ज्योतिबा फुले ओबीसींचा आद्य इतिहासकार आणि शैवीझम १ श्रीधर तिळवे नाईक
मी ह्यापूर्वीच सावित्रीबाई फुले ह्या कशा शैव कवयित्री होत्या ते सिद्ध केले आहेच (फेसबुकवर हा लेख आला होता )आता महात्मा फुलेंचे इतिहासकार म्हणून काय योगदान आहे ते पहावयाचे आहे शैवांच्यावर पितृपूजेचा प्रचंड प्रभाव आहे त्याचा प्रथम आपण विचार करू
शैवांची पितृपूजा , गुरुपूजा आणि वळी
शैवांच्यात ज्या काही महत्वाच्या कर्मकांडीक गोष्टी आहेत त्यातील एक म्हणजे पितृपूजा पितरांची पूजा ! जगातल्या अनेक आदिवासी जमातीत ती आहे रामनवमी हा सणच मुळात ह्या पितृ पुजेशी संबंधित आहे रामचा अर्थच मूळ !रामपुरुष म्हणजे मूळपुरुष! नवीन वर्षाच्या स्वागतानंतर पितरांची आठवण हेही नैसर्गिक एका अर्थाने वर्तमानाच्या आरंभानंतर भूतकाळाविषयीची कृतज्ञता ! ह्या मूळपुरुषापासून स्वतःच्या वंशावळीची सुरवात करून ती जतन करणे आणि पित्याच्या श्राद्धाला त्या सर्वांची आठवण काढणे हे एक रुटीन पण ह्या रुटीनमधूनच आपणाला अनेक वंशावळ्या आणि राजवळ्या मिळतात अन्यथा अनेक राजघराण्यांचे इतिहास हाती लागले नसते पूर्वी अस्थिविसर्जनाला गेलो कि गुरव वा ब्राह्मण आपली अख्खी वंशावळ सांगायचा अलीकडे हे कमी झाले आहे पण भारतीय इतिहासलेखनात त्यांचे महत्व आहे कारण त्यातूनच आपल्या वंशजांना आपले पराक्रम कळावेत म्हणून वंशावळीत काही महत्वाच्या घटना नोंदवण्याची प्रथा सुरु झाली आणि त्यातून वंशवृत्तांत तयार झाले
आध्यत्मिक क्षेत्रातही गुरूंची अशीच गुरुवळ सांगण्याची प्रथा असल्याने अनेक धार्मिक केंद्रात व मठात काही ऐतिहासिक घटना नोंदवल्या गेल्या
आपण महात्मा ज्योतिबा फुले ह्यांची इतिहासकथनशैली पाहिली तर ती ह्या वळी पद्धतीशी जुळताना दिसेल महात्मा फुले समग्र वाङ्मयात इतिहासाच्या दृष्टीने ब्राह्मणाचे कसब ,गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तके महत्वाची आहेत बुद्धिप्रामाण्यवादी इतिहासाचा हा प्रयत्न आहे ब्राह्मणाचे कसबमधे शूद्रांचे पुरोहित म्हणून ब्राह्मण सेटल झालेले स्पष्ट दिसतात हे ब्राह्मण शूद्रांचे कसे शोषण करतात ते ब्राह्मण जोशी शूद्रांच्या घरी मूल जन्मले म्हणजे कसा पैसा उपटितो ब्राह्मण जोशी शूद्रांच्या घरी मूल जन्मले म्हणजे कसा पैसा उपटितो ब्राह्मण जोशी शूद्रांच्या घरी लग्नात त्यास कसा बुचाडतो वैगरे स्टाईल मध्ये सांगितले जाते त्यातून एक थीम स्पष्ट दिसते ती म्हणजे पुरोहितशाहीला कट्टर विरोध हा सगळा खटाटोप वायाच गेला असे आता म्हणता येते कारण ओबीसी वर्गाने ब्राह्मण पुरोहिताचा त्याग करणे तर दूर उलट बारसे लग्न सारखे विधी ब्राह्मणांना बोलवून धूमधडाक्याने साजरे करणे सुरु ठेवलेले दिसते
गुलामगिरीत फुले संपूर्ण इतिहासाची मांडणी बळीवंश विरुद्ध आर्य भट अशी करतात आणि साऱ्या विष्णूच्या अवतारावर व ब्रह्मावर प्रजापित्यावर टीका करतात आणि शेकडो वर्षे शूद्र आर्य-भटाचे गुलाम होते अशी मांडणी करतात बळीवंश हा काल्पनिक कि खरा ह्याची शहनिशा ते करत नाहीत पुराणात शूद्रांच्या पराभवाचा छुपा इतिहास आहे अश्या तऱ्हेने तो इतिहास ते सादर करतात सुरवात पुरुषसुक्त व मनुस्मृतीतील ब्राह्मण मुखापासून निर्माण झाले हा सिद्धांत खोडुन काढून होते तर्कशुद्ध पद्धतीने हा युक्तिवाद चालतो एका अर्थाने मिथचे बुद्धिप्रामाण्यवादी विश्लेषण करण्याची चार्वाकीय पद्धत इथे खास फुले स्टाईलने येते मस्त्य कूर्म वराह नरसिंह वामन व परशुराम ह्या साऱ्या अवतारांचे परखड बुद्धिप्रामाण्यवादी विश्लेषण येते आणि मग राम व कृष्ण हे क्षत्रिय अवतार येताच ज्योतिबा सौम्य होतात कारण ब्राह्मणांविरुद्ध जेवढा आकांत फुल्यांच्या मनात होता तेवढा क्षत्रियांच्या बद्दल नाही इतकेच कशाला महार मांग हे क्षत्रिय होते अशीही मांडणी ते सुचवतात
त्यांच्या मते बळीराजा हा मुख्य राजा त्याचे नऊ खंड आणि प्रत्येक खंडाचा प्रमुख तो खंडोबा अशी शासनव्यवस्था होती जी विष्णूच्या ह्या अवतारांशी म्हणजे आर्यांच्या प्रमुखांशी लढली ब्रह्मदेव आणि प्रजापती ह्यांनाही ते आर्यप्रमुख मानतात आणि ब्रह्मदेव बेटींचोद होता म्हणून त्याची पूजा आर्यांनी थांबवली असे ते म्हणतात प्रश्न असा निर्माण होतो कि विष्णू आणि ब्रह्म ह्यांचा समाचार घेणारे ज्योतिबा शंकराबद्दल काय म्हणतात ? तर पान समग्र फुलेंच्या पान १४८ वर ते लिहितात ,"प्रल्हादाने आपल्या हरहर या नावाच्या कुळस्वामीची पूजा करण्याची वर्ज केली नंतर हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचे भ्रष्ट झालेले मन पुनः आपल्या कुळस्वामीची पूजा करण्याकडेच वळवावे म्हणून नाना तऱ्हेचे उपाय केले ,,,,'' ह्याचा अर्थ स्पष्ट आहे ज्योतीबांच्या मते महादेव हा बळिवंशाचा कुळस्वामी आहे ज्योतीबांनी सावित्रीबाईंना भगवान शिवाची पूजा का अलाऊ केली ते इथे स्पष्ट व्हावे पुढेही एकदा पंडिता रमाबाई ख्रिस्ती झाल्या तेव्हा फुलेंनी एक कटाव रचला आणि तो सत्साराच्या पहिल्याच अंकात पहिल्याच पानावर छापला त्यात ते म्हणतात
दास तुकाचे चेले बनती
शूद्र शिवाचे गळी लागती
म्हणजे दास आता तुकाचे चेले बनत आहेत तर शिवाचे शूद्र हिंदू भट धर्म त्यागून भटांच्यातून गळायला लागले आहेत आणि शिवाच्या गळाभेटी पडतायत किंवा शिवाच्या गळी लागतायत म्हणजे गले लग रहे हैं
असे असूनही फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन का केला त्यांनी शैव मार्ग का पत्करला नाही ? ह्याचे उत्तर असे कि ते ज्या काळात वावरत होते त्या काळात सुधारक ब्राह्मणांनी ब्राह्मो समाज प्रार्थना समाज आर्य समाज असे अनेक समाज स्थापन करून नवीन विचारांची एकच धुळवड उडवली होती अश्यावेळी बहुजन समाजासाठी एक नवीन समाज फुलेंना स्थापन करावासा वाटणे हे नैसर्गिकच होय ह्या काळात क्रांतिकारक तोच होता जो नवीन समाज स्थापन करत होता फुलेही क्रांतिकारक होते आणि त्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून बहुजन समाजाला नवीन आधुनिक वळण लावण्याचा प्रयत्न केला
(मूळ इंग्लिश ग्रंथातील एका प्रकरणाचे संक्षिप्तीकरण )
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा