बिग हाऊस इकॉनॉमी
मी अर्थशास्त्रावर दिलेल्या व्याख्यानांत भाजप सरकार अर्थशास्त्रातील ज्याला बिग हाऊस इकॉनॉमी म्हणतात ती आणत आहे असं प्रतिपादन केलं होतं सृष्टीय युगात भांडवलशाहीचा टप्पा घेऊन आलेली इकॉनॉमी प्रतिसृष्टीय युगात कार्पोरेटशाहीचा टप्पा घेऊन आली जो भांडवलशाहीपेक्षा पूर्ण वेगळा होता ह्या टप्प्यात १९६० नंतर आली बिग हाऊस इकॉनॉमी स्वतःच बिग हाऊस असलेल्या टीव्ही चॅनेलनी त्याचं समर्थन केलं ते समजण्यासारखं होत पण कार्पोरेटशाहीनं मांडलेल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे सोशल रिस्पॉन्सिबीलीटीचं काय ह्याची अजूनही चर्चा नाही त्यामुळेच १० लाख आदिवासींची केस नीट मांडणे आवश्यक होतं ते केलं गेलेलं नाही अलीकडं सरकार बहुतांशी केसेस का हरतं आहे ह्याचा सरकारनं खोलात जाऊन विचार करणं आवश्यक आहे ह्याबाबत काँग्रेस आणि भाजप दोघांचीही उदासीनता पूर्वीच्या बिटिश सरकारला जवळची आहे ब्रिटिशांना ह्या देशातला आदिवासी संपवायचाच होता त्यामुळे त्यांनी जे केलं त्याविरोधात संथाळ बंडापासून अनेक बंडे झाली आहेतच बहुदा आताही सरकार अशा बंडाची वाट पहात आहे . हे बरोबर नाहीये कारण १० लाख आदिवासींची जबाबदारी न घेता त्यानं अरबन आयुष्यात फेकणं तेह...