बहुयथातथ्यवाद  आणि एकजालवाद 
सत्य हे शब्दाबाहेर असते चिन्हाबाहेर असते त्यामुळे ते चिन्हांना प्राप्त होण्याची शक्यता नाही पण वास्तव मात्र चिन्हात आणता येते पण वास्तव आपणास संपूर्ण दिसत नाही त्यामुळे जे वास्तव दिसते ते तथ्य असते आणि आपण सर्व आपल्या आपल्या तथ्यांच्या आधारे बोलत असतो . मात्र ही सर्व तथ्ये एका वास्तवासंदर्भात आहेत ह्याची आपणाला कल्पना असते हे जे दिसणारे तथ्य असते तेही संपूर्णपणे चिन्हात व्यक्त होत नाही किंवा करता येत नाहीत त्यामुळे आपण सर्व आंशिक तथ्यांच्या आधारे एकमेकांशी बोलायला लागतो ह्यांना आपण यथातथ्ये म्हणतो फेसबुक हे यथातथ्यांचे भांडार म्हणून आपल्यापुढे सादर होत असते आणि ह्या यथातथ्यांच्या वरून आपण हमरीतुमरीवर येऊन भांडत असतो जे अनेकदा विनोदी वाटायला लागते . डिजिटल युगांचा इतिहास हा यथातथ्यांचा इतिहास असतो आणि तो अनेक आवाजात बोलत असतो आंबेडकरवादी आवाज हिंदुत्ववादी आवाज शैव आवाज आगमवादी आवाज असे अनेक आवाज सतत निनादत असतात आणि त्यातून प्रचंड मोठा कोलाहल निर्माण होत असतो हा कोलाहल अनेकदा कर्कश म्हणावा इतका वाढत जातो आणि कानात तेलासारखा खरखर सोडत राहतो अशावेळी अत्यंत विवेकाने तो एकवटावा लागतो . कुणाकुणाचे कायकाय अजेंडे आहेत ते नीट तपासावे लागते अन्यथा आपल्या हातातून खोटी भूतजालकी निर्माण होण्याची शक्यता असते 
पोस्टमॉडर्निझमने वस्तुनिष्ठ इतिहासाची संकल्पना मोडीत काढून सर्व इतिहास रचलेले असतात हे सिद्ध केले त्यातून महात्मा फुल्यांच्यापासून बाबासाहेब आंबेड्करांच्यापर्यंत सर्वांचे इतिहास रचलेले इतिहास होतात का असा प्रश्न निर्माण होतो पण मराठी संस्कृती हा प्रश्न विचारायला घाबरते कारण मराठी संस्कृतीला पोस्टमॉडर्निझम झेपलेला नाही मराठी ही आधुनिक इतिहासात अडकून पडलेली संस्कृती आहे आजही तिची मजल आयडियॉलॉजीच्या पलीकडे जात नाही खरेतर इतिहासाबाबत आपण सर्वच मुलखाचे घाबरट झालो आहोत फुले मार्क्स रॉय  आंबेडकर गांधी नेहरू शाहू हे  आपले आधुनिक देव नवीन पुराव्याच्या उपलब्धतेमुळे कोसळून पडतील आणि कालबाह्य ठरतील अशी भीती आपल्या वाटते आणि ही भीती ऍडमिट करण्याचीही आपल्याला भीती वाटते 
चौथी नवता पोस्टमॉडर्निझमच्या इतिहास हा रचित असतो ह्या गृहीतकाला फक्त एक शक्यता म्हणून पाहते आणखी एक यथातथ्यता म्हणून पाहते आणि त्याचा वापर करून इतिहासातील काय रचित आहे काय फेक आहे आणि काय वास्तवाच्या अधिक जवळ आहे ते नीट अभ्यासते आणि इतिहास एक जाळं एक नेट म्हणून सादर करते हे करताना डीजीयुगाच्या साधनसामुग्रीचा उचित वापर करते आणि सर्व यथातथ्यतेचे जाळे सादर करते मी ह्या सादरीकरणाला भूतजालकी म्हणतो मी स्वतः मराठी वाङ्मयाचा इतिहास अशा तऱ्हेने सादर केला आहे ह्या सादरीकरणाची तऱ्हा ही चॅनेल्सच्या सादरीकरणाशी जुळते पण ती चँनेल्ससारखी टीआरपीकेंद्रित होत नाही तर वास्तवकेंद्रित होते आणि वास्तवाची अनेक यथातथ्यते ती सादर करते . 

मराठीला अजूनही चौथी नवता पचत नाही हे मराठीचे दुर्देव !

श्रीधर तिळवे नाईक 






















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट