शैव ब्राह्मण व गुरव प्रबोधनात  कुठे होते ? श्रीधर तिळवे नाईक

माझे वडील कट्टर नास्तिक आणि काहीसे मार्क्सवादी ( ते मामा वरेरकरांच्याकडे त्यांच्या संघर्षाच्या काळात काही महिने घरगडी होते त्याचा हा परिणाम ) समाजवादी गांधीवादी मात्र जेव्हा म्हातारपणात त्यांना मी तुम्ही पुन्हा चित्रकलेकडे वा मूर्तिकलेकडे वळा असे सांगितले तेव्हा त्यांनी पहिली मूर्ती बनवली ती शंकराचार्यांची ! आणि त्यातून आम्हा बापलेकांचे भांडण पुन्हा सुरु झाले मी गावात गेलो कि त्यांनी बनवलेली शंकराचार्यांची मूर्ती घराबाहेर न्हेऊन ठेवायचो आणि मी गाव सोडले कि ते ती मूर्ती घरात न्हेऊन ठेवायचे (आजही तुम्ही माझ्या गावात घरी आलात तर माझ्या घराबाहेर अंगणात ती मूर्ती भिंतीला पाठ लावून आहे कारण तिला घरात घेऊन जाणारा माझा  बाप आता ह्या जगात नाहीये ) मृत्यूनंतर कसलेही विधी करू नका हे लिहून ठेवणारा माझा हा बाप शंकराचार्य हे निर्दोष होते हे आग्रहाने सांगत राहिला त्याच्या मते शंकराचार्यांनी फक्त एकच ग्रंथ लिहिला तो म्हणजे विवेकचूडामणी बाकीचे सगळे ग्रंथ ह्या  वैदिक  ब्राम्हणांनी शंकराचार्यांच्या नावाने लिहिलेल्या भाकडकथा आहेत त्यांचे दुसरे म्हणणे पंचायतन म्हणजे शिव शक्ती गणपती कार्तिकेय आणि नारायण विष्णूचा आणि राम , कृष्णांचा ह्या पंचायतनाशी काडीचाही संबंध नाही असे तो म्हणायचा मला हे मान्य न्हवते माझ्या मते शंकराचार्यांचा उद्देश कितीही चांगला असो पण अंतिमतः त्यांनी जो नवीन धर्म वेदान्ताच्या नावाखाली बनवला तोच आत्ताचा हिंदू धर्म बनला जो चातुर्वर्ण्य आणि जातीव्यवस्था पाळतो त्यांनी हा धर्म निर्माण करून सगळे शैव ब्राह्मण वेदांच्या आणि स्मृतींच्या गळ्यात बांधले आणि शैव ब्राह्मणांचा शैव दर्शनांशी असलेला संबंध कायमचा संपून सगळे शैव ब्राह्मण वेदांती बनले ज्यामुळे सगळे सगळे ओबीसीबीसीआदिवासी रसातळाला पोहचले

हे सर्व मी का सांगतोय ?

कारण शैव ब्राह्मणांची आणि गुरवांची मानसिकता मार्क्सवादी बनूनही कशी बदलत नाही ते सांगण्यासाठी !आणि शैव ब्राह्मण व  गुरव प्रबोधनात कुठे होते ह्या प्रश्नाचे उत्तर ह्या मानसिकतेत आहे

शैव ब्राह्मण प्रबोधनात कुठे होते ह्या प्रश्नाचे उत्तर स्वामी विवेकानंदांच्या रूपात दिसते . कायस्थ हे मूळचे शैव ब्राह्मण त्यांचे देवही शैव त्यामुळेच विवेकानंदांच्या उच्च  असण्याविषयी शंका घेऊन त्यातून वाद निर्माण करण्यात आला तर कायस्थ हे धार्मिक प्रबोधनात थोडेतरी होते . ते ब्राह्मण कि वैश्य हा वाद एकेकाळी निर्माण झाला होता आणि प्रबोधनात ते उच्च  म्हणून सेट झाले

दुसरे शैव ब्राह्मण माहेश्वरी ब्राह्मण ! ह्यांनी तर शैव त्यागून वैष्णव का बनलो ह्याची नवी दंतकथा रचून सरळ व्यवसाय सुरु केला आणि ज्यांना आज आपण मारवाडी म्हणतो त्यांच्या  मारवाडी संस्कृतीचा पाया घातला

तिसरे तुळूनाडचे तीळव /तिळवी ब्राह्मण हे शंकराचार्य मूळचे तुळू असल्याने (किंवा तशी त्यांची श्रद्धा असल्याने )त्यांच्याबरोबर गेले किंवा गोव्यात येऊन सारस्वत बनले आणि जे काही कट्टर बसवेश्वरांच्या बाजूने ठामपणे उभे होते आपला बसवेश्वरी लढा लढत राहिले तर काही मध्वाचार्यांच्या बरोबर जाऊन शिवाली ब्राह्मण म्हणवत वैदिक धर्मात  सेटल झाले काहींनी वर्णांतर करून वैश्य बनून व्यवसाय करायला सुरवात केली त्यामुळे घरात ब्राम्हण बाहेर वैश्य अशी काहीशी धेडगुजरी ओळख तयार झाली .

चौथे सारस्वत हे मूळचे कोळी असलेले कोळ्यांचे पुरोहित (त्यांचे मासेप्रेम त्यातूनच आलेले शिवाय लग्नविधीत जाळे बांधण्याची प्रथा वैग्रे )ह्यांनी अचानक सरस्वतीची उपासना करून ज्ञानक्षेत्रात व नंतर व्यवसायातही प्रवेश केला गोव्यातील अनेक शैव मंदिरे पोर्तुगीजांशी हात मिळवून ह्यांनी ताब्यात घेतली .

पाचवे मेहता ब्राह्मण हे गुजरातमध्ये व्यवसायात सेटल झाले आणि त्यातील काही चक्क वैश्य झाले जे अतिकट्टर होते त्यांना मेहतर बनवून भंगी व्यवसायात फेकण्यात आले

सहावा कश्मिरी पंडित हाही शैव काश्मिरी शैवागम प्रमाण मानणारा पंडित नेहरू हे शैव घराण्यातून आल्याने त्यांच्या मागोमाग राजकारणात गेला

प्रबोधनाच्या कालखंडात बहुतांशी शैव ब्राह्मणांनी आपले पौराहित्य फेकून धंदाव्यवसायात किंवा नव्या वकिलीसारख्या व्यवसायात प्रवेश केलेला दिसतो वैदिक हिंदू ब्राह्मण जसे ज्ञानोपासनेकडे वळले तसे तेवढ्या तीव्रतेने शैव ब्राह्मण वळले नाहीत असे दिसते पैश्याचे महत्व जेवढे शैव ब्राह्मणांना कळले तेवढे अशैव ब्राह्मणांना कळले नाही असं म्हणायचं का ? कि ज्ञानाचे महत्व जेवढे वैदिक हिंदू ब्राह्मणांना कळले तेवढे शैव  ब्राह्मणांना कळले नाही असं म्हणायचं ?

आता पुढचा प्रश्न गुरवांचा गुरव ह्या काळखंडात काय करत होते कि ते प्रबोधनाबाबत गाफील होते ?

ज्यावेळेला ब्राह्मणेतर आपला लढा निकराने लढवत होता तेव्हा त्यांचा हा पुरोहित करत काय होता ? वस्तुस्थिती अशी आहे कि वसाहतवादामुळे संपूर्ण ओबीसी वर्गच रसातळाला गेला शेतकरी ,वंजारी ,कुंभार, लोहार, विणकर , आगरी वैग्रे सर्वांचे व्यवसाय बंद पडले तर बीसी आंबेडकरांच्या मागे गेल्याने गुरव त्यांच्यापासून पूर्ण तुटून पडला एकप्रकारचे सामाजिक सार्वजनिक दारिद्र्य ह्या समाजांच्यावर पसरले आणि गुरवही ह्या दारिद्र्यापासून वाचू शकला नाहीच ह्यात भरीस भर म्हणून यूरोपियन सत्तांनी सगळी श्रीमंत देवस्थाने हिंदू ब्राह्मणांच्या घश्यात घातली आणि गुरवांचे मंदिरापासूनचे उत्पन्न घटले देवांचे उत्पन्न हे भाविकांच्या उत्पन्नावर अवलंबून असते जिथे ओबीसींनाच उत्पन्न न्हवते तिथे त्यांच्या देवांकडे तरी पैसे कुठून येणार

ह्यात भरीसभर म्हणून सोनारांसारखे जे ओबीसी श्रीमंत होते त्यांनी गुरवांचा पुरोहित म्हणून त्याग तर केलाच पण स्वतःलाच दैवज्ञ ब्राह्मण म्हणून प्रमोट करायला सुरवात केली त्यांचे अनुकरण करून इतर ओबीसींनीही गुरवांचा पुरोहित म्हणून त्याग करायला सुरवात केली ह्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि यजमान उच्चवर्णीय ब्राह्मण म्हणवून घेणारा  व पुरोहित शूद्र अशी अजिबोगरीब स्थिती निर्माण झाली त्यामुळे खुद्द गुरवांच्याकडे " आम्हांला ब्राह्मण म्हणून मान्यता द्या " अशी शंकराचार्यांच्याकडे मागणी करण्याखेरीज पर्याय राहिला नाही आणि पुढे शंकराचार्यांनी ही मागणी मान्य करून रातोरात सगळे गुरव ब्राह्मण करून टाकले


अनेक गुरवांनी ह्या काळात त्यांची मंदिरे फायद्यात नसूनही केवळ श्रद्धेपोटी स्वतःच्या खिशातले पैसे घालून चालवली अशावेळी ज्ञान हा सर्वोत्तम मार्ग असतो पण ज्ञानाशी गुरवांचे वाकडे !मी मागे म्हंटल्याप्रमाणे जो पुरोहितवर्ग स्वतःचे आगम वाचत नाही तो नवीन ज्ञानविज्ञान काय प्राप्त करणार त्यातच शेतीचे उत्पन्नही लयाला गेलेले त्यामुळे शेतकरी वर्गाचे ह्या काळातील धोरण गुरवांनीही आपणवले ते म्हणजे शहरात जाऊन कामगार बनणे गुरव कामगार किंवा दुकानदार बनले
(क्रमशः
माझ्या इंग्रजी ग्रंथातील एका प्रकरणाचे संक्षिप्तीकरण )

श्रीधर तिळवे नाईक















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट