वेद गुजरात महाराष्ट्रात कसे निर्माण झाले श्रीधर तिळवे नाईक
शैव सिंधू समाज नेमका कसा होता हा एक यक्षप्रश्न बनून आहे मुळात ही संस्कृती अफगाणिस्तान ते गुजरात ह्या एरियात मर्यादित होती असा एक गोंडस गैरसमज अनेकांचा झालाय प्रत्यक्षात झालं असं कि जेव्हा काही कारणांनी ह्या प्रदेशातील लोकांनी स्थलांतर केले तेव्हा हा मागे उरलेला भाग ओसाड झाला आणि हळूहळू गाडला गेला ज्याचे आपण उत्खनन करतो जो सेफ राहिला तो संगम संस्कृती , द्रविड संस्कृती व नाग संस्कृती म्हणून डेव्हलप होत राहिला आणि आपलं शैवपंणही मिरवत राहिला ह्या गाडल्या गेलेल्या भागालाच सिंधू सभ्यता म्हणणे व ती नाहीशी झाली असं म्हणणं हा आर्कियॉलॉजिकल आचरटपणा आहे आणि त्याला अकादमीक सपोर्ट आहे असो
प्रश्न असा आहे कि गुरव आणि ब्राह्मण हे जसे दोघेही शैव संस्कृतीचे भाग होते व ब्राह्मणत्व हे सुरासुरांना सामावून घेण्यासाठीच निर्माण करण्यात आलं होतं आणि त्यातून पुढे फुटून जाऊन काही मूळ अशैव असलेल्या देशीवादी ब्राम्हणांनी जर वैदिक धर्म निर्माण केला तर त्यावेळी असुर काय करत होते ? त्यांनी अथर्ववेद कसा निर्माण केला आणि सुरांनी आपले तीन वेद कुठे निर्माण केले
माझा स्वतःचा निष्कर्ष असा कि भारतात त्याकाळात एवढे मोठे स्थलांतर फक्त दोनच गोष्टींनी शक्य आहे
१ अतिवर्षा अतिपाऊस ज्यामुळे पूर येऊन हा भाग बुडाला
२ किंवा पावसाने दडी मारली आणि २०० ते हजार वर्षाच्या दुष्काळाने हा भाग मागे सोडून बंगाल आसाम गुजरात महाराष्ट्र ह्या दिशेने सगळी लोकसंख्या स्थलांतरित झाली ह्यात शैव होतेच पण असुर आणि सूरही होते पण ह्या आपत्तीने एक मोठा धार्मिक गदारोळ उडाला तो म्हणजे शैव देवतांची व्हॅलिडिटी काय जर ह्या आपत्तीत शैव दैवते आपणाला वाचवू शकली नाहीत तर ती काय कामाची ? शेवटी लोकांची भक्ती रोकडी आणि रोखठोक असते जो फळ देतो तो देव लोकप्रिय होतो मग तो शिव असो कि अल्ला असो कि साईबाबा असो ! साहजिकच ब्राह्मणातील एका वर्गाला आपला जुनाच धर्म आणि त्याचे दैवतशास्त्र फळण्याच्याबाबतीत अधिक बरे असे वाटू लागले ह्या ब्रम्हवृन्दात जुनी भाषा विशेषतः शब्द व देवता थोडीफार येणारे लोक होतेच ह्यांनी आत्ताची त्यांची प्राकृत , जुनी भाषा व तामिळ महाराष्ट्री द्राविडी व्याकरण , गोंडी व गुजराती शब्द ह्या सगळ्यातून एक संकरित नादब्रम्ह देणारी भाषा निर्माण करून त्यात हे वेद विशेषतः ऋग्वेद रचला त्याला इंडो युरोपियन इंडोइराणियन चा टच होताच पण साऊथ इंडियाचाही गंध होता हे अखिल भारतीय क्रिएशन होते हे क्रिएशन नर्मदा किंवा गोदावरीकाठी झाले
अर्थात हे चालू असताना मूळच्या पंचद्रविडी दाक्षिणात्य लोकांशी त्यांचे संबंध कधी चांगले कधी वाईट असे होते आणि त्याचे प्रतिबिंब थेट त्यांच्या ऋच्यात पडलेले दिसते आता शिवाविषयीं वाटणारे प्रेम ओसरले होते आणि शिस्नदेव म्हणून त्याची हेटाळणी करण्याची वृत्ती वाढली होती मात्र रुद्र म्हणून त्याला आपल्या देवतामंडळात सामावून घ्यावे असेही वाटत होते ह्यातले काही लोक थेट केरळ तामिळपर्यँत आत घुसले तर हळूहळू काहींनी पुन्हा उत्तरेकडे सरकायला सुरवात केली हा प्रवास मध्यप्रदेशातून झाल्याने गोंडी प्रभावही त्यांच्यावर पडला
काही लोक थेट अफगाणिस्तान आणि इराणच्या दिशेने सरकले सोबत मूळची असुर संस्कृती आणि शैव प्रभाव होताच ह्या लोकांनी स्वतःचा अहूर माझदा (असुरमेधा ) धर्म निर्माण केला ज्यात शक्ती सैतानरूप झाली तर चांगले तत्व शिवासारखे पण असुर झाले अनेक प्राकृत नावे त्यांनी आपल्या ह्या नव्या प्रदेशातील नद्या व पर्वतांना दिली ह्यातल्या काहींनी पुढे जाऊन असिरियन संस्कृती निर्माण केली काही काळाने त्यांच्यात एक प्रेषितही निर्माण झाला ज्याने झोरोस्ट्रियन धर्माची स्थापना केली
थोडक्यात ही जी काही महाघटना घडली तिने
१ असुर शैव
२ अहूर माझदा झोरोस्ट्रियन
३ वैदिक
असे तीन धर्म जन्माला घातले
( माझ्या अप्रकाशित इंग्लिश ग्रंथातील एका प्रकरणाचे संक्षिप्तीकरण )
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा