वर्णव्यवस्था आणि प्रबोधनाची चुकलेली वाट श्रीधर तिळवे नाईक

भारतीय प्रबोधनाचे सार काढायचे ठरवले तर ते पाच  प्रश्नात सामावले आहे
१ वर्ण कसे निर्माण झाले ?वर्णव्यवस्था कशी निर्माण झाली ?आणि तिचे स्वरूप काय ?
२ जातीव्यवस्था म्हणजे काय ?तिचे निर्मूलन कसे करायचे ?तिची वैशिष्ट्ये काय ?
३वर्ग कसे निर्माण झाले ?वर्गव्यवस्थेचे स्वरूप काय आणि वर्गव्यवस्था कशी नष्ट करायची ?
४ ब्रिटिश साम्राज्य कसे निर्माण झाले ? त्याचे स्वरूप काय ?ते कसे नष्ट करायचे ?
५ राष्ट्र कसे निर्माण झाले ?राष्ट्र कसे निर्माण करायचे ? राष्ट्राचे स्वरूप काय ?

ह्यातील वर्ण कसे निर्माण झाले ह्याचे उत्तर ऋग्वेदात पुरुषसुक्तात दिले गेले असल्याने हा प्रश्न सोपा झाला आणि वेद ब्राह्मणांनी लिहिल्याने ब्राह्मणेतरांत एक प्रक्षुब्धपणा निर्माण झाला ह्या व्यवस्थेत ब्राह्मणांनी १००० नंतर ब्राह्मण आणि क्षुद्र असे दोनच वर्ण ठेवल्याने ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर ही मांडणी अधिकच शास्त्रीय झाली केरळासारख्या ठिकाणी तर ह्या वादाचे प्रत्यक्षदर्शी पुरावेच उपलब्ध होते त्यामुळे केरळातून आलेले शंकराचार्य ब्राह्मणेतरांच्या बाजूविरुद्धचे मुख्य व्हिलन झाले ह्याला काउंटर म्हणून ब्राह्मणांनी मूळ वैदिक व्यवस्थेत वर्णव्यवस्था कशी न्हवती , हे पुरुषसुक्त कसे नंतरच्या काळातील आहे आणि वर्ण कसे कर्माधिष्ठित होते ते सांगायला सुरवात केली ( दयानंद सरस्वतीचा आर्य समाज ह्या बाबत आघाडीवर होता )दोघांनाही प्राचीन वर्णव्यवस्था नको होती (अर्थात काही कर्मठ सनातन वगळता )पण एक फिर्यादी होता त्यामुळे आक्रमकपणे आरोप करत होता तर दुसरा आरोपी होता तो बचाव करत होता जे ब्राह्मण आरोप मान्य करत होते ते सरळ मार्क्सवादी वा समाजवादी होऊन स्वतःला अपराधगंडातून मुक्त करू पहात होते ते माफीचे साक्षीदार बनून ब्राह्मणांच्या विरोधात ठाकले होते त्यातून वर्णव्यवस्थेला पाठिंबा देणारे ब्राह्मण आणि ती नाकारणारे ब्राह्मण असे भेद करण्याची पाळी ब्राह्मणेतरांवर आली आणि त्यातून ब्राह्मण्य ही संकल्पना जन्मली ब्राह्मण्य पाळणारे ब्राह्मण्य आरोपीच्या पिंजऱ्यात ठेऊन ब्राह्ण्य न पाळणाऱ्या ब्राह्मणांची सुटका करावी व त्यांना वर्णव्यवस्थेविरोधी लढ्यात सामील करून घ्यावे अशी ब्राह्मणेतरांची स्ट्रॅटेजि बनली ह्या सगळ्या गदारोळात ओबीसी बीसींचे पुरोहित गुरव होते ब्राह्मण न्हवते ही मूलभूत गोष्टच सगळे विसरले (ज्याची चर्चा आपण ह्यापूर्वी केली आहे )ह्याचे कारण उघड होते कलोनियल प्रभावामुळे जे युरोपियन करतात तेच आपण करायचे ही मानसिकता होती युरोपियन लोकांना ब्राह्मणांनी आम्हीच हिंदूंचे समग्र पुरोहित अशी गैरसमजूत करून दिली होती त्यामुळे गोऱ्यांना फक्त ब्राह्मणांच्यात रस उरला आणि त्यांनी निर्माण केलेल्या वेदात सगळी पुरोहितवादाची चर्चा त्यामुळे ब्राह्मणकेंद्री झाली वेदकेंद्री झाली जणू सर्व भारत वेद आणि स्मृती ह्यांचे पालन करत होता असे भ्रामक चित्र निर्माण झाले आणि ह्याच भ्रामक चित्राला पकडून सर्वच विचारवन्त आपली मांडणी करायला लागले प्रत्यक्षात वैदिक स्मृती ह्या फक्त वैदिक राज्य वा ब्राह्मणांचे राज्य जिथे आहे अश्या ठिकाणी पाळल्या जात होत्या वा जिथे अहिंदू राजांनी ह्या स्मृती स्वीकारल्या होत्या (म्हणजे मुस्लिम वा युरोपियन राजांनी )इतरत्र त्या त्या राज्याचे वा राजाचे कायदे होते म्हणजे शिवाजी महाराज , संभाजी महाराज किंवा पहिला बाजीराव अजिबात स्मृती मानत न्हवते तर तिथे शिवाजी महाराजांनी दिलेल्या व्यवस्थेनुसार राज्य चालले होते . मुळात वैश्य ओबीसी बीसीनां स्मृतींच्या नागीण डान्समध्ये काडीचाही इंटरेस्ट न्हवता ही नागीण डसली ती रामायण महाभारतामार्फत म्हणूनच आपण टारगेट करायला हवे ते रामायण महाभारत आणि पुराणांना मी अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मान्य करतो म्हणून अन्यथा ह्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी मी केली असती इतका ह्या ग्रंथांचा परिणाम भीषण आहे वर्णव्यवस्थेची खरी हत्यारे ही महाकाव्ये व पुराणे आहेत आणि आपण चर्चा करतोय वेद आणि स्मृतींची परिणामी जेव्हापासून टीव्हीवर महाकाव्ये आणि पुराणे अवतरली
तेव्हापासून ह्या देशातल्या हिंदुत्ववादी शक्ती मजबूत होत गेल्या हे साधे सरळ सत्य सर्वांना दिसले असते आरोपींच्या पिंजऱ्यात ही महाकाव्ये व पुराणे लिहिणारेही असायला हवेत  अन्यथा ह्या देशात वेद वाचतात तरी कोण आणि ऐकतात तरी कोण ? गेला बाजार ब्राह्मण तरी वेद वाचतात काय ? पण विचारवंतांना हे सांगायचे कुणी ? परिणामी सगळी वर्णव्यवस्थेविरुद्धची चळवळ वाट चुकली आहे ही चळवळ नीट मार्गी लावायची असेल तर फक्त वेद स्मृतींच्या विरुद्ध बोंबलून चालणार नाही तर महाकाव्ये आणि पुराणं ह्यांच्याविरोधातही बोंबलायला हवं .(मूळ इंग्लिश ग्रंथातील प्रकरणाचे संक्षिप्तीकरण )

श्रीधर तिळवे नाईक








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट