बलात्कार आणि संयमाचे महत्व श्रीधर तिळवे नाईक

बलात्कारामागे दोनच मूलभूत कारणे असतात
१ शरीर सहवासाची भूक तृष्णा आणि निकड
२ सत्तेचा अनियंत्रित उन्माद आणि त्याद्वारे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचा विकृत मार्ग
ह्या दोन्हींना आटोक्यात आणण्याचे मार्ग बलात्कार थांबवू शकतात
ह्यातील एक मार्ग विधायक असतो
तर दुसरा विधायक मार्ग माणसाच्या आतल्या उन्मादक पशूला नियंत्रित करण्यात अपयशी ठरतो म्हणून व्यवहारी म्हणून नाईलाजाने अंमलात आणावा लागतो
विधायक मार्ग म्हणजे भूक तृष्णा आणि निकड ह्यांचा अंत !हा अध्यात्मिक मोक्षिक मार्ग असतो हा हल्ली जवळ जवळ अशक्य झालाय मोक्षावर कुणाचाच विश्वास नाहीये त्यामुळे भूक तृष्णा वा निकड ह्यांचा अंत करण्याची गरजच कुणाला भासत नाही
व्यवहारी मार्ग म्हणजे संयमाचे शिक्षण आणि कायद्याचे भय ! चिन्हसृष्टीय उत्पादकतेने स्वतःचे उत्पादन खपवण्यासाठी संयम हाच गुन्हा ठरवून लालसा आणि चंगळ ह्यांचेच प्रमोशन चालू केले एकदा दाग अच्छे हैं म्हंटलं कि दाग लावायला आपोआप सगळे मोकाट स्वच्छता अध्यात्मिक शारीरिक  आणि कापडीक  आवश्यक पण जेव्हा संस्कृती दागच ग्लोरिफाय करायला लागते तेव्हा बलात्काराचे आरोप असणाऱ्यांच्या समर्थनासाठीही मोर्चे निघायला लागतात मग संयमाचे शिक्षण कुणी कुणाला द्यायचे ज्याचा जो विकनेस तो तो विकनेस ग्लोरिफाय करायला शौर्य समजून मोकळा मग दारू आणि शरीरसंबंध हे गोल्डमेडल सारखे मिरवायच्या गोष्टी बनतात . मग दारू पिऊन उन्मत्त होणारे पशु  आणि बलात्कार करून सुटणारी डुकरं आपले जीवाभावाचे मित्र म्हणून प्रमोट करायला लाज वाटेनाशी होते . पशु कधी ना कधी उघडे पडतातच कारण त्यांचे कपडे हे कपडे नसून संस्कृतीने चढवलेले धाग्यांचे केवळ बंडल असते ह्या पशूंच्यापुढे संयमाचे शिक्षण कोसळते आणि ह्यांच्या आतील मोकाट जनावरे इतकी मोकाट होतात कि त्यांना वय , मासुमियत , स्त्रीचे स्त्रीत्व काही काही दिसत नाही

अश्या जनावरांना आवर घालण्यासाठी कायद्याचे भय फार आवश्यक असते कुठलेही भय मोक्षाच्या विरोधात असते पण मुळात मोक्ष हा जनावरांना मिळत नसतोच म्हणूनच कायद्याच्या भयाला मोक्षी आणि मुमुक्षु दोघांनाही पाठिंबा द्यावा लागतो जनावरांना माणूस बनवण्यासाठी कायद्याचे भय आवश्यक असते पण आज अवस्था अशी आहे कि कायद्याचे कसलेही भय ह्या जनावरांना राहिलेले नाही राजकारणी लोकांना ही जनावरे का आवश्यक वाटतात सुरक्षा कर्मचारींना केवळ पैश्याच्या बदल्यात ह्या जनावरांना का मोकाट सोडावेसे वाटते सत्तेची आणि संपत्तीची तृष्णा , भूक , निकड इतकी कशी वेडी होते कि तिला ह्या जनावरांचा जनावरखाना आपल्याही बायकांच्याकडे वळू शकतो हे साधे सत्य दिसत नाही ?

बलात्काराचे राजकीयीकरण आणि पक्षीकरण हा एक नवीनच उदभवलेला रोग प्रत्येक बलात्कारी घटनेत अविवेकी धुमाकूळ घालतो त्यामुळे न्यायालय खरोखर बिथरते का आणि बिथरले तर  किती बिथरते ? तपासयंत्रणा ह्या बिथरावाने नक्कीच वेग वाढवते पण नंतर जे काही होणार असते ते न्यायालयात होणार असते आणि न्यायालयात फक्त पुरावे चालतात . दुर्देवाने इथेच खरी रिकामी जागा निर्माण होते आणि ह्या रिकाम्या जागांचा पुरेपूर फायदा आरोपी घेतात ह्या रिकाम्या जागा निर्माण होऊ नयेत म्हणून काय करता येईल हा खरा प्रश्न आहे पोलिसांचा विवेक सतत जागा ठेवणे हाच ह्यावर खरा उपाय आहे राजकारणी बोटांच्या तालावर नाचून नाचून खरेतर पोलिसही आता थकलेत पण पार्ट्या बदलल्या तरी बोटं बदलत नाहीत हे त्यांचे दुःख आहे

ह्या पार्श्वभूमीवर आपण सामान्य माणसे एक गोष्ट नक्की करू शकतो ती म्हणजे आपल्या मुलांना संयमाचे शिक्षण देणे आणि कायद्याचे भय निर्माण करणे . आपणच घरात पोलीस यंत्रणेविषयी लहानपणापासून निगेटिव्हिटी भरणार असू तर कायद्याचे भय निर्माण होणार कसे ? बलात्काराच्या आरोपातून कोण सुटले ह्याची चर्चा करण्यापेक्षा कोण जेलमध्ये गेले हे सांगणे ज्यादा आवश्यक आहे . मुलांचे सगळेच लाड पुरवण्यापेक्षा आयुष्यात सगळ्याच गोष्टी मिळत नसतात आणि जेव्हा त्या मिळत नसतात तेव्हा त्या हिसकवण्यापेक्षा सोडून द्यायच्या असतात हा मूलभूत संयमच आपण मुलांना शिकवणार नसू तर मुले मोकाट बनणे अटळ . तेव्हा संयम शिकवा आणि कायद्याचे भयही मेंदूत टाका . खरा उपाय हाच आहे .


श्रीधर तिळवे नाईक














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट