भारतीय इतिहासाची चार स्कूले , वेदनिर्माण आणि आउट ऑफ साऊथ इंडिया थेरी
श्रीधर तिळवे नाईक
वेद कुठे निर्माण झाले आणि सिंधू संस्कृती कुणाची हे प्राचीन भारतातील असे काही प्रश्न आहेत कि ज्यांच्यावर तत्कालीन राजकारणाची छाया पडलेली असते किंबहुना वैदिकांच्या राजकारणानुसार वैदिकांचे मूळ स्थान बदलत असते म्हणजे इंग्रज बाहेरून बर्फातून आले तेव्हा वैदिकही थेट अर्टिक्ट  बर्फातून किंवा कोकशेस मधून येतात इंग्लिश गेल्यानंतर ब्राम्हणांना आपली मुळे इंडियन दाखवणे गरजेचे झाले आणि आपोआप आर्य कसे भारतातलेच हे सांगण्यात आले आणि आता ब्राम्हण अमेरिकेत सेटल झाले कि ब्राम्हण कसे अमेरिकन होते हे सांगण्याचा खटाटोप सुरु होईल  असे मी उपहासाने जेव्हा अभिधानानंतरला दहा वर्षे पूर्ण झाली तेव्हा दिलेल्या व्याख्यानात म्हणालो तेव्हा अनेकांच्या कपाळी आठ्या पडल्या होत्या बलवान राज्यकर्त्यांशी आपली नाळ जोडायची किंवा आपण बलवान झालो कि सगळे कसे आपल्याच नाळेतून जन्मलो ते सांगत सुटायचे असं हे राजकारण असते

त्याला एन्काऊंटर करायचे म्हणून ब्राम्हणेतरांनी ब्राम्हणांना जास्तीत जास्त विदेशी ठरवून तुम्ही ह्या देशातले नाही आहात ह्याची सातत्याने जाणीव करून द्यायची असे ब्राम्हणेतरांचे  राजकारण चाललेले असते सत्य शोधण्यात अनेकदा हेही  राजकारण बाधा झालेले असते


प्रश्न असा आहे कि वेद कुठे निर्माण झाले हा प्रश्न कळीचा का आहे ?
कारण ब्राह्मण बाहेरून आलेत कि आतून हे त्यावर ठरते
सरस्वती कुठे होती हे महत्वाचे का ठरते ?
कारण त्यावरून वेद कुठे निर्माण झाले ते ठरते

सरस्वती अफगाणिस्तानात गेली कि वैदिकही अफगाणिस्तानी होतात
सरस्वती राजस्थानात घग्गर नदीत आणली कि वैदिक भारतीय होतात

त्यामुळेच ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद ह्या दोन प्रश्नांत पेटत राहतो

ह्या अनुषंगाने मग अश्वांचा प्रश्न येतो कारण आर्य भारतात प्रथम घोडे घेऊन आले असे सांगितले जाते

ह्या प्रश्नांना तिसरीही एक बाजू आहे हे कोणी लक्ष्यात घेत नाही कारण हे तिसरी बाजू मांडणारे स्कूल हे बाकी तीन स्कूल्सच्या खिजगिणतीतही नाही विशेषतः महाराष्ट्रात

हे प्रतिपादन जर नीट समजायचे असेल तर प्रथम इतिहासाची चार स्कूल्स समजून घ्यावी लागतील ही स्कूल्स कोणती

१ पहिले पश्चिमी स्कुल ज्याचे उगमस्थान महाराष्ट्र आहे ह्याचे तोंड कायम उत्तरेकडे असते ब्राह्मण ब्राम्हणेतर वाद ही ह्या इतिहासस्कुलची सर्वात मोठी देणगी ज्याची सुरवात ज्योतिबा फुलेंनी केलीये . भारतीय प्रबोधनाचा प्रोजेक्ट हा प्रामुख्याने ह्या स्कुलने उभा केलाय भारतात उभे राहिलेले १ काँग्रेसवाद २ बहुजनवाद ३ हिंदुत्ववाद ४ आंबेडकरवाद हे चारही महत्वाचे वाद ह्या स्कुलने जन्माला घातलेत आणि आजही भारतीय राजकारण ह्या चार वादाभोवती फिरते ह्या स्कूलमधील प्र रा देशमुख ह्यांनी सिंधू संस्कृती , ऋग्वेद व हिंदू संस्कृती ह्या पुस्तकात  हिंदू आणि वैदिक हे दोन भिन्न धर्म आहेत अशी मांडणी करून हिंदुवाद ह्या नवीन वादाची बीजे रोवली आहेत  जो हिंदू बहुजनांचा देव शिव मानतो व वैदिकांना पूर्ण वेगळा धर्म मानतो हा हिंदुवाद हिंदुत्ववादाच्या विरोधात ठाकतो त्यामुळे अनेकांना गोंधळातही टाकतो .

२ दुसरे स्कूल पूर्वी स्कूल ज्याचे उगमस्थान बंगाल आहे ह्याने ब्रिटिशकालीन प्रबोधनाचा प्रोजेक्ट राजाराम मोहन रॉय ह्यांच्या नेतृत्वाखाली सुरु केला ज्याला आज आपण वेदांतवाद म्हणू शकतो ह्याचे तोंड जेव्हा स्वतःकडे वळते तेव्हा त्याला स्वतःच निर्माण केलेले
१ असुरी शैव
२ जैन
३ बौद्ध
असे धर्म दिसतात आणि जेव्हा ह्याचे तोंड दक्षिणेकडे असते तेव्हा तो दक्षिणेकडच्या वेदान्ताकडे वळतो कारण ज्या वेदांताला हा मानतो तो शंकराचार्य , रामानुजाचार्य , वल्लभाचार्य आणि मध्वाचार्य ह्यांनी उभा केला आहे ह्याने उभे केलेला दुसरा महत्वाचा वाद म्हणजे भारतीय मार्क्सवाद ज्याचे एक अंग रॉयवादही आहे

३ तिसरे स्कूल उत्तरी आहे १ वैदिक २ ब्राह्मणी ३ वैष्णव ४ हिंदू ५ झोरोस्ट्रियन असे तब्बल पाच धर्म ह्याने जन्माला घातल्याने आणि दिल्ली हे मुख्य सत्ताकेंद्र ह्याच्या ताब्यात असल्याने भारतावर ह्याची शतकानुशतके संपूर्ण दादागिरी चालू असते आणि आहे

४ चौथे स्कूल दक्षिणी आहे आणि पूर्वी गुजरात आणि महाराष्ट्र ह्याच स्कुलमध्ये होते पण गुजरात वैष्णवीझमने गिळला आणि पेशवाईत उत्तरी स्कूलने महाराष्ट्राला  गिळायला प्रारंभ केला इंग्रजांच्या काळात महाराष्ट्र पूर्णच वेगळा झाला मी स्वतः ह्या स्कूलला बिलॉन्ग करतो महाराष्ट्रात एल एस वाकणकर , विश्वनाथ खैरे सारखे लोक  ह्याला जिवंत ठेवू इच्छित होते पण आमच्या ह्या स्कूलला महाराष्ट्रात फारसा प्रतिसाद नाही आमचे ग्रंथही कुणी प्रकाशित करायला तयार नसते { त्यामुळेच फेसबुकवर निदान असा काही विचार चालू होता (होता असे म्हणतो कारण २०१० साली पुस्तक पूर्ण झाल्यापासून मी इतिहासावर फारसे काम करत नाहीये ) हे कळावे म्हणून मराठी संक्षिप्तीकरण टाकतो आहे }तरीही आम्ही काम करतो आहोत कारण कधीतरी महाराष्ट्राला तो उत्तर भारताचा भाग नाही दक्षिण भारताचा भाग आहे हे कळेल अशी वेडी आशा आहे

ह्या स्कूलमध्येही पारंपरिक तामिळवादी लोक आहेत ज्यात वाकणकर येतात काही माझ्यासारखे आहेत जे भारतीय प्रबोधनाचा प्रोजेक्ट महात्मा बसवेश्वरांनी सुरु केला असे मानतात आणि वेदान्तावर हल्ला चढवतात  आर्य विरुद्ध द्रविड अशी एक मांडणी ह्याच स्कूलमधून आली हे स्कूल आपले खरे शत्रू आहे हे वैष्णव फार पूर्वीपासूनच ओळखून आहेत  म्हणूनच चक्रधरांनी करवीर नगरी व कर्नाटकात आपल्या शिष्यांना जायला सक्त मनाई केली होती

महाराष्ट्र हा ह्या दख्खनी स्कूलची ढाल आणि तलवार होता तोच आता कोसळल्याने ह्या संस्कृतीपुढे आणि ह्या स्कूलपुढे काही नवीनच प्रश्न निर्माण झाले आहेत त्याची चर्चा पुढील प्रकरणात मी करेनच

ह्या स्कूलच्या पार्श्वभूमीवर वरील घडामोडी पाहिल्या कि एक गोष्ट साफच कळते ती म्हणजे उत्तरेला संपूर्ण भारतावर राज्य करायचे असते आणि त्यामुळे ते कायम निगमांना भारतीय संस्कृतीचे अंतिम सत्य म्हणून प्रोजेक्ट करतात आणि हिंदुस्थान आपल्या झेंड्याखाली आणूं पाहतात अनेकदा त्यांना यशही मिळते  सगळेच्या सगळे ब्राह्मण्यवादी मग ते भारताच्या कुठल्याही भागात असोत  ह्या मांडणीखाली आणि मांडवाखाली येतात ही अनेकदा ब्राम्हणांची राष्ट्रीय एकात्मता असते आणि ती सहजासहजी कळत नाही तिला एकतर यूरोप दिसतो किंवा उत्तर भारत त्यामुळेच एल एस वाकणकरांनी आपल्या इंटिग्रेटेड हिस्टरी ऑफ इंडिया (१९९४) ह्या पुस्तकात वेदांच्या निर्मितीत दाक्षिणात्य  असल्याचे सुचवले तेव्हा त्याच्याकडे कुणाचेही लक्ष्य गेले नाही किंबहुना लक्ष्य देणे टाळलं गेलं लिपिकार म्हणून त्यांना सन्मान देणाऱ्या लोकांनी त्यांच्या ह्या पुस्तकाचा उल्लेख करणं कायमच टाळलं किंबहुना दाक्षिणात्य संस्कृतीच्या बाजूने येणारी प्रत्येक गोष्ट टाळणं ही महाराष्ट्रात त्याकाळची फॅशन होती व आजही ती टिकून आहे ( दक्षिणात्यांनी रजनीकांत ह्या मराठी माणसाला सुपरस्टारडम दिले पण बॉलीवूडने मराठी ऍक्टरला महाराष्ट्रात असूनही एकदाही बॉलिवूडचे सुपरस्टारडम दिलेले नाही ही साधी गोष्टही महाराष्ट्राला कधी दिसत नाही )

वाकणकर नेमके काय करतायत ? तर ते सुचवतायत पण सिद्धांतन करत नाहीयेत पण ते जे काही सुचवतायत त्यातून एक थेरी मांडता येते हिला मी आऊट ऑफ साऊथ इंडिया थेरी म्हणतो

ह्या थेरीनुसार

१ प्लेटॉनिक खंडविभाजन घडल्यानंतर कुमारी खंडम अस्तित्वात आला होता आणि तामिळ संस्कृती तिथे जन्मली पुढे ती आताच्या तामिळनाडूमध्ये घुसली पसरली पण नंतर आलेल्या जागतिक पुरात कुमारी खंडम पाण्यात बुडाले आणि मनू दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकला व पुढे त्याच्या वंशजांनी उत्तरेत सरस्वतीकाठी वेद लिहिले म्हणजेच ते एका अर्थाने मान्य करतात कि दक्षिणेकडून गेलेल्या लोकांनी वेद लिहिले पण वेद उत्तरेकडे लिहिल्याचे ते सुचवतात क्षणभरासाठी ग्रेट फ्लडनंतर दक्षिणेकडून उत्तरेकडे पहिले मायग्रेशन झाले हे मान्य केले तरी सिंधू संस्कृतीचा प्रश्न सुटत नाही. इथे मग असे सिद्धांतन करावे  लागते कि ह्या लोकांनी उत्तरेकडे जाऊन सिंधू हरप्पा संस्कृती वसवली आणि तिथून पुढे ती जगभर पसरली

(संक्षिप्तीकरण )
श्रीधर तिळवे नाईक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट