ज्योतिबा फुले ओबीसींचा आद्य इतिहासकार आणि देशी इतिहासाचा  प्रवर्तक  श्रीधर तिळवे नाईक

प्रश्न असा आहे कि ज्योतिबा बळिवशाने इतके झपाटले का गेलेत तर ह्यामागे त्यांची शेतकरी व माळ्यांविषयीची कळकळ आहे बळी राजा हा जो शेतसारा घेई तो अतिशय योग्य असे हा वंश होता तोवर शेतकरीमाळी सुखात होते ही त्यांची श्रद्धा होती हा वंश शेतकऱ्यांसाठी लढला हा त्यांचा फील होता साहजिकच ह्या वंशाला देवांनी भटांनी नष्ट केले म्हणून ते भटाविषयी इतका तळतळाट करतात

इंग्रजांचे राज्य जाऊन पुन्हा भटांचेंच राज्य येईल अशी त्यांना भीती आहे भटांच्या चळवळीकडे ते त्यामुळेच संशयाने पाहतात इंग्रजांचे राज्य हा त्यांच्या दृष्टीने अधिक सेफ गेम आहे

तत्कालीन इंग्रज हे वैश्य व्यापारी होते ह्या गोष्टीकडे ते लक्ष्य देत नाहीत कारण  राज्य करतो तो इंग्रज ते क्षत्रिय म्हणून पाहतात त्यामुळेच इंग्रजांनी चालवलेले शोषण त्यांना दिसत नाही त्यांना ओबीसीतीलही शेतकरी (कुणबी )माळी जमाती आधी दिसतात महारमांगांच्याकडे ते महा अरी म्हणजे भटांचे आर्यांचे महान शत्रू म्हणून पाहतात बळीचे सैनिक म्हणून पाहतात साहजिकच ब्राम्हणांचे कसब कुणबी माळी महार मांग ह्यांना अर्पण केले जाते
शूद्रांची गुलामगिरी हा त्यांचा विचारवैपुल्याचा मुख्य भाग आहे त्यामुळेच गुलामगिरी हे पुस्तक गुलामगिरी नष्ट केलेल्या अब्राहाम लिंकनला अर्पण केले जाते

बळीवंश नष्ट होणे हे शूद्रांच्या गुलामगिरीचे मुख्य कारण आहे तर भटांची गुलामगिरी अज्ञानामुळे अविद्येमुळे  न कळणे हे आद्य कारण म्हणून ते पुन्हा पुन्हा शिक्षणाचा विद्येचा आग्रह धरतात सगळे अनर्थ अविद्येने केले असे ते पुन्हा पुन्हा सांगतात

बळीवंश पराभूत झाला तो पराक्रमाच्या अभावाने न्हवे तर भटांच्या काटकारस्थानामुळे असे त्यांचे प्रमेय आहे आणि ते पेशवाईकडे बघून त्यांना सुचले आहे जणू शिवशाही बळीवंश आहे आणि पेशवाई भटांचे कटकारस्थान आहे

ज्योतीबांच्या ह्या मांडणीमुळे ब्राह्मणद्वेष कमालीचा पसरला ही वस्तुस्थिती आजही तो टिकून आहे

मग ज्योतिबा चुकीचे होते का

तर नाही जगातल्या पुरोहित राज्यांनी  धर्मराज्यांनी कुठल्याच धार्मिक राजवटींनी कधीही शेतकऱ्यांना न्याय दिलेला नाही ग्रीक राज्यात तर एका नागरिकांमागे सोळा गुलाम होते जे शेती कसत होते ह्या गुलामगिरीतून सुटका केली ती फ्रेंच राज्यक्रांतीने इंग्रजांच्या काळात ही गुलामगिरी न्हवती काय तर होती आणि पुढे गांधींनी त्याविरुद्ध आवाजही उठवला . फुलेंना ही गुलामगिरी का दिसली नाही ते इंग्रजांच्याबाबतीत आंधळे झाले होते का ?असो .

***

आर्य कोण होते ह्याचे स्पष्ट उत्तर ज्योतिबा देतात त्यांच्या मते आर्य हे इराणमधून आलेले परकीय होते ज्यांनी एतद्देशीय क्षत्रियांना जिंकून भारतावर प्रभुत्व मिळवले ह्यातून दोन सिद्धांत निघतात
१ आर्य आक्रमण सिद्धांत
२ ब्राह्मण ब्राह्मणेतर सिद्धांत
फुले  सर्वच आर्यांना ब्राह्मण समजतात मात्र त्यातून निर्माण होणारे प्रश्न ते लक्ष्यात घेत नाहीत मुख्य प्रश्न म्हणजे क्षत्रियांचे काय करायचे माझे स्वतःचे मत असे कि आरंभी क्षत्रिय आणि वैश्य नावाचे  वर्णच सुरासुरांच्यात  न्हवते किंबहुना पुढेही कधी हे दोन वर्ण त्यांच्या संस्कृतीचे भाग न्हवते मात्र वैदिक धर्माच्या संरक्षणासाठी क्षत्रिय व त्याचे सैन्य तर पालनासाठी वैश्य व त्यांची संपत्ती आवश्यक असल्याने त्यांनी परिघावर त्यांना स्थान दिले मुस्लिम येताच ह्या दोन्ही वर्णांची आवश्यकता सम्पली आणि परशुरामाने सर्व क्षत्रिय मारले व कलियुगात वैश्य उरले नाहीत असे   दोन सिद्धांत रघुनंदन व नागभट्ट द्वारा ताबडतोब प्रस्थापित करण्यात आले आणि शूद्रांना गुलाम बनवून त्यान्ना फुकटात राबवणे सुरु झाले  सुरवातीला फक्त भट वा पुरोहित होते व उरलेले विश म्हणजे जनता होते आणि हे दोघेही योद्धे होते त्यामुळे क्षत्रिय वर्ण निर्माण करण्याची आरंभी त्यांना गरजच भासली नाही पुढे रथाचा शोध लागला तेव्हाही रथकारांचा वर्ण झाला नाही रथात बसून युद्ध करण्याचे कौशल्य ज्याच्या ठायी तो रथी वा रथकार अशीच व्याख्या होती म्हणूनच   द्रोण , कर्ण असे सर्वच रथी होते विश हा पशुपालक व कारागीर ह्यांचा समुदाय होता जो पुढे विभागला गेला

कालांतराने ब्राह्मणांनी चातुर्वर्ण्य मांडला व नंतर द्विवर्ण्य . फुले लिहीत होते तेव्हा महाराष्ट्रात द्विवर्ण्य व्यवस्था प्रचलित झाली होती उत्तरपेशवाईने एव्हढे काम केले होते ही व्यवस्था मुस्लिमांना फायद्याची असल्याने मुस्लिम राज्यकर्त्यांनीही ती जोपासली व वाढवली किंबहुना मुस्लिम राजवटीत तीन वर्ण होते १ मुस्लिम २ ब्राह्मण ३ ब्राह्मणेतर वा शूद्र युरोपियन  येताच ते १ युरोपियन  २ ब्राह्मण ३ मुस्लिम व ४ ब्राह्मणेतर असे झाले ब्राह्मणांच्या विरोधात युरोपियन व मुस्लिम ह्यांना समर्थन ही ज्योतिबांची पॉलिसी होती असे स्पष्ट दिसते त्यामुळेच शूद्रांचा खरा शत्रू ब्राह्मण आहे मुस्लिम वा युरोपियन न्हवे अशी त्यांची मांडणी होती जी आजही अनेक बहुजनवाद्यांची आहे

ज्योतिबा रामकृष्णबाबत सौम्य असले तरी त्यांच्यावरची टीका त्यांनी सोडलेली नाही कृष्णाचा राधेशी असलेला संबंध ते व्यभिचार म्हणूनच पाहतात पण तरीही राम रावण वा इतर क्षत्रियांच्यातले आपापसातील झगडे नारद नावाच्या आर्याने लावले असे ते म्हणतात जणू ह्या क्षत्रियांनी आपली डोकी नारदाकडे गहाण टाकली होती मात्र पुढे सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात ते राम कृष्ण ह्यांच्या नीतिमत्तेचा अतिशय कठोर झाडा घेतात (पान क्र . ४६५ ते ४७६ ) तो योग्यच आहे किंबहुना राम कृष्णांच्या श्रद्धेने भारावलेल्या भागवत वैष्णव धर्माची ही कठोर चिकित्सा ब्राह्मणेतरांनी आधीच वाचली असती तर राम मंदिराचा प्रश्नच निर्माण झाला नसता असे माझे मत आहे
***
देशी आणि जोतिबा

ज्योतीबांच्या इतिहासमीमांसेचे सर्वात मोठे वैशिष्ठ कुठले असेल तर ते म्हणजे देशीचा त्यांनी केलेला वापर . ज्यावेळी ब्राह्मण भारतीय इतिहास संस्कृतमध्ये बुचकळून काढत होते तेव्हा ज्योतिबा फुले हे एकमेव इतिहासकार असे होते जे देशी दृष्टिकोनातून महाराष्ट्र पाहत होते आणि मार्गीवर हल्ला चढवत होते किंबुहना देशीवादाचे खरे जनक महात्मा फुले आहेत असं म्हणायला हरकत नाही

ज्योतीबांना बळीची मीमांसा करावीशी वाटते कारण खंडोबा व मल्हारी ही दोन्ही मराठी दैवते बळीराजाचे क्षेत्रपती होते अशी ते मांडणी करतात आणि ब्राह्मणाचे कसब मध्ये खंडोबावर---- लिहितात मग ते शिवाजीवर कुळवाडीभूषण म्हणून पवाडा रचतात मग पेशवाईची भटशाहीची यथेच्छ निंदा करतात आणि मग इंग्रजांच्या राजवटीत शेतकऱ्यांची असलेली स्थिती ते शेतकऱ्यांचा आसूड व हंटर कमिशनपुढचे भाषण मध्ये मांडतात

आपण बारकाईने पाहिले तर ह्यात एक सरळरेषा दिसते

बळीवंश
नंतर आर्य
नंतर खंडोबा मल्हारी महा अरी म्हणजे महार मांग
नंतर पुन्हा आर्य
नंतर शिवाजी
नंतर पेशवाई
नंतर इंग्रज

अशी ते महाराष्ट्राच्या इतिहासाची मांडणी करतात इतर सर्व इतिहासकार खैबर खिंडीत अडकून पडलेले असताना फुले मात्र इराणी आर्य  इंग्रजांप्रमाणे जलमार्गाने आले अशी  भूमिका घेतात जी तत्कालीन ब्राह्मण इतिहासकारांच्यापेक्षा पूर्ण वेगळी आहे

माझ्या इंग्लिश ग्रंथातील प्रकरणांचे संक्षिप्तीकरण

श्रीधर तिळवे नाईक
------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट