बहुयथातथ्यवाद आणि एकजालवाद सत्य हे शब्दाबाहेर असते चिन्हाबाहेर असते त्यामुळे ते चिन्हांना प्राप्त होण्याची शक्यता नाही पण वास्तव मात्र चिन्हात आणता येते पण वास्तव आपणास संपूर्ण दिसत नाही त्यामुळे जे वास्तव दिसते ते तथ्य असते आणि आपण सर्व आपल्या आपल्या तथ्यांच्या आधारे बोलत असतो . मात्र ही सर्व तथ्ये एका वास्तवासंदर्भात आहेत ह्याची आपणाला कल्पना असते हे जे दिसणारे तथ्य असते तेही संपूर्णपणे चिन्हात व्यक्त होत नाही किंवा करता येत नाहीत त्यामुळे आपण सर्व आंशिक तथ्यांच्या आधारे एकमेकांशी बोलायला लागतो ह्यांना आपण यथातथ्ये म्हणतो फेसबुक हे यथातथ्यांचे भांडार म्हणून आपल्यापुढे सादर होत असते आणि ह्या यथातथ्यांच्या वरून आपण हमरीतुमरीवर येऊन भांडत असतो जे अनेकदा विनोदी वाटायला लागते . डिजिटल युगांचा इतिहास हा यथातथ्यांचा इतिहास असतो आणि तो अनेक आवाजात बोलत असतो आंबेडकरवादी आवाज हिंदुत्ववादी आवाज शैव आवाज आगमवादी आवाज असे अनेक आवाज सतत निनादत असतात आणि त्यातून प्रचंड मोठा कोलाहल निर्माण होत असतो हा कोलाहल अनेकदा कर्कश म्हणावा इतका वाढत जातो आणि कानात तेलासारखा खरखर सोडत राहतो अशावेळी...
पोस्ट्स
जानेवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
भीमा कोरेगाव संघर्ष श्रीधर तिळवे नाईक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भीमा कोरेगाव संघर्ष श्रीधर तिळवे नाईक भीमा कोरेगाव संघर्षातून दलित समाजाने चार गोष्टी जाहीर केलेत १ महार समाज हा पूर्वापार योद्धयांचा समाज राहिला आहे आणि त्याचा लडाकूपना अजूनही जिवंत आणि सळसळता आहे २ तो वर्णव्यवस्था मानत नाही आणि वर्णव्यवस्थेचा अंत घडवून आणणे हे त्याचे मिशन आहे तो वर्णव्यवस्था मानत नसल्यानेच अत्यंत आदराने त्याने छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे संस्कार केले वा करायला मदत केली ३ ह्या मिशनची सुरवात १८१८ साली पेशवाईचा अंत करताना झाली ह्या लढाईत तो इंग्रजांच्या बाजूने लढलो ह्याचा त्याला अभिमान आहे . जी लढाई इतरांच्यासाठी राजकीय होती ती त्यांच्यासाठी सामाजिक होती ४ जर नवी पेशवाई घेऊन कोणी येणार असेल तर तिचाही अंत केल्याशिवाय तो गप्प बसणार नाही ह्या वैचारिक चौकटीत आक्षेपार्ह काय आहे हे मला आजतागायत समजलेले नाही श्रीधर तिळवे नाईक संतोष पद्माकर , मिलिंद ही पोस्ट टाकताना मला दलित हाच शब्द वापरायचा होता पण पूर्वापार योद्धे असणे हे वैशिष्ट्य सर्व दलितांना लागू नाही दुसरी गोष्ट दुसऱ्या बाजीरावां विरुद्धच्या लढा...