश्य आणि शूद्रांचा हे क्षत्रियांनी स्पॉन्सर केलेल्या वैष्णवीझमला कवटाळत राहिले खरे पण त्यात ह्यांचा दर्जा दुय्यमच राहिला स्वतःच्या शैव ओळखीचे काय करायचे हे ह्यांना कळेना अशावेळी पुरोहितांच्या रोल फार महत्वाचा असतो आणि नेमक्या ह्याच निर्णायक क्षणी गुरवांनी स्वतःला शैव ब्राह्मण म्हणून प्रोजेक्ट करून कच खाल्ली त्यांच्या ह्या ब्राह्मनायझेशनने मूळ शैव धम्म रसातळाला गेला आणि आगम तर धूळ खात पडले . इतिहासाचे कसलेही भान नसलेला हा समूह इतिहासाचे भान आलेल्या मुस्लिम , वैष्णव , हिंदू , जैन आणि नवबौध्द समाजापुढे नुस्ता चीं चीं करायला लागला आणि राम कृष्ण आणि विष्णू ह्यांना देव्हाऱ्यात ठेवून अप्रत्यक्षरीत्या हिंदुत्ववादाला बळ पुरवू लागला त्याच्या ठायी असलेला इतिहासाचा अभाव नेमका कशाचा द्योतक होता औद्योगिकीकरणापुढे भुईसपाट झालेल्या त्याच्या सर्वच तांत्रिकीत त्याला स्वतःचा पराभव दिसत होता असा समाज इतिहासाकडे पाठ फिरवणे पसंत करतो तेच ओबीसींनी केले
अश्या पराभूत झालेल्या समाजाला गांधींनी जिवंत केले खरे पण ह्याला ऐत्याहासिक भान पुरवण्याची काळाने सोपवलेली जबाबदारी गांधींनी पार पाडलीच नाही . कारण उघड होते गांधी वैष्णव होते आणि त्यांना शैवांविषयी कसलेही प्रेम न्हवते भारताला एक करण्यासाठी त्यांना राम हा जास्त योग्य वाटला ही योग्यता त्यांनी भावनेच्या आधारे ठरवली होती शेवटी ते शैव शून्य आणि हिंदू १०० टक्के होते ह्याचे कारण काय होते तर इतिहास ! १८७३ च्या कायद्यानुसार शपथ घेणे कायदेशीर झाले आणि सर्वसाधारण बहुतांशी हिंदू अनेकदा गीतेची शपथ घेऊ लागला ही शपथ हिंदू वकिलांच्या डोक्यात इतकी भिनली कि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व करणारे सगळे बॅरिस्टर गीतेच्या कच्छपी लागले मग ते सावरकर असोत कि गोखले कि गांधी कि टिळक त्यांना भारतीय स्वातंत्र्य संग्राम हा महाभारतातल्या युद्धासारखा दिसू लागला साहजिकच गीता हा ह्या संग्रामाचा आस्थेचा विषय झाली भारतीय पांडव इंग्रज कौरव झाले हा कुरुक्षेत्र होण्याचा हा काळ होता त्यामुळे साहजिकच जो तो गीतेच्या भाषेत बोलायला लागला ह्याने हिंदुत्ववादाला अप्रत्यक्ष खतपाणीच घातले गीतेसारखा ग्रंथ केंद्रवर्ती हिंदू व वैष्णव ग्रंथ बनला अश्या गीतामय माहोलात शैव आगम आठवतात कुणाला ?
गांधी आले तेव्हा ऑलरेडी स्वातंत्र्य संग्राम गीतामय झाला होता विवेकानंद आणि अरविंद घोष ह्यांनीही गीतेची पाठराखण केली होती टिळकांनी तर गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला होता ह्या पार्श्वभूमीवर ओबीसींचे प्रतिनिधित्व करायला गांधी आले त्यांच्या ठायी शहाणपणा आणि मूर्खपणा ह्यांचा अदभूत संगम होता त्यांचा भर विचारप्रणालीपेक्षा व्यवस्थापनावर होता साहजिकच इतिहासाचे भान वैग्रे गोष्ट त्यांच्या गावीही न्हवती परिणामी इतिहासाचे जेव्हा ओरिएंटॅलिस्ट देशीवादी नवे भान जागृत करायची वेळ आली तेव्हा त्यात शैवांना काडीचीही किंमत न्हवती साहजिकच सगळा इतिहास म्हणजे वैष्णवीझमचे नवे पुनर्जीवन होते नवबौध्दांची नवी यातायात होती आणि हिंदूंची नवी राजकीय समीकरणे होती हिंदूंच्या नव्या राजकीय समीकरणातून भाजप जन्मला त्याने सगळा ओबीसी समूह राम मंदिरच्या प्रश्नाखाली स्वतःकडे वळवला वास्तविक वैश्य आणि शूद्र ह्यांच्यातील ओबीसी हा मंडल आयोगामुळे संघटित व्हायला हवा होता पण झाले नेमके उलटे ! काँग्रेसने ओबीसी आरक्षण सिरियसली न घेतल्याने आणि ज्याने ते घेतले त्या जनता पक्षाच्या चिरफाळ्या झाल्याने हा वर्ग भरकटला काशीरामांनी हे हेरून बहुजनवादाचे नवे राजकीय समीकरण पुढे आणले खरे पण मायावतींच्या कर्तृत्वहीन शासनाने त्यावर बोळा फिरवला त्यातच उठसुठ बौद्ध बौद्ध करून शैव असलेल्या ओबीसींना हा बौद्धांचा धर्मांतर घडवण्याचा नवा डाव आहे असेही चित्र देण्यात यायला लागले अशोकाच्या काळात खेळण्यात आलेली ही खेळी पुन्हा खेळून समस्त ओबीसी परिवाराला बौद्ध करण्याचे स्वप्नही काहींना पडायला लागले हे स्वप्न इतिहासाच्या बौद्धायझेशनने पडले होते पण वास्तविक त्या काळातही ते अयशस्वी झाले होते पण भारत बौद्धमय झाला होता ह्या ऐत्याहासिक भ्रमाने वेड्या झालेल्या लोकांना हे सांगणार कोण ? धर्मांतराची अस्पृश्यांना असलेली निकड ही योग्यच होती पण ही तातडी ओबीसींना न्हवती हे मायावतींच्या लक्षातच आले नाही आणि बौद्ध बौद्ध हा आलाप राजकारणात मायावतींना चांगलाच महागात पडला .
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमची पिढी उभी राहिली तेव्हा त्यामुळे आम्ही जेव्हा वैष्णवीझमविरोधात उभे ठाकलो तेव्हा आमच्याविरोधात कोर्टकेस होणे अटळ होते ओबीसीकरणाचे आणि शैविकर्णाचे करायचे काय ह्या बाबत एक निर्णय घेण्याची जबाबदारी आली ! एक शैवाचार्य म्हणून उत्तर तर देणे भागच होते शिवाय इतिहासाचे नवे लेखन करणेही आवश्यक होते इंड्सपासून सुरु झालेला हा प्रवाह नीट मांडणे आवश्यक तर होतेच पण त्याचे वैदिक , ब्राह्मणी , वैष्णव आणि हिंदू ह्यांच्याशी असलेले संबंध तपासणे हेही आवश्यक होते
शैवागमांनी स्वतःला कधीही हिंदू म्हणवून घेतलेलं नसतांनाही त्यांच्यावर हे हिंदुत्व वा हिंदूपण लादले कुणी ह्या प्रश्नाचे उत्तर जेव्हा मी तपासायला लागलो तेव्हा एक उत्तर स्पष्टपणे समोर आले ते म्हणजे युरोपियन व मुस्लिम इतिहासकार आता ह्या लोकांचा सिंधुपुढचे सगळे हिंदू हा सबगोलंकारी प्रकार आम्ही का स्वीकारावा ?तुम्हाला फरक कळत नसेल तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे किंवा निगमांचे राजकारण आहे त्याला आम्ही का बळी पडावे ? तुम्ही जर हिंदुत्ववादी असाल तर तुम्ही हे म्हणू शकता कारण तो वैदिक निगमीं अजेंडा आहे पण तुम्ही जर हिंदुत्ववाद मानत नसाल तर तुम्ही सर्वसामावेशनासाठी इंडियन अथवा भारतीय धर्म /धम्म हा शब्द वापरा आणि त्यात शैव , जैन , बौद्ध , वैदिक , ब्राह्मणी , वैष्णव , शीख आणि हिंदू ह्यांचा समावेश करा की ! शेवटी इंडियन म्हणून मोक्ष हा एक समान धागा सर्वांच्यात एकच आहे हे मान्यच आहे की ! पण शैवांना हिंदू म्हणणे मला मान्य नाही त्याऐवजी ज्यांना वर्णजातिव्यवस्था मान्य नाही अशा सर्व हिंदूंनी स्वतःला शैव म्हणवून घ्यावे असा माझा आग्रह आहे हिंदू ह्या शब्दाबद्दल फारच प्रेम असेल तर हिंदू शैव म्हणवून घ्यावे . वर्णव्यवस्थेचं समर्थन करणारा गीता हा उपग्रंथ प्रमाण मानू नये त्याऐवजी एखादा आगम प्रमाण मानावा किंवा शिवलिंगच प्रमाण मानावे त्याने निदान इतिहासाशी थोडेफार नाते तरी जुळते असो
=================================================================
ओबीसी राहू द्या मुळात भारतियांचेच इतिहासाशी नाते का उभे राहिले नाही ?
भारतात इतिहास निर्माण न होण्याचे एक कारण भारताचा शेतीप्रधान स्वभाव सरळरेषीयतेसाठी ज्ञानोपाय उदयाला यावा लागतो तसा तो आलाही पण पुर्नजन्म सिद्धांताने ह्या सरळरेषीयतेची वाढ कधीच होऊ दिली नाही आणि भारतातले ज्ञानही आणि ज्ञानीही वर्तुळाकारी काळात फिरत राहिले यूरोपात ज्यू ख्रिश्चन आणि इस्लाम सगळेच एकजन्मीय कायमतवादी त्यामुळे सरळरेषीय काळ त्यांच्या वातावरणातच होता ज्याने सरळरेषीय इतिहासाला प्रोत्साहन दिले कयामतपाशी आपण कसे पोहचणार ही मांडणी सरळरेषीय होणे अटळ ही मांडणी भारताला लावून दाखवली ती युरोपियन इतिहासकारांनी !त्यापूर्वी कलहनच्या राजतरंगिणीने प्रयत्न केला खरा पण त्यातही दंतकथेचे वळण उपस्थित होतेच म्हणजेच सरळरेषीयता ही युरोपियन देणगीच म्हणायला हवी पण ह्या देणगीबरोबर त्यांचे भान ही भारतीय भान बनले आणि सगळ्या ह्युमॅनिटीजचे ब्राह्मनायझेशन , बौद्धायनेझेशन आणि संस्कृतायझेशन झाले
त्यातून भारतात धड १०% ही प्रभावी नसलेल्या स्मृती ह्या जणू भारताच्या मुख्य कायदा असल्यासारख्या पुन्हा प्रमोट करण्यात आल्या (ह्यापूर्वी मी फेसबुकवर ह्या संदर्भात लिहिले आहे )आणि हे करण्यात ब्राह्मणांचा आणि यूरोपियनांचा सर्वाधिक वाटा होता त्याने गावागावात स्मृती परत आणल्या म्हणजे भारतभर वैदिक राज्य आणण्याचे स्वप्न ह्या देशात पूर्वी मुस्लिम राजवटीने आणि नंतर ब्रिटिश राजवटींनी प्रत्यक्षात आणले ह्यामागचे कारण उघड होते धर्मांतर घडवून आणण्याची महत्त्वकांक्षा भारतीयांना तुम्ही किती वाईट धर्मात राहता हे पटवण्यासाठी हे आवश्यक होते म्हणजे शैवांना कोणी वालीच उरला न्हवता ना ब्राह्मण क्षत्रिय ना मुस्लिम ब्रिटिश
आणि आंबेड्करांच्यानंतर ना दलित सगळेच स्मृतींच्या नावाने वेगवेगळ्या हितसंबंधासाठी शैवांना खिळे ठोकत राहिले परिणाम श्रीनिवास दीक्षितांच्या भारतीय दर्शने ह्या पुस्तकात एकही पाशुपत दर्शन नाही आणि सांख्य व न्याय वैदिक म्हणून सादर केलेली !विवेकानंदापासून राधाकृष्णनपर्यंत सगळे ह्याबाबत एका माळेचे मणी !
एकदा संस्कृत हीच पुराव्याची भाषा झाल्यावर तिच्या आधारे पुरावे देणेही शक्य होते हे म्हणजे संस्कृतमध्ये खोटं आम्हीच लिहिणार मग ते तमच्या माथी आम्हीच मारणार असे होते बरं संस्कृत प्राचीन होती ह्याचा लिखित पुरावा द्या म्हंटल कि लगेच मौखिक परंपरेचा घोष आणि शैवांनी मौखिक म्हंटले कि लिखित द्या म्हणून बोंब सुरु ! हे पुराव्याचे राजकारण होते ते उलटले इंडस सभ्यतेच्या शोधानंतर पण सुरवातीला त्याकडे दुर्लक्ष्य करण्याचे धोरण अवलंबले गेले अगदी बाबासाहेब आंबेडकरांनीही दुर्लक्ष्य केले कारण बौद्धांचे प्राचीनत्व त्याने धोक्यात आले होते पण कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवण्याचे थोडेच थांबणार आहे ? पुढे प्राचीन नाण्यावर सर्वत्र शिव आढळू लागला आणि सुरवातीच्या कालखंडाचे शिलालेख तर प्राक्रुतातच आढळायला लागले पण हार मानतील तर ते वैदिक कसले ह्यांनी थेट इंड्सचं हायजॅक करायचा प्रयत्न सुरु केला त्यासाठी सरस्वती थेट राजस्थानात आणून ठेवली हा सगळा आमचीच लाल म्हणण्याचा प्रकार होता वस्तुस्थिती अशी आहे कि वैदिक सभ्यता , शेती शिकले ते शैवांकडून ते शैवांच्यात आले तेव्हा हळू हळू त्यांची भाषा वापरातून नाहीशी झाली फक्त शब्द उरले आणि काही देव ! त्यांनी तामिळ भाषेचे व्याकरण वापरून ह्या उरलेल्या शब्दापासून स्वतःची भाषा पुन्हा उभी केली आणि मग ह्या भाषेच्या साहाय्याने नाट्यगंधर्व वेद वापरून ऋग्वेद उभा केला आणि मग बाकीचे वेद ह्यात वाईट काहीच न्हवते पण नंतर सत्ताकांक्षेने ह्यांना ग्रासले ते इतके कि असुर आणि सूर दोघांनीही आपले धर्म वेगळे मांडले आणि शैवांना वा म्लेच्छांना आपल्या समाजात शूद्र दर्जा देण्याचे राजकारण सुरु झाले ब्राह्मणीकरणाची ही सुरवात होती आणि त्यातूनच दुसरा निगम जन्मला तो म्हणजे ब्राह्मण धर्म !
(माझ्या इंग्रजी ग्रंथातील प्रकरणाचे संक्षिप्तीकरण )
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा