लिखित आणि मौखिक श्रीधर तिळवे नाईक
भारतीय इतिहासाची साधने हा एक कायमच गोंधळाचा विषय आहे ह्याला जबाबदार लिखित पुराव्याचा शैवांच्याबाबतीतला दुष्काळ !
शैव समाजरचनेचा आणि पूजाविधींचा सर्वात घातक परिणाम जर कुठला असेल तर तो म्हणजे लिखित लिपीला दिलेला नकार आणि मौखिकतेचा केलेला पुरस्कार ह्याला दोन गोष्टी जबाबदार असतात

१ केंद्रीय राज्यशासन तेही घराणेशाहीवादी स्वतःची सत्ता मजबूत करण्यासाठी स्वतःच्या कथा लिखित करते स्वतःचे घराणे लिखितद्वारा ग्लॅमरस करते त्यामुळे लिखित संहिता ह्या अनेकदा सत्तेचे सातत्य निर्माण करण्याच्या राजकारणाच्या भाग असतात उदाहरणार्थ ईजिप्तमधील फराहो
२ कट्टर जमातवाद स्वतःच्या परंपरा , ज्ञान आणि अनुभव ह्यांचा मागमूस इतरांना लागू नये म्हणून सर्व काही पाठांतर पद्धतीने जतन करते उदाहरणार्थ वैदिक
शैवांच्यात ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव त्यामुळे आगमांचे वैदिकांप्रमाणे पाठांतर नाही आणि शैव राज्यात ती प्रामुख्याने गणराज्ये असल्याने ना राज्याने ना लोकांनी लिखिताची उपासना केली ना जोपासना त्यामुळे मेसोपोटोमियन वा सुमेरियन संस्कृतीचे जसे टॅब्लेट्स मिळतात तशे टॅब्लेट्स इंडस व्हॅली सभ्यतेचे मिळत नाहीत जे सीलवर आहे ते सिम्बॉलिक भाषेतले आहे जे कळणे अवघड आहे
त्यातून दोन प्रॉब्लेम तयार होतात १ पहिला लिखित लिपी ही कसोटी लावून इंडस सभ्यता ही सभ्यताच न्हवे असे म्हणता येते आणि ह्या सगळ्या कालखंडाला सभ्यतापूर्व कालखंडात घालता येते ह्यातला हलकटपणा उघडच आहे म्हणजे लिखित ही सभ्यतेची कसोटी तुम्हीच ठरवणार आणि ह्या कसोटीच्या आधारे एक सभ्यता पूर्ण नाकारणार हे म्हणजे पूर्वी गोरे लोक स्वतःला थोर समजायचे तसे झाले म्हणजे काय तर त्वचेचा गोरा रंग ही कसोटी गोरे लोकच ठरवणार आणि ज्यांच्याकडे गोरा रंग नाही ते मागासलेले असे निकष लावून काळ्यांना मागासलेले म्हणणार मूळात लिखित ही सभ्यतेची फक्त एक कसोटी आहे एकमेव कसोटी नाही दुसरी गोष्ट तुमच्या ह्या तथाकथित सभ्यता सभ्यताच न्हवेत माजोरड्या राज्यशासन आणि धर्मांनी उभी केलेली ती एक अंधश्रद्धात्मक विशाल महाभीषण शोषणयंत्रणा होती इंड्सने असली शोषणयंत्रणा उभी केली नाही हे बरेच झाले
लिखित लवचिकता गमावते आणि सर्व गोष्टींना ताठर करते उग्र करते तर मौखिक महायंत्रणा निर्माण करण्यात यशस्वी होऊन अंतिमतः अराजक आणि केऑस निर्माण करते भारतात शैवांच्याबाबत ह्याचे वारंवार प्रत्यय येतात
भारतात पुढे खरोष्टी व तामिळसदृश्य लिपी निर्माण झाली आणि पुढे ब्राह्मी आणि तामिळ आणि त्यांनी हळूहळू केंद्रीय सत्ता जन्माला घातल्या पण ह्या काळातही मौखिकतेवरचे भारतीयांचे प्रेम कमी झाल्याचे दिसत नाही त्यामुळे वेद वा आगम खरोष्टी लिपीत सापडत नाहीत ब्राह्मी लिपीनंतर मात्र लिखित परंपरा सेटल झाली आणि देवनागरी लिपीत तिची भरभराट झाली
दक्षिणेत तामिळ ब्राह्मीपासून मराठी मोडी पर्यंत लिप्या भरभराटीला आल्या आणि राजवटीही
ह्याचा एक दुष्परिणाम असा आहे कि इसवीसनपूर्व ३०० च्या आधीचा इतिहास हा फारच धुकाळ होतो आणि शैवांच्या बाबतीत तो अधिक धुकाळ होतो
२ दुसरा प्रॉब्लेम म्हणजे मौखिक लोक हे दुसऱ्या टोकाला जाऊन लिखित भाषेची चेष्टा उडवायला लागतात स्वतःच्या उणिवेवर जाणीवपूर्वक घातलेले हे पांघरून असते वास्तविक आपले वाङ्मय फक्त मौखिकतेमुळे तिच्या आग्रहामुळे नीट संघटित झाले नाही ह्याची लाजच वाटायला हवी पण ही न वाटता मौखिकतेचे फालतू कौतुक सुरु होते आणि मग शास्त्रीय , वैज्ञानिक , तंत्रवैज्ञानिक , चिन्हवैज्ञानिक ग्रंथ निर्माण करणे थांबते आणि त्यांना घरघर लागते आणि संपूर्ण समाजाची फरफट सुरु होते सगळी संस्कृती कलाकेंद्री बनते आणि बोलबच्चन राजकारणी व पत्रकारांनी गजबजून जाते वक्ते आसमंत भारावून टाकतात विचारवंत अडगळीत जातात विनोदपुरुष संस्कृतीचे लोहपुरुष वा तारकापुरुष होतात अभिनेत्यांना साहित्य संमेलनात केंद्रस्थान मिळायला लागते ब्राह्मण्यवाद फोफावतो मंत्र , कानमंत्र आणि टिप्स ह्यांना गूढतेचे वलय प्राप्त होते शेरे आणि ताशेरे मानणारे लोक सांस्कृतिक पुढारी होतात साठोत्तरीने मौखिकतेला आधुनिकच्या लिखित महारचनेच्या विरोधात उभे करून मौखिकतेचे एव्हढे आवड्म्बर माजवले कि मौखिक म्हणजे काहीतरी दैवी आहे अशी अपधारणा पसरली युरोपियन आधुनिकच्या विरोधात लढण्यासाठी हे एक आवश्यक हत्यार आहे ह्या गैरसमजातून लिखित प्रमाण भाषेची टवाळी करणे ही तर आपली सांस्कृतिक खोड आहे कि काय असेच सध्या वातावरण आहे वास्तविक जे बोलीत आहे ते लिखित लिपीत आणणे हे साहित्यात व्हायलाच हवे पण संपूर्ण संस्कृती अश्या तऱ्हेने उभी करण्याचा प्रयत्न करणे ही ज्ञानात्मक आत्महत्या असते शास्त्र , मानवशास्त्र , विज्ञान , तंत्रज्ञान आणि चिन्हविज्ञान हे प्रमाण भाषेतच उभे करावे लागते कला हीच फक्त मौखिकतेच्या साहाय्याने उभी करता येते पण समाज म्हणजे कला न्हवे किंबहुना समाजाच्या संदर्भात कला आणि धर्म ह्यांचा लीड रोल केव्हाच सम्पला आहे आणि त्यामुळे मौखिकतेचाही लीड रोल फक्त धर्मप्रधान समाजांचा विशेष आहे आणि २१ व्या शतकात हा त्यांचा मागासलेपणा आहे हे ठणकावून सांगण्याची वेळ आता आली आहे
आजही भारतात मौखिकतेमुळे हे मागासलेपण वारंवार घडते आहे फरक इतकाच आहे कि पूर्वी बोलीत हे जेव्हा फक्त मौखिक होते तेव्हा ते नाहीसे व्हायचे पण प्रतिसृष्टीत अचानक हे बोलीत मुद्रित झाले तर चिन्हसृष्टीत
डिजिटलीत झाले ह्यामुळे पुन्हा एकदा बोलबच्चन लोकांचा धुमाकूळ सुरु झालाय पण ह्याने आपल्या इतिहासाला फारसा फायदा नाही फक्त नवीन पुराव्याचे डिजिटलणे वाढल्याने त्याचे प्रक्षेपित व्हर्जन वाढलेत इसवीसनपूर्व तीनशे वर्षांपासून मात्र आपल्या अनेक संहिता उपलब्ध होतायत आणि इतिहासकारांचे आणि भूतकाळकारांचे काम तुलनेने सोपे होते
मी माझ्याच घरची गोष्ट सांगतो माझ्या घरी नकुलीश दर्शनाची परंपरा पूर्णपणे मौखिक त्यामुळे आपले पूर्वज काय करायचे हे सांगणे कठीण कोकणी किंवा कन्नड भाषेत जे काही होते ते आमच्या उपयुक्ततावादी मावशीने निरूपयोगी म्हणून जाळलेले ज्या गुजरात महाराष्ट्र कर्नाटकात नकुलीशान्चे कार्य होते तिथे संहिता लकुलीश नावाच्या त्यांच्या शिष्याचा नावाने प्रचलित केलेल्या आणि ब्राह्मणांनी लकुलीश व नकुलीश हे एकच असा सातत्याने प्रचार करून पूर्ण पाशुपत दर्शन हायजॅक केलेले अश्यावेळी एकतर पुरावा तुमच्या बाजूने हवा हा पुरावा शेवटी मला मिळाला सर्वदर्शनसंग्रहात त्यात पाशुपत दर्शन नकुलिशाने मांडले ही मांडणी मिळाली त्यावर एक स्वतंत्र प्रकरण मिळाले आणि निदान आपले पूर्वज ज्याच्यावर विश्वास ठेवत तो अस्तित्वात आहे ह्याचा पुरावा मिळाला नाहीतर ग वा तगारेंनी शैव दर्शन ह्या पुस्तकात लकुलीशालाच पाशुपत दर्शनाच्या स्थापनेचे तो ब्राह्मण असल्याने श्रेय दिलेले ! जर सर्वदर्शनसंग्रह हे पुस्तक उपलब्ध नसते तर !ब्राह्मण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नावाने कॅश करायला बघतात ही वस्तुस्थिती आणि त्यांना ही संधी मिळते कारण ब्राह्मणेतर भारतीयांचे मौखिक प्रेम ! हे प्रेम आपण जितक्या लवकर त्यागु तितके बरे ! बोलीभाषा केंद्रीय भाषा झाली कि पुराव्याचा अभाव निर्माण करते आणि पुराव्याशिवाय सर्वच गोष्टी फिजूल ठरतात त्यामुळे ओरल ट्रॅडीशनच्या भानगडीत बहुजन समाजाने पडू नये असे माझे स्पष्ट मत आहे प्राचीन इतिहासापुरते विशेषतः निसर्गयुगापुरते तिला महत्व द्यावे
विश्वीय युगात मात्र मौखिकतेबरोबर लिखित संहिता , शिलालेख आणि नाणी सापडतात ती नसती तर ब्राह्मणेतरांचा इतिहास तरी आपणाला कळला असता का असा आता प्रश्न पडतो अर्थात लिखित हे शस्त्र कधीकधी ब्राह्मणांच्यावर उलटलेलेही दिसते म्हणजे संस्कृतबद्दलचे लिखित पुरावेच न सापडल्याने ही भाषा इसवीसनपूर्व तीनशेनंतर उदयाला आली असे आता म्हणता येते त्यात भरीसभर म्हणजे वेदाची सर्वात जुनी प्रत तामिळनाडूमध्ये सापडल्याने वेद हे दक्षिण भारतीय होते काय असाही प्रश्न निर्माण करता येतो त्यामुळे संस्कृत ही सर्वात प्राचीन भाषा वैग्रे ही गृहीतके कोलमडतात माझे स्वतःचे मत हे वाकणकरांशी जुळते ते म्हणतात त्याप्रमाणे वेद हे गोदावरी वा नर्मदेकाठी निर्माण झालेले असावेत माझ्या मते संस्कृत ही भारोपीय व द्रविड महाराष्ट्री ह्यांच्या संकरापासून जन्मलेली असावी संस्कृतचे व्याकरण तामिळ व महाराष्ट्री भाषेतून येण्याचे तेच कारण असावे आणि ब्राह्मण वैग्रे शब्द त्यामुळेच तामीळमधून संस्कृत भाषेने उचललेले असावेत शिवाय गोंड भाषेतले शब्द संस्कृतमध्ये जाण्याचेही तेच कारण असावे ज्या वैदिक ऋषींना उठसुठ मराठी लोक शिव्या घालतात ते बहुधा गुजराती आणि मराठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही वेदातील सरस्वती म्हणजे अफगाणिस्तानातील वा राजस्थानातील कुठलीतरी नदी नसून विद्येची उपासना जिथे चालते अशी कुठलीही नदी असावी तर गंगा म्हणजे कुठलीही नदी असावी त्यामुळेच गंगा हा प्रत्यय भारतातल्या अनेक नद्यांना लागत असावा म्हणजे कोल्हापूरची पंचगंगा म्हणजे पंचनदी वैग्रे अर्थ होतात वेदातले अश्व हे त्याकाळात फक्त महाराष्ट्रातच समुद्रपर्यटनामुळे उपलब्ध होते किंवा वाकणकर म्हणतात त्याप्रमाणे अश्व ह्या शब्दाचा अर्थ खळाळता प्रवाह असा असावा ही गोष्ट स्वीकारली कि अनेक धक्के बसणे अटळ आहे मराठीची आणि संस्कृतची लिपी देवनागरी बनत जावी हा योगायोग नाही असे त्यामुळे म्हणता येते मुळात संस्कृतची लिपी देवनागरी ही नंदनागरी / नंदीनागरी ह्या दाक्षिणात्य लिपीपासून तयार झाली आहे आणि ती सरळ सरळ शिवाचे वाहन नंदीपासून तयार झाली आहे प्रश्न असा आहे कि नंदी हे केवळ घराणे होते कि शिवाचे वाहन म्हणजे लिखित लिपी होते ?शिव हा द्रविडांचा, नागांचा आणि गोंडांचा देव आहे त्यामुळे नंदीनागरी लिपीचा इतिहास मध्य व दक्षिण भारतात शोधणे अधिकच गरजेचे बनते . ह्यातूनच संस्कृत नाटकात सुरवातीला जे नांदी म्हंटले जात असते ती ह्या मूळ नंदी भाषेला/लिपीला दिलेली सलामी आहे काय असाही प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्रात सातवाहनापुर्वी जे साम्राज्य होते ते कान्व होते ज्यावरून पुढे कदाचित कान्हा बनला असावा व ह्या कान्हाचे पुढे कृष्ण असे संस्कृत रूप बनले असावे . यादव हे मूळचे गुज्जू-मराठी होते असे माझे स्पष्ट मत आहे दुष्काळामुळे वा अतिवर्षणामुळे त्यांनी उत्तरेकडे स्थलांतर केलेले असावे तिथे त्यांना नंदांनी आश्रय दिला असावा पुढे त्यातील काही पुन्हा द्वारकेत परत आले असावेत . ह्या यादवांनीच नंदीनागरी लिपी उत्तरेत न्हेली असावी यादव मूळचे शिवभक्त होते हे लक्ष्यात घेता हे अशक्य नाही . ह्या पार्श्वभूमीवर फक्त गुजरातमध्येच जय श्रीकृष्ण हे एव्हढे जोरात का हे सहज लक्ष्यात यावे .
दुसरी एक शक्यता आपण नेहमीच गृहीत धरतो ती म्हणजे स्थलांतर हे भूमीवरूनच होते वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे भारतात अगदी यूरोपियनसुद्धा समुद्रमार्गे भारतात उतरले आहेत त्यामुळे ज्यांना आपण सुरासुर म्हणतो ते कदाचित प्रथम समुद्रमार्गे गुजरात व महाराष्ट्रात उतरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्या प्रथम उतरलेल्या लोकांनी कदाचित नंतर गुजरात महाराष्ट्रात वेद लिहिले असावेत आणि समुद्रामार्गेच ते सिन्धपंजाबमधे केरळ तामीळमध्ये पोहचले असावेत आणि समुद्र वा भूमीमार्फत कर्नाटक आंध्रात ! वेदात समुद्राचे जे उल्लेख येतात ते बघता आणि वैदिकांचा नंतरचा मुख्य देव विष्णू समुद्रातच पहुडलेला आहे हे लक्ष्यात घेता हे सहजासहजी नाकारता येणे अशक्य आहे शिवाय लक्ष्मी ही मूळची गुजराती जैन शैवांची धनदेवता आहे ते बघता तिचा नवरा एकदम उत्तरेतील असेल असे वाटत नाही त्यामुळे वेद प्रथम नंदनागरी वा तत्सम लिपीत पहिले लिहिले गेले असावेत व मग देवनागरी लिपीत ते अधिक शास्त्रशुद्ध भाषेत परिणीत केले गेले असावेत पुढे यूरेशियातून आलेल्या टोळ्यांनीही ते स्वीकारले असावेत
तिसरी एक शक्यता अशीही आहे कि जे समुद्रमार्गे आले ते असुर व भूमिमार्गे इथलेच स्थलांतरित होते ते सूर अशी विभागणी असावी आणि असुरांनी लिहिलेला अथर्ववेद हा पहिला दाक्षिणात्य असुरवेद असावा जो नष्ट झाला असावा पण त्याच्यावर आधारित आत्ताचा अथर्ववेद बेतलेला असावा आणि सूर असुर संघर्ष हा मुळात दाक्षिणात्य विरुद्ध उत्तरी वा सामुद्री विरुद्ध भूमिप्रधान असा असावा . त्यामुळेच अथर्ववेदाला मान्यता द्यायला एव्हढी खळखळ केली गेली असावी शिवाय समुद्रमंथनासारख्या कथा समुद्राच्या अस्तित्वाशिवाय सूचाव्यात कशा ?
मुस्लिम कालखंडानंतर मात्र लिखित पुरावे व संहिता वाढत जातात आणि ब्रिटिश कालखंडात तर ढीगभर पुरावे मिळतात त्यामुळे तुलनेने ह्या कालखंडातील भूतकाळ जाणणे सोपे जाते
(हे मूळ इंग्लिश ग्रंथातील एका प्रकरणाचे मराठी संक्षिप्तीकरण आहे )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा