भारतीय इतिहास समायोजन आणि संघर्ष श्रीधर तिळवे नाईक
प्रस्तावना
१
भारतीय इतिहासाच्या इतिहासाइतका कुणाचाच भूतकाळ गुंतागुंतीचा नसेल आणि त्याचमुळे समाजही ! पोस्टमॉडर्न समाजाची सगळी लक्षणे इंडियन संस्कृतीत सुरवातीपासून विद्यमान आहेत आणि जर पोस्टमॉडर्न समाज निर्माण करायला आपण गेलो तर काय होऊ शकते ह्याचा अंदाज जितका भारतीय संस्कृतीकडे पाहून येऊ शकतो तितका कदाचित इतर समाजाकडे पाहून येणे अशक्य आहे
केऑस आणि कन्फ्युजन मध्ये सहजरित्या जगणे ही भारतीयांची मानसिकता बनून गेलेली आहे संघर्ष किती ताणवायचा आणि समायोजन किती व्यापक करायचे ह्याची एक नैसर्गिक समज ह्या महाजालाकडे आहे कि काय असा प्रश्न पडावा इतके अवाढव्य शहाणपण हा भारतीय माहोल व्यक्त करतो आणि कधी कधी इतका अडाणचोट वागतो कि भारतसुता , हेच का तुझे शहाणपण असे विचारावेसे वाटते हे काहीतरी असे आहे ज्याचा प्रत्यय सातत्याने येतो आणि तरीही ते पूर्णांशाने कधीही दिसत नाही बरं भारतीय माणूस ह्या माहोलमध्ये अश्या काही बेफिकिरीने जगत असतो कि ही सर्वसमावेशकता आहे कि सर्वगामी संवेदनबधिरता आहे असा प्रश्न पडतो
त्याची जातीयता अनाकलनीय ठरते तर स्वजातीय लग्नात तो ज्यातऱ्हेने बारीकसारीक विधीचे पालन करतो ते बघून हे विधी जातीय आहेत ह्याचा विसर पडून अचानक त्याच्याबद्दल कौतुक वाटायला लागते आणि मग लग्नात आणि वरातीत जेव्हा सर्व जाती जमाती एकत्र घेऊन हा माहौल जेव्हा नाचतो तेव्हा ह्या डान्स करणाऱ्या डान्सिकल समायोजनाचे करायचे काय हा प्रश्न पडतो स्वतःविषयीचे कुतूहल इतक्या सातत्याने जिवंत ठेवणारा पृथ्वीच्या पाठीवर दुसरा कुठला समाज नसेल ''या सर्वांचे स्वागत आहे'' ते "जा आमच्या जातीत तुमचे स्वागत नाही "अशी दोन्ही टोके ह्या महाजालात वावरत असतात
ह्या जालियतेची अक्षीयता एकरेषीयतेने तपासणारे कोलमडून पडतात तर बहुरेषीयता तपासणारे कधीही न परतता येणाऱ्या कृष्णविवरतेत सापडतात त्यामुळे ह्या भूतजालियेंतेचे
१ आदीशैव समायोजन
२ जैन -बौद्ध समायोजन
३ हिंदू वैष्णव समायोजन
४ काँग्रेसी समायोजन
५ हिंदुत्ववादी समायोजन
केंद्रीय सत्ताकेंद्र निर्माण करते न करते तोच
१ आदीशैव विरुद्ध वैदिक संघर्ष
२ ब्राह्मणी विरुद्ध शैवजैनबौद्ध संघर्ष
३ शैवजैनबौद्ध विरुद्ध वैष्णवहिंदू संघर्ष
४ इस्लाम विरुद्ध नवशैव संघर्ष
५ ब्रिटिश विरुद्ध काँग्रेस संघर्ष
६ ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर
७ काँग्रेस विरुद्ध नवबौद्धवाद हिंदुत्ववाद संघर्ष
असे संघर्ष समांतर सत्ताकेंद्रे निर्माण करून त्या समायोजनाला खिळखळे करतात त्यामुळे निश्चित अक्षीयतेचा अभाव निर्माण होतो आणि भूतजालकार पोस्टमॉडर्न गोंधळात सापडतो
प्रश्न असा निर्माण होतो कि एव्हढ्या सगळ्या विखंडीपणात जे सातत्य महसूस होते ते सातत्य वास्तव आहे कि आभासी ? कि ते केवळ फिक्शन आहे जे इतिहासकारांचा वैज्ञानिक आव आणते ?
ह्या प्रश्नाचा बारकाईने विचार केला कि एक गोष्ट जाणवते ती म्हणजे महाजालाच्या केंद्रस्थानी जगात कुठेही अस्तित्वात नसलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे मोक्ष होय जगात सर्वत्र धर्म जन्माला आले पण इंडिया ही एकमेव कंट्री अशी आहे कि जिथे धर्माबरोबर मोक्षही जन्माला आला आणि इंडियन लोकांची सगळी सृजनशीलता युगानुयुगे ह्या मोक्षाभवती केंद्रित झाली आणि प्रत्येक युगात नवे नवे अवतार घेत राहिली अगदी ऐन स्वातंत्र्याच्या भर घुसळणीतही गांधी मोक्षाची भाषा बोलत राहिले तर आंबेडकर निर्वाणाची भारतीय जनता ह्या काळातही विवेकानंद , अरविंद घोष , रमण महर्षी ह्यांचे अध्यात्मिक कॉल घेत राहिली आणि महात्मा फुलेंसारख्या जहाल समाजसुधारकालाही सत्यशोधक असा धार्मिक समाज स्थापन करावासा वाटला .
ही मोक्षप्रधानता धर्मवाद्यांना कायमच अडचणींची वाटत राहिली त्यांनी कायमच नवे नवे पैंतरे शोधत मोक्षवाद्यांचा बॅण्ड वाजवला सुरवातीला वैदिक पुरुज्जीवनाचा अजेंडा चाचपून धर्मवाद्यांनी आपली हुकमी धार्मिक चाल खेळली ती फसली म्हणून मग हिंदुत्ववाद निर्माण झाला आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ !
२
मोक्षाला नाकारून युगानुयुगे धर्माला केंद्रस्थानी आणण्याचा हा डाव कायमच कसा यशस्वी होतो हा भारतीय भूतकाळातील आणि महाजालीयतेतील एक कळीचा प्रश्न आहे श्रीकृष्ण संभवामि युगे युगे म्हणत पुन्हापुन्हा मोक्षाविरोधात धर्म स्थापन करण्यात का यशस्वी होतो हा ह्या प्रश्नाचा मुख्य उपप्रश्न !
मोक्ष हा स्वभावतः राज्यातित असल्याने हे होते का ? आणि हे जर अटळ असेल तर धर्माच्या ताब्यात राज्य वा राष्ट्र जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची कशी ?
पूर्णपणे मोक्ष नाहीसा करून हा प्रश्न सुटेल का ? पूर्वी लोकायतांनी हा प्रयत्न केला होता विशेषतः असुरपंथीय लोकायत ! राज्ये स्थापण्यात त्यांना यशही आले होते पण ही राज्ये फार काळ टिकल्याचा इतिहास नाही १९४७ नंतर नवलोकायत मांडण्याऱ्या मार्क्सवाद्यांनी काही राज्यात सत्ताही स्थापन केली पण ह्या सत्तेला भारतव्यापी यश आलेले दिसत नाही त्यापेक्षा नेहरूंसारखा गूढवादी नवलोकायती माणूस अधिक लोकप्रिय झाला असे दिसते जर ह्या काळात ह्या सर्व नवलोकायवाद्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून संपूर्ण काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात घेतला असता तर भारतव्यापी सत्ता नवलोकायतवाद्यांच्या ताब्यात आली असती का ? नेहरू हा ह्या देशातला नवलोकायतवाद्यांचा शेवटचा चान्स होता का ? जोवर महात्मा गांधींच्या मोक्षपुर्ण प्रतिमेचे गारुड टिकले तोवर काँग्रेसची राजवट टिकली पण पुढे ह्या महात्म्याचे गारुड काँग्रेसी भ्रष्टाचाराने छिन्नविछिन्न केले आंबेडकरवाद्यांनी गांधींना नष्ट करण्यासाठी अथक प्रयत्न केले खरे पण अंतिमतः ते आपल्यालाच महागात पडणार आहेत हे त्यांना कळलेच नाही मोक्ष आणि निर्वाण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे न कळलेल्या ह्या लोकांनी बदललेले गांधी कधी स्वीकारलेच नाहीत आणि गांधींच्या पाठीत खुपसलेला जहरी टीकेचा सुरा आंबेडकरवादालाही जखमी करून गेला ह्यामुळे भारतीय राजकारणातून १९८५ पासून मोक्ष गायबच झाला आणि मग उरला धर्म विरुद्ध चार्वाकी भांडवलवाद ह्यांच्यातील परस्परपूरक संघर्ष ह्यात भाजपने चार्वाकीय भांडवलवाद स्वीकारून धर्म आणि भांडवलशाही ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू बनवल्या प्रमोद महाजन ह्याचे प्रवर्तक त्याचा विस्तार भाजपने घडवून सत्ता संघर्षातील सैद्धांतिक संघर्षाची हवाच काढून घेतली एकाचवेळी धार्मिक आणि चंगळखोर लोकांचे समाधान करण्याची ही तऱ्हा महाभारतातील श्रीकृष्णवादाला पूरक होती ह्या नवश्रीकृष्णवादाचे आकलन तर सोडाच पण त्याची साधी ओळखही भारतीय विचारवंतांना झालीये काय ह्याविषयीच मला शंका आहे .
३
मोक्ष केंद्रस्थानी राहण्याचे काही तोटे झाले का ? तर हो त्याचे अनेक तोटे झाले . एकतर ह्या जगावरील लक्ष्य उडालेच पण मोक्षात परलोकाला स्थान नसल्याने पाप करतांना नरकाची भीती राहिली नाही परिणामी नैतिक दिवाळखोरी हे समग्र भारतीयांचे मुख्य लक्षण बनले
दुसरा परिणाम ह्या देशातील सृजनशीलतेवर झाला . मोक्ष मिळवण्याचे नवेनवे मार्ग ह्या देशात कायमच शोधण्यात आले आणि हे मार्ग कधीच फक्त भक्तिकेंद्रित न्हवते तर ते भक्तिमार्ग , ज्ञानमार्ग , कर्ममार्ग , योगमार्ग , तंत्रमार्ग असे अनेक व विविधतेने गजबजलेले होते परिणामी रॅशनॅलिटी जन्मूनही ही सगळी रॅशनॅलिटी मोक्ष वा निर्वाणप्राप्तीच्या मागे खर्ची पडलेली दिसते जो जो ज्ञानवंत तो तो विज्ञानवंत होण्याऐवजी निर्वाण प्राप्त करायला निघालेला ज्ञानमार्गी झाला गणपती , कपिल ,महावीर , बुद्ध , नागार्जुन , आद्य शंकराचार्य , विवेकानंद , जे . कृष्णमूर्ती , रमण , रजनीश ओशो असे एकापेक्षा एक ज्ञानवंत निर्वाणाच्या मागे लागलेले दिसतात परिणामी वैज्ञानिक प्रगतीचा अभाव ! यूरोपमध्ये धर्म हा भक्तिपुरताच मर्यादित असल्याने तिथल्या ज्ञानवंतांना मोक्षाकडे जाण्याची गरजच राहिली नाही ते संधी मिळताच वैज्ञानिक झाले तंत्रवैज्ञानिक झाले चिन्हवैज्ञानिक झाले पण भारतात सगळे प्रतिभावंत मोक्षात खर्ची पडले आणि पडतात .
तिसरा परिणाम लोकांना केंद्रीय सत्तेविषयी नसलेला आदर जातीपुरता धर्म गावापुरता अर्थ आणि कुटुंबापुरता काम ही भारतीयांची मानसिकता आहे आणि ती तशी बनवण्यात मोक्षाचा बराच वाटा आहे
चौथा परिणाम पैश्याविषयी दुट्टपी भूमिका ! संपत्ती तर हवी पण जो तो संपत्तीच्या आसक्तीतून कसा मुक्त आहे हे दाखवण्याऱ्या फेक चढाओढीत सामील ! त्यामुळे संपत्तीचे उघडपणे समर्थन करणाऱ्या व्यापारी समुदायाची उपेक्षा ! व्यापारी म्हणजे व्हिलन ! मग जे व्हायचे तेच झालेले ! सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ब्राह्मणांनी व मुसलमानांनी पद्धतशीररित्या इथल्या हिंदू वा शैव व्यापाऱ्यांना शूद्रात ढकलण्याची सुरु केलेली प्रक्रिया . ह्याची सुरवात भगवान श्रीकृष्णद्वारा वैष्णवधर्म संस्थापक व्यासांनी केली त्यांनी गुप्त हे वैश्य असल्याने त्यांचा पाडाव करण्यासाठी महाभारत नावाचे भाकड महाकाव्य रचून योनी नावाची एक अभिनव कॅटेगरी निर्माण करून तिच्यानुसार पापयोनी आणि पुण्ययोनी असे दोन प्रकार निर्माण केले आणि पुण्य योनीत ब्राह्मण व क्षत्रिय तर पाप योनीत वैश्य शूद्र अतिशूद्र ह्यांचा समावेश केला तर वाल्मिकीने रामायण ह्या महाकाव्यात व्यापारामुळे सोन्याच्या विटा असलेल्या वैश्य लंकेला व्हिलन बनवून क्षत्रिय रामाद्वारा तिचा पाडाव करवला महाभारत आणि रामायण ही दोन्ही महाकाव्ये म्हणजे वैश्य राज्यकर्त्यांना हरवण्याची कलात्मक साजिश होती ह्या साजिशीत क्षत्रिय बरोबरीने सामील होते कारण त्यांच्या सिंहासनांना वैश्यांच्यामुळे बूच लागले होते आणि ओबीसी घटक कारागीर म्हणून पुन्हा वर आला होता तत्कालीन विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांच्याविरुद्ध रचण्यात आलेले हे कारस्थान क्षत्रियांनी जाणीवपूर्वक लोकप्रिय करायला सुरवात केली त्यातूनच वैष्णवीझम महापॉप्युलर झाला गुप्त साम्राज्य हे एकमेव साम्राज्य असे होते कि जिथे विज्ञान निर्माण होण्याचे चान्सेस होते कारण ज्यांच्या केंद्रस्थानी अर्थ , वार्ता आणि काम हे पुरुषार्थ आहेत असे हे साम्राज्य होते आणि ह्याने धर्म आणि मोक्ष ह्यांचे केन्द्रियत्व नाकारायला सुरवात केली होती आणि अर्थशास्त्रे आणि कामशास्त्रे निर्माण केली होती ( ह्यांना काउंटर म्हणून कौटिल्याने वर्णजातीचे समर्थन करणारे वैष्णव अर्थशास्त्र पुढे जन्माला घातले जे मुद्दाम शोधून एकमेव अर्थशास्त्र म्हणून आपल्या बोडक्यावर मारले गेले )ह्यापुढची स्टेप विज्ञान होती त्याअंगाने न्याय व वैशेषिक अशी पहिली पाऊलेही पडली पण इथेच वैदिक आपली चाल खेळले त्यांनी महाकाव्ये आणि पुराणे निर्माण करून पुन्हा एकदा धर्म केंद्रस्थानी आणला आणि क्षत्रिय एकत्र करून वैश्यांना हरवले हर्षवर्धनाचे वर्धन साम्राज्य हे भारताचे शेवटचे वैश्य साम्राज्य होते .त्यानंतर वार्ता म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान मुस्लिमांच्या आणि ब्रिटिशांच्या ताब्यात जाणे अटळ होते तसे ते गेले आणि पुढे काही मोजकी घराणी सोडली तर पारशी लोकांनी ते ताब्यात घेतले भांडवलशाहीविरोध ही भारतीयांची मानसिकता आहे आणि दांभिकताही ! अशा वातावरणात वार्ता (विज्ञान व तंत्रज्ञान ) ही फक्त आयात करण्यावरच भर दयावा लागतो वैश्य हे काम इमानेइतबारे करतांना दिसतात
थोडक्यात काय सृजनशीलता नाही , नैतिकता नाही आणि व्यापार संपत्तीही नाही आणि तिच्याबद्दल आदरही नाही असा हा देश ! आणि त्याचा हा इतिहास त्याचे हे भूतजाल ! ते मांडणे इतके सोपे नाही पण तरीही ते मांडतो आहे . ह्याची मांडणी सुरु झाली ती जवाहरलाल नेहरू विद्यापीठ समाजशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या OUR PARADIGMS THEIR PARADIGMS ह्या चर्चासत्रात सादर केलेल्या आणि चर्चासत्रासाठी लिहिलेल्या निबंधाने त्यामुळे मी जेएनयू , समाजशास्त्र विभाग आणि ह्या आमंत्रणासाठी कारण ठरलेला माझा मित्र राहुल सरवटे ह्याचा आभारी आहे ह्यानंतर मी चर्चासत्रांचा थोडासा धसकाच घेतलेला आहे कारण एका निबंधाच्या विस्ताराने हे पुस्तक उभे राहिले ते लिहिताना मला चांगलाच घाम आला अकादमीक शिस्तीत काम करणे हा माझा स्वभाव न्हवे पण घेतलेले काम अर्धवट सोडणे हेही माझ्या पिंडात नाही त्यामुळे हे प्रकरण शेवटी मी धसास लावले ह्याचा मला आनंद आहे
श्रीधर तिळवे नाईक
(हे मूळ इंग्रजी प्रस्तावनेचे संक्षिप्तीकरण आहे )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा