भीमा कोरेगाव संघर्ष श्रीधर तिळवे नाईक
भीमा कोरेगाव संघर्ष श्रीधर तिळवे नाईक
भीमा कोरेगाव संघर्षातून दलित समाजाने चार गोष्टी जाहीर केलेत
१ महार समाज हा पूर्वापार योद्धयांचा समाज राहिला आहे आणि त्याचा लडाकूपना अजूनही जिवंत आणि सळसळता आहे
२ तो वर्णव्यवस्था मानत नाही आणि वर्णव्यवस्थेचा अंत घडवून आणणे हे त्याचे मिशन आहे तो वर्णव्यवस्था मानत नसल्यानेच अत्यंत आदराने त्याने छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे संस्कार केले वा करायला मदत केली
३ ह्या मिशनची सुरवात १८१८ साली पेशवाईचा अंत करताना झाली ह्या लढाईत तो इंग्रजांच्या बाजूने लढलो ह्याचा त्याला अभिमान आहे . जी लढाई इतरांच्यासाठी राजकीय होती ती त्यांच्यासाठी सामाजिक होती
४ जर नवी पेशवाई घेऊन कोणी येणार असेल तर तिचाही अंत केल्याशिवाय तो गप्प बसणार नाही
ह्या वैचारिक चौकटीत आक्षेपार्ह काय आहे हे मला आजतागायत समजलेले नाही
श्रीधर तिळवे नाईक
संतोष पद्माकर , मिलिंद ही पोस्ट टाकताना मला दलित हाच शब्द वापरायचा होता पण पूर्वापार योद्धे असणे हे वैशिष्ट्य सर्व दलितांना लागू नाही दुसरी गोष्ट दुसऱ्या बाजीरावां विरुद्धच्या लढाईत सर्व दलित सामील न्हवते माझ्या मर्यादित अभ्यासानुसार फक्त महारच ह्या लढाईत सामील होते त्यामुळे लिहिताना चांगलीच गोची झाली आणि ही गोची कशी दूर करायची म्हणून हा प्रश्न आला . इतिहासावर लिहिताना ही गोची अटळ आहे . तरीही शब्द बदलतो आहे
जोवर ह्या देशात वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था आहेत तोवर कधीही पेशवाई येण्याची शक्यता शाबूत राहते पेशवाई तरी मनुस्मृती आणेल असे पहिल्या बाजीरावांपर्यंत कुठे वाटले होते पण शिवाजींनी पाया घातलेल्या शैव राज्याला शिखरावर पोहचवणाऱ्या पहिल्या बाजीरावाला त्याने केवळ आंतरधर्मीय लग्न केल्याने विरोध करून नंतर पाठीमागून पेशवाई आणली गेलीच की ! ह्या देशात अनेक प्रतिक्रांत्या झाल्या त्यातील पहिली शृंगांनी केली मोहम्मद कासिमने आक्रमण केले तेव्हाही सिंधच्या राजा दाहीरने वैदिक व्यवस्था आणून जाट लोकांनाही घोड्यावर बसण्याची बंदी घातली होती तेव्हा इतिहास साक्षी आहे कि ह्या देशात जेव्हा जेव्हा जागृती झोपायला गेली तेव्हा पाठीमागून वैदिकांनी एन्ट्री मारली आहे त्यामुळे जे जागृत आहेत त्यांनी जागरूक असणे आवश्यकच आहे
मुख्यमंत्री ब्राह्मण आहे म्हणून पेशवाई म्हणणे हा उलटचक्री जातीवाद झाला आणि माझा त्याला ठाम विरोध आहे हे तू जाणतोसच . संविधान बदलण्याची चर्चा करणे हेही मी समजू शकतो पण संविधानाला आंबेड्करस्मृती म्हणणे हा छुपा ब्राह्मण्यवाद झाला दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा संविधान बदलण्याची चर्चा करता तेव्हा तुम्ही कोणते संविधान आणणार ह्याचा ठाम आणि स्पष्ट मजकूर तुम्ही जाहीर करायला हवा नाहीतर ज्यांच्या पिढ्या वर्णव्यवस्थेच्या वरवंट्याखाली भरडल्या गेलेत त्यांना संशय येणारच . तुम्ही राजकारणात असाल तर संविधानावर तुम्ही फार जबाबदारीनं बोलायला हवं . भाजप नेते हे ह्यावर गांभीर्याने बोलत नाहीत किंवा मग त्यांना पाठीमागून
पेशवाई आणण्याची सुप्त आकांक्षा असावी . आता पेशवाई म्हणजे काय ? तर मराठ्यांच्या इतिहासाचे दोन टप्पे आहेत पहिला शैव जो पहिल्या बाजीरावापर्यंत सळसळत होता तर दुसरा निगम ज्याने पहिल्या बाजीरावानंतर आस्तेकदम प्रवेश करायला सुरवात केली आणि नंतर महारांना माधवराव पेशव्यानी फर्मान काढून विठ्ठल मंदिर प्रवेश नाकारून अंमलात आणला गेला आणि शेवटी झाडू बांधण्यापर्यंत मजल गेली . वर्णव्यवस्थेला सक्रिय पाठिंबा देणे म्हणजे पेशवाई !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा