सिंधू सभ्यता आणि दलित , अस्पृश्य वा पंचम समुदाय
पंचम समुदाय आणि निसर्गयुग
पंचम समुदाय हा विसाव्या शतकात घमासान वादाचा विषय बनला असला तरी आणि हा समुदाय सध्याचा सर्वाधिक जागृत समुदाय म्हणून वाटचाल करत असला तरी सर्वच विचारवंतांच्या दृष्टिकोनात एकमत आढळते ते म्हणजे निसर्गयुगात हा समुदाय अस्तित्वात न्हवता तो अस्तित्वात आला तो निसर्गयुगानंतर !कपिल , महावीर , बुद्ध ह्यांनी सुरु केलेल्या विश्वीय युगात व युगानंतर !प्रश्न असा आहे कि सत्य काय आहे ? आणि ह्या सत्याची चर्चा का टाळण्यात येते ?
माझ्या मते हा समुदाय फार प्राचीन काळापासून शैवांच्यात उपस्थित होता पण मुळात शैवांचे अस्तित्वच अमान्य करण्याच्या आगमिक व नैगमिक प्रवृत्तीतून हे घडले आहे आणि ह्याला जबाबदार खुद्द शैव आहेत बहुतांशी ओबीसी असलेला हा समुदाय अजूनही पुरता जागा झालेला नाही अर्थात अपवाद महात्मा फुलेंमुळे जागृत झालेला माळी समाज आणि होळकरांच्यामुळे जागृत झालेला धनगर समाज उरलेला अद्याप स्वतःचेच विश्लेषण करत नाही तिथे इतर समाजाची चिकित्सा काय करणार ?
दुसरी गोष्ट खुद्द पंचम समुदायाला आपली मूळ ओळख माहित नाही आणि जी ओळख माहित आहे ती एकतर घृणास्पद आहे किंवा मग बाबासाहेब आंबेडकरांनी पुरवलेल्या बौद्ध ओळखीवर आधारित आहे बौद्ध ही ओळख इसवीसनपूर्व सहाव्या शतकात बुद्धाबरोबर सुरु होते पण त्याआधी काय ह्याचा पुरेसा उलगडा बाबासाहेबांनी केलेला नाही त्यामुळे वैदिकतेचे गुलाम मग बौद्ध मग बौद्ध असल्याची सजा म्हणून अस्पृश्यता आणि ह्या अस्पृश्यतेविरोधात बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बंड अशी ही मांडणी आहे ह्या मांडणीची परखड समीक्षा अजूनही झालेली नाही ह्याबाबत बाबा वाक्यम प्रमाणम हीच बहुतेक आंबेडकरवाद्यांची मानसिकता दिसते
ह्या मांडणीने पंचमासंदर्भात एक वेगळाच संघर्ष अधोरेखित केला आहे हा संघर्ष हिंदू -वैदिक विरुद्ध बौद्ध असा आहे आणि ह्याच संघर्षातून ते आत्ताच्या मांडण्याही करतात . हिंदू हे त्यांना शत्रू वाटतात आणि सर्व हिंदूंचे बौद्ध होण्यात कल्याण आहे विशेषतः ओबीसींचे कल्याण आहे अशी ही मांडणी आहे
तिसरी मांडणी ही शरद पाटलांची माफुआवाद म्हणून प्रचलित आहे त्यांनी बुद्धाचा कैवार घेतलाय खरा पण बुद्धाने जातिव्यवस्थेला प्रागतिक उत्पादनाचा टप्पा म्हणून उत्तेजन दिले अशी मांडणी केली जिच्यामुळे आंबेडकरवाद्यांच्यात उडालेली खळबळ अद्यापही शांत झालेली नाही
पंचम म्हणजे काय ?
मधुकर उपाध्याय ह्यांचे एक पुस्तक आहे नाव आहे ''१९१५ गांधी एक खामोश डायरी ''! त्यात त्यांनी पंचम म्हणजे काय हे सांगताना '' दक्षिण भारतकी इस यात्राके दौरान गांधी की भेट पंचम समुदाय के लोगोंसे हुई। पंचम याने समाजके चार वर्णोंसे बाहरके लोग। ''अशी जी व्याख्या दिली आहे ती त्या काळाची वस्तुस्थिति दर्शवणारी आहे ह्या काळात गांधीजी कुंभ मेळ्याला अवडंबर आणि अस्पृश्यतेला कसलाही धार्मिक आधार नाही असे मानणारे व दक्षिण आफ्रिकेत सर्वांच्याबरोबर जेवण करणारे क्रांतिकारक विचाराचे होते पुढे ते भारतात आल्यावर देशीवादी झाले आणि थोडे मागे आले आणि पुन्हा मार्गी होऊन १९४० नंतर क्रांतिकारक झाले
पंचम हा शब्द ह्याकाळात वापरात होता आणि पुढे गांधीजींनी हरिजन हा शब्द आणला हा शब्द आंबेडकरांना मान्य होणे शक्य न्हवते त्यांनी अस्पृश्य हाच शब्द वापरला आणि पुढे ह्या समुदायासाठी दलित हा शब्द प्रचलित झाला ह्या सगळ्या धबडग्यात पंचम हा शब्द पांच वा पंच ह्या आकड्याशी जुळवून तो पाचवा वर्ण होता अशी
गैरसमजूत करून घेऊन हवेत सोडून दिला गेला आणि आजतागायत तो हवेतच तरंगत आहे
आंबेडकरांनी हा समुदाय व अस्पृश्य हा शब्द वर्णजाती अभ्यासाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणला हे त्यांचे वैचारिक योगदान कुणालाही अमान्य करता येणार नाही पण त्याचा अर्थ तो चर्चेबाहेर होता असे नाही मी ज्या कोल्हापूर शहरात जन्मलो तिथे आंबेडकरांच्या कित्येक वर्षे आधी शिवराम जनाबा कांबळे ह्यांनी पंचम जागृतीचे काम सुरु केले होते गोपाळबुवा वळंगकर , ज्योतिबा भोंसले , राजारामशास्त्री भागवत ह्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता पंचमजागृतीसाठी १९०२ सालापासून त्यांनी दीनबंधू आणि मराठा ह्यांच्यात लेखन सुरु केले होते नोव्हेंबर १९०२ मध्ये त्यांनी सासवडमध्ये तब्बल ५१ खेड्यातील महारांना एकत्र आणून पहिली महार परिषद भरवली होती अस्पृश्यांच्यावतीने दाखल केल्या गेलेल्या पहिल्या पेटिशनचा मसुदा ह्या परिषदेत तयार झाला आणि पोलीस व मिलिटरीत अस्पृश्यांना पुन्हा दाखल करून घेण्याची मागणी करण्यात आली मुरळी प्रथेविरोधातही त्यांनी आवाज उठवला होता आणि ह्या सर्व मागण्या ''अस्पृश्य '' समुदाय म्हणून करण्यात आल्या होत्या अस्पृश्य हा शब्द त्यामुळे चळवळीत रुजला पुढे बाबासाहेबांनी अस्पृश्य अनटचेबल हाच शब्द प्रमाण मानला आणि तो प्रचंड वापरात आला ह्यामुळे कुणालाही पंचम ह्या शब्दाची पाळेमुळेही शोधावीशी वाटली नाहीत
ह्या शब्दाची पाळेमुळे शोधण्याची निकड निर्माण झाली ती १९८० नंतर ! ह्या काळात ओबीसी जागृत व्हायला लागले आणि त्यांची पाळेमुळे खणायला लागले . स्वतःच्या घरात असलेल्या शैव परंपरांचा मागोवा घेणे गरजेचे बनू लागले त्यातच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे शैव होते हे सर्व पुराव्यानिशी सिद्ध होऊ लागले आणि आपली मूळची शैव परंपरा ही ब्राह्मणी नाही हे स्पष्ट व्हायला लागले खंडोबा आणि भवानी अंबा आणि जगदंबा ज्योतिर्लिंगे आणि अमरनाथ ह्यांना प्रचंड गर्दी जमायला लागली ह्यातूनच शैव आचार्यांना प्रथमच व्यापक प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला माझे स्वतःचे घराणे हे शैव पुजाऱ्यांचे आणि आचार्यांचे ! साहजिकच नवीन ओबीसी तरुण आम्हाला नवे प्रश्न विचारू लागले त्यातील एक प्रश्न ओबीसी कोण आहेत आणि आम्ही बीसींशी कसे वागायचे ? हा असायचा अपवादात्मक वेळा ही पंचम नावाची भानगड काय आहे असाही प्रश्न येई . हा प्रश्न ऑब्व्हियस आहे कारण तो बीसी आणि आदिवासी ह्यांच्यासाठी प्रचलित असलेला शैव शब्द आहे आणि म्हणूनच मीही तो वापरत आहे
सर्वात पहिला प्रश्न पंचम हा शब्द आला कुठून ? ह्यातील पंच हा शब्द पांच ह्या आकड्याशी निगडित आहे हे स्पष्ट आहे पण म म्हणजे काय ? तर म म्हणजे यम आणि नियम ! शैव योगात तुम्ही मोक्ष मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला कम्पलसरी पाच नियम आणि पाच यम पाळावे लागतात
हे पाच यम कोणते ?
१ सत्य
२ अचौर्य
३ अहिंसा मानव रक्षण
४ कामसंयम लोकांच्या बायकांच्या अब्रूचे रक्षण त्यांच्या सामानाचे रक्षण
५ अपरिग्रह
पाच नियम कुठले ?
१ निर्मळता
२ शुद्धता
३ स्वाध्याय
४ तप
५ शुद्धता
हे पाच यम व नियम मिळून जे बनतात ते पंचम आणि ह्या पाच म्हणजे पंच यम आणि नियमाची सामाजिक अंमलबजावणी करणारे जे लोक होते ते पंचम होत आणि शासकसमूहात जे शासक होते ते पंच होत पंच आणि पंचम ह्यांच्याकडे मिळून शैव कायदा आणि सुव्यवस्था होती आणि तिचा आधार हे पंच यम व नियम होते इंडियात आजही ह्या व्यवस्थेचे पडसाद आहेत फक्त पंचमांना मात्र आपण अतिशय वाईट वागणूक देतोय
निसर्गयुगात पंच आणि पंचम ह्या दोघांनीही हे यमनियम पाळणे आवश्यक होते ह्या व्यवस्थेत पंच आणि पंचम हे दोघेही निवडले जात मात्र सर्वसाधारण पणे अनेकदा विश्वासार्हता प्राप्त झालेले लोक पुन्हा पुन्हा निवडले जात .
सर्व पंचम हे योद्धे होते आणि शिवाचे आणि गावाच्या व गावातील , नगराच्या व नगरातील शिवेचे म्हणजेच सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची होती मी त्यांच्यासाठी क्षत्रिय हा शब्द वापरत नाही कारण तो वर्ण आहे आणि त्याचा उदय निसर्गयुगात झाला न्हवता पंचम हा वर्ण नाही तर तो कुणालाही खुला असलेला समुदाय होता व आहे अनेकांना धक्कादायक वाटेल पण भारतीय पोलीस आणि भारतीय लष्कर ह्यांचा समावेश शैव परंपरेनुसार पंचम समुदायात होतो हे एकदा स्पष्ट झाले कि भारतीय अस्पृश्य किंवा दलित वाघासारखे चवताळून का उठतात ते सहज लक्ष्यात येईल फार प्राचीन भाषेत सांगायचे तर ते त्यांच्या जीन्समध्ये आहे आणि भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी हा जीन सतत जिवंत व सळसळता राहणे आवश्यक आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा