पंचम , अस्पृश्य वा दलित समुदाय श्रीधर तिळवे नाईक
ह्यापुढील प्रश्न असा आहे कि निसर्गयुगात हा पंचम समुदाय नेमके काय काम करत होता ?
शैव इंडियात पुरोहित , शासक , व्यापारी , शेतकरी , शेतकरी , पशुपालक , श्रमिक आणि कारागीर असे अनेक समुदाय वावरत होते ह्याच समुदायात पंचमही वावरत होते आणि हा समुदाय जसा नागरी होता तसाच गावकरीही होता सिंधू संस्कृतीत ह्याचे स्पष्ट पुरावे मिळतात शैव राज्ये ही प्रामुख्याने स्त्रीराज्ये वा गणराज्ये वा स्त्रीगणराज्ये होती आणि ह्यातील कित्येक राज्ये ही पंचम समुदायातील राजे चालवत होते बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे हा समुदाय मूळचा राज्यकर्ता समुदायही होता ह्या राज्यात मार्गी रचना ही नगरात होती तर जमाती रचना गावात होती आणि गावात प्रामुख्याने पशुपालन हा मुख्य आणि शेती हा अनुषंगिक व्यवसाय होता साहजिकच पशूंचे आणि शेतमालाचे रक्षण जितके गरजेचे होते तितकेच हे व्यवसाय हे ज्या पाण्यावर चालत त्यांचेही रक्षण होणे गरजेचे होते आक्रमणाची भीती असल्याने गावाच्या शिवेचे आणि शेतांच्या आणि कुरणांच्या शिवेंचेही रक्षण होणे गरजेचे होते रक्षणासाठी शस्त्रांच्या रक्षणाची जितकी गरज होती तितकीच सैनिकांच्या पायांच्या आणि अंगांच्या रक्षणाचीही गरज होती आणि त्याकाळात चामडे हेच चिलखते वैग्रे बनवण्यास उपलब्ध मटेरियल होते अन्नधान्याचे , फळांचे , मांसाचे , मास्यांचे , पाण्याचे साठे करण्यासाठी चामड्याची पिशवी अधिक उपयोगी होती कमी धारदार पण उपयुक्त गलोर वा लगोरी हीही चामड्याची होती साहजिकच ह्यातूनच महार , चांभार , ढोर वैग्रे जमाती उदयाला आल्या . ह्या जमाती स्वतःच्या गावातील व नगरातील तत्कालीन गावपंचायतींना वा नगरपंचायतींना जितक्या अनसरेबल होत्या तितक्याच स्वतःच्या जमातपंचायतींना ! ही एक दुहेरी समाजव्यवस्था होती गावपातळीवर ती देशीचा भाग होती नगरपातळीवर मार्गीचा आणि भारतीय वा राज्यीय पातळीवर मार्गीचा भाग होती
ह्या समुदायातील काही जमातींचा आपण आता परिचय करून घेऊ
बाबासाहेब आंबेडकर नावाच्या अद्भुत प्रतिभेच्या विचारवंतांमुळे सर्वाधिक विख्यात झालेल्या महाहर जमातीपासून आपण सुरवात करू
महाराष्ट्र व गोव्यातील एस्सी पैकी तब्ब्ल ५७ ते ५८ टक्के लोकसंख्या ह्या जमातीची आहे त्यामुळेही महाराष्ट्रात तिचा विचार करणे आवश्यक आहे एकूण महाराष्ट्र व गोव्यातील लोकसंख्येत तिचे प्रमाण तब्बल ११ ते १२ टक्के आहे
इंडियात सर्वच जातीजमातीच्या जन्माच्या कथा आहेत तशी महाहर जमातीचीही जन्मकथा आहे
पार्वतीशी लग्न झाल्यानंतर शिव तपश्चर्येला निघून गेले तेव्हा माता पार्वतीला त्यांची चिंता वाटायला लागली आणि तिने आपल्या नऊ शक्ती एकत्र करून एक स्त्री तयार केली आणि तिला एका मुलाला जन्म देण्याची आज्ञा दिली तिने नवशक्ती एकत्र करून जन्म दिला तो महाहर महाशक्ती आणि हर ह्यांचा पुत्र ह्या पुत्राने शिवाचे तप संपेपर्यंत त्यांना कसलाही पत्ता लागू न देता त्यांचे रक्षण केले तप संपल्यानंतर जेव्हा शिवजींना त्याच्या ह्या कर्तृत्वाविषयी कळाले तेव्हा त्यांनी सगळी पृथ्वी त्याला दिली आणि सांगितले कि ह्यापुढे माझ्या लिंगस्थानांचे आणि जमिनीचे रक्षण तू करशील वैग्रे वैग्रे ह्या जन्मकथा भाकडकथा असतात हे काही सांगायची गरज नाही पण त्या त्या जमातीच्या प्राचीन काळातील कार्यावर प्रकाश टाकतात
महार ह्या शब्दाच्या अनेक उत्पत्ती अनेक विचारवंतांनी दिल्या महारठ्ठ किंवा महारथी पासून हा शब्द तयार झाला असावा असा तर्क लढवण्यात आलेला आहे माझ्या मते तो महा म्हणजे महादेव आणि हर म्हणजे शंकर वा शिव ह्या दोन शब्दांपासून तयार झाला आहे शिवांच्या महादेव आणि हर ह्या दोन्ही रूपांची पूजा करणारे ते महा हर ह्याचा दुसरा अर्थ महान हर असाही होतो हर हर महादेव ही युद्धघोषणाच मुळी ह्या समाजाची होती आणि ही घोषणा करून ते शत्रूवर तुटून पडत
दुसरी गोष्ट म्हणजे हर हा शब्द ! पशुपालक अवस्थेत हर हा शब्द महादेव ह्या अर्थाने जसा वापरला जाई तसा महादेवाचा अंश ह्या अर्थानेही प्रचलित होता महा हर ह्या शब्दाचा अर्थ महा देव म्हणजेच पंचमांचे प्रमुख चमा हर म्हणजे चर्म ज्याच्या मालकी हक्कात येते असा चामड्याचा हर हे शब्द मेहर म्हणजे मेहाचा हर हे सारे शब्द दैवी अर्थानेच वापरले गेलेले आहेत पुढे सूर लोकांनी हर शब्द रिप्लेस करून त्याजागी देव हा शब्द आणला आणि मग महा हर सुद्धा महादेव झाला आणि मूळ महा हरांना पद्धतशीरपणे तोडण्याची प्रक्रिया सुरु झाली किंबहुना इंडियातील इसवीसनपूर्व ११०० ते ५०० हा कालखंड हा वैदिकांच्या वर्चस्वाचा कालखंड आहे पुरेच्या पुरे नष्ट करून स्वतःची रानटी संस्कृती त्यांनी इथल्या द्रविड , नाग , गोंड आदी सर्वच शैवांच्या वर लादली आणि त्यांना जंगलात जाणे भाग पाडले
निसर्गयुगात सर्वसाधारणपणे महाहर काय करायचे ह्याची आपणाला कल्पना आहे . त्यांच्यावर साधारणपणे १० कामांची जबाबदारी होती ह्या जबाबदाऱ्यात नंतर घटही झालेली आहे मात्र मूळ गाभा फारसा बदललेला दिसत नाही उत्तरेत मात्र ही जमात पूर्णच कापून टाकण्यात आली किंवा तिला जंगलात पळवून लावण्यात वैदिकांना यश आले त्याचा विचार पुढे करूच
शैव इंडियात महार पुढील कामे करत
१ गावातील वा नगरातील जमिनीच्या सीमांचे रक्षण
२ गावाच्या व नगराच्या सीमेचे चोर व दरोडेखोरांपासून रक्षण
३ गावातील वा नगरातील शिवमंदिराचे रक्षण मूर्तीचे रक्षण दागिन्यांचे आणि खजिन्याचे रक्षण
४ गावात व नगरात आलेल्या व्यापाऱ्याच्या व्यापारी मालाचे रक्षण
५ गावातील व नगरातील नागरिकांच्या सर्व संपत्तीचे रक्षण
६ गावाच्या वा नगराच्या संरक्षक भिंतीचे रक्षण तटबंदीचे रक्षण व निर्माण व दुरुस्तीही
७ गावातील वा नगरातील रस्त्यांचे संरक्षण व त्यांची देखभाल
८ गावातील व नगरातील शासकांच्या गुप्त व प्रकट संदेशांचे रक्षण व देवाणघेवाण निसर्गयुगात अनेकदा पंचमतीलच कुणीतरी शासनप्रमुख असे
९ गावातल्या वा नगरातल्या कुणाही मृत देहाची चिकित्सक चाचपणी व तपासणी त्याचा खून वा हत्या तर झालेली नाहीये ना ह्याची पडताळणी करणे व ही पडताळणी झाल्यानंतर जे कापड त्या मृतदेहावर टाकण्यात येई त्याची निर्मिती करणे हे कापड पडले कि मग मृत देहाचे संस्कार होत त्याशिवाय अंतिम संस्कार करण्याची अनुमती नसे
१० गावातील स्त्रियांच्या अब्रूचे व सामानाचे रक्षण
ही कामे नीट करायची तर खुद्द ही जमात अपरिग्रह व अचौर्य ह्यांचे पालन करणारी सत्य बोलणारी स्वतःच्या हितसंबंधाला बळी न पडता गावात हिंसा न करणारी व कामवासनेवर संयम असणारी असणे आवश्यक असे त्यामुळेच पंच यमाचे पालन करणे हा तिच्या जीवनशैलीचा भाग होता म्हणूनच इतिहासात एकाही महाराने चोरी वा बलात्कार वा फसवणूक केल्याचा उल्लेख १९ व्या शतकापर्यंत मिळत नाही
अचौर्य आणि हिसंक शक्तीपासून रक्षण करून गावात व नगरात अहिंसेचा तोल सांभाळणे हे ह्या जमातीचे काम होते असे म्हणता येईल
त्याबदल्यात त्यांना गांवाबाहेरची व सीमेवरचीं शेतजमीन व कुरणजमिन मिळत असे शिवाय गावातल्या शेती व व्यापारी उत्पन्नावर काही टक्के हक्कही मिळे दुर्देवाने पुढे वैदिकांनी स्वतःची सत्ता प्रस्थापित केल्यावर त्यांचे हक्क कापायला सुरवात केली
श्रीधर तिळवे नाईक
(मूळ इंग्रजी ग्रंथातील प्रकरणाचे संक्षिप्तीकरण )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा