१ विकलांगतेची दहा वर्षे मोबाईल डाटात खिळून त्यांची डाटखिळी बसलेली अकरावं वर्ष दृढ कि विकलांग ? माहीत असूनही चालणारे पाय अपघाताकडे चालत गेले अन फ्लॅश सदुपयोग न होता वाया गेला तेव्हापासून फ्रॅक्चर झालेले हात सोसत बॉलिवूडमधल्या करिअरचा दि एन्ड सोसत शिवासोबत मोक्षाला सावली नसते मोक्ष झाड नसतो मोक्ष फक्त असतो भाषा विकलांग झालेली पाहिल्यावर शारीरिक विकलांगता वेळ जावा म्हणून विद्यापीठात सुरु केलेली लेक्चर्स जायबंदी हातांनी दिलेली कबुतरे उडतायत डोळ्यातून करुणेची दोन्ही कानांत कावळे टीनिट्स एकात पाऊस दुसऱ्यात शास्त्रीय गायकी डॉक्टर म्हणतायत कान उडून चाललेत मी म्हणतोय अनहद शिल्लक आहे २ ह्या देशात चालता न येणाऱ्या माणसाला रिस्पेक्ट नाही दुसऱ्या अपघातात पायबंदी माईलस्टोन मोजणं सोडून द्यावं का ? मी चालतोय खुरटत एकट्या माणसाला जायबंदी पाय झेपत नाहीत पण मला चॉईस कुठाय मी पेनकिलर घेऊन चालतोय मुंग्यावरही पाय पडणार नाही ह्याची काळजी घेत लोकांचे बसणारे धक्के दैन्य उघडे करणारे ट्रेनमध्ये चढणे दिवसेंदिवस कठीण होतंय आणि मुंबई ट्रेनशिवाय जगणे देत नाही उपजीविकेसाठी पळावं लाग
पोस्ट्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माननीय गजू तायडे साहेब , हे मी तुमच्यासाठी लिहीत नाही तर तुम्हाला लाईक करणाऱ्या लोकांसाठी लिहितोय मी तुमच्या अघोर वा नागा साधुंच्यावरच्या पोस्ट आणि चेष्टा वाचतो अभिव्यक्तिस्वातंत्र्य मला मान्य असल्याने मी आक्षेप घेत नाही पण दुसरी बाजू येणे आवश्यक असल्याने हे लिहितोय भगवान शंकरांनी जी ११४ तंत्रे दिली त्यातील एक तंत्र अघोर तंत्र आहे हे तंत्र शिव तत्वाची उपासना अघोर तत्व म्हणून करते व भगवान शंकराची साधना अघोरनाथ म्हणून करते ज्याला हे दिले गेले त्याला नंतर अघोरी म्हंटले गेले व हा नाग वंशी होता त्यामुळे साहजिकच नागांच्यात तो लोकप्रिय झाला आणि अनुयायांना नागा साधक म्हंटले गेले जे कालांतराने नागा साधू झाले ज्या माणसांच्या आयुष्यांना भीती आणि चिंता व्यापून आहे त्यांच्यासाठी हे तंत्र आहे घोर म्हणजे समग्र भय व चिंता व ह्या घोरापासून मुक्त होण्यासाठी करावयाची साधना म्हणजे अघोर साधना ! ही साधना करतात ते साधक ज्या साधकांना ह्या तंत्राद्वारे सविकल्प समाधी मिळते ते अघोर साधू होय आणि जे निर्विकल्प समाधीला उपलब्ध होतात ते अघोर नाथ वा अघोर सिद्ध होय ७ व्या शतकापर्यंत हे तंत्र नीट चालले होते कारण ते
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज संविधान दिन ! भारतीय पुरोगामीवादाचा त्यातील सुधारणावादी व रोमँटिक अशा दोन नवंतांनी उभ्या केलेल्या राजकीय आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यलढयांनी परंपरावादी शोषणग्रस्त व्यवस्थेवर मिळवलेल्या विजयाला अधिकृत कायदेशीर संहिता दिल्याचा हा दिवस ! भारतीय पुरोगामीवादाचे ज्यांना सर्वोच्च शिखर म्हणता येईल अशा बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिले ह्या संविधानाने पुरोगामीवादाच्या पायाभूत अशा दोन गोष्टी अधोरेखित केल्या पहिली सांसदीय लोकशाही ही राजकीय व्यवस्था व स्वातंत्र्य समता बंधुता ह्या तत्वांना बांधणारी मानणारी सामाजिक व्यवस्था व ही समता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण केली गेली आरक्षणव्यवस्था ! पुढे इंदिरा गांधींच्या काळात समाजवाद हीही आर्थिक व्यवस्था म्हणून स्वीकारली गेली प्रत्यक्षात मूळ अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था होती पण ती अंतिम म्हणून स्वीकारली गेली नाही १९६० सालानंतर जी साठोत्तरी समाजवादी पिढी उदयाला आली तिने भारतीय संविधानाला समाजवाद स्वीकारायला लावला आज आपण असं म्हणू शकतो कि १९७७ पर्यंत संविधानवाद हाच आता परंपरा म्हणून प्रस्थापितता म्हणून प्रस्थापित झाला ह्या संविधानाविरुद्ध दोन
RAHUL GANDHI CONGRESS लोकशाही समाजवाद , उदारमतवाद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकशाही समाजवाद , उदारमतवाद राहुल गांधी ह्यांची यात्रा श्रीधर तिळवे नाईक राहुल गांधी ह्यांची भारत जोडो यात्रा ही चर्चेचा विषय बनवण्यात आलीये किंवा बनलीये ह्याचे कारण विपक्षांकडे पंतप्रधानपदासाठी फक्त तीनच पर्याय आहेत १ केजरीवाल २ राहुल गांधी ३ शशी थरूर शरद पवार व नितीशकुमार ह्यांचे चान्सेस कमी आहेत म्हणून त्यांची नावे घेत नाहीये ह्यातील शशी थरूर ह्यांना गांधी परिवार कितपत संधी देईल हा प्रश्नच आहे कारण ह्या परिवाराला राहुललाच पीएमसाठी आणायचे आहे आणि ही यात्रा ह्या स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे राहुलचा निरागस चेहरा व निर्मळ हात मान्य करूनही त्यामागे राजकारण नाही असे समजणे हे राजकीय अक्कल रोमँटिक ढगात गेल्याचे लक्षण आहे राहुल गांधींनी पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करायला हरकत नाही पण ह्या प्रयत्नाला मास बेस देणे व घेणे गरजेचे आहे १९७७ नंतर निवडणूक हरल्यानंतरही इंदिरा गांधींनी आपला मास बेस तगडा असल्याचे सिद्ध करायला सुरवात केली होती राहुल गांधींना मास बेस आहे कि नाही हे चेक करण्यासाठी व दाखवण्यासाठी ही यात्रा आहे त्यामुळे शशी थरूर साईडलाईन काहीकाळ होतील पण त्यांनी ह्या यात्रेनंतर हा मास बेस
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मायग्रेशन व साईडइफेक्ट्स श्रीधर तिळवे नाईक भारतीय प्रबोधनाची सर्वात मोठी शोकांतिका जर कुठली असेल तर ती म्हणजे ते स्वकीयांशी खोलात जाऊन लढलेच नाही आणि ह्याचे कारण ब्रिटिश राजवट ! भारतीय प्रबोधनाची सगळी ताकत ब्रिटिशांशी लढण्यात खर्च पडली फुले आगरकर आंबेडकरांनी ब्रिटिशांशी लढायचे टाळले कारण त्यांना स्वकियांशी लढायचे होते त्यामुळे ब्रिटिशांना हाकलून देण्यात त्यांना फारसे स्वारस्य न्हवते ह्याउलट टिळक गांधी ह्यांना परकीयांशी लढायचे होते त्यामुळे स्वकीयांची युती आणि एकात्मता त्यांना महत्वाची वाटायला लागली हळूहळू ह्या देशातल्या ब्राम्हण व क्षत्रियांना नेमकं काय घडतंय ह्याचा अंदाज यायला लागला ब्रिटिश गेले तर पुढील लढाई ही आपल्याविरोधात लढली जाणार हे स्पष्ट झाले साहजिकच दोन पर्याय उरले आपल्या हितसंबंधांचा त्याग करणे नेहरूंच्यापासून अनेक कम्युनिस्टांपर्यंत अनेकांनी आपल्या हितसंबंधांचा त्याग केला मात्र ह्यांचे प्रमाण फक्त १० टक्के होते उरलेले ९० टक्के स्वातंत्र्योत्तर काळात आपले हितसंबंध कसे राखायचे ह्या दिशेने विचार करायला सुरवात केली काहीजण परदेशात गेले व जातांना त्यांची सारी संपत्ती सोबत घेऊ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विवेकानंद स्मृतीच्या निमित्ताने श्रीधर तिळवे नाईक चार जुलै ही स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी ह्या निमित्ताने विवेकानंद स्मृती येणार आहे ह्याची कल्पना होती खरेतर ती आधीच यायला हवी होती असो माझ्या गुरुस्थानी मला जे काही विचारवंत आहेत त्यात स्वामी विवेकानंद मला नेहमीच महत्वाचे वाटत आले आहेत साहजिकच ह्या ग्रंथाविषयी उत्सुकता होती भारतात आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली त्यातून एक प्रोटेस्टंट हिंदुधर्म जन्मणे प्रबोधनाच्या काळात अटळ होते आणि एक आयडियालॉजीही ! राजाराम मोहन रॉय ह्यांनी प्रथम हिंदुइजम HINDUISM ही टर्म कॉईन करून त्याची सुरवात केली आणि त्याला शह म्हणून दयानंद सरस्वती व विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी हिंदुत्ववाद आणला हिंदुवादाचा दुसरा टप्पा हा विवेकानंदानी मांडला आणि त्यात शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड ह्यांनी भर घातली ह्याला मी क्षात्र हिंदुवाद म्हणतो पुढे महात्मा गांधी ह्यांनी विश्य हिंदुवाद मांडला जो बहुजनांचा हिंदुवाद होता व त्याची बीजे स्वामी विवेकानंदांच्यात होती हिंदुधर्मात वेदांत हा आद्य मानला जातो व त्याची प्रस्थानत्रयी उपनिषदे(ह्यात गीतोपनिषदही जिला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
उद्धव ठाकरे ह्यांचा राजीनामा आणि पुढे श्रीधर तिळवे नाईक संन्याशाला सगळी घरं जशी सारखी तसे सगळे पक्षही सारखेच ! त्याची कमिटमेंट फक्त लोककल्याणाशी ! सिद्ध हा मोक्षाचे शरीर , द्वादशशीलता ही त्वचा , सभ्यता ही मोक्षाचा अलंकार असेल तर सुसंस्कृतपणा हा मोक्षाचा वाचा आहे उद्धव ठाकरे ह्यांची वाचा व वाणी ही माझ्या कायमच आदराचा विषय राहिली आहे आजचे त्यांचे भाषण हे सभ्य वाचेचे सुसंस्कृत सादरीकरण होते . वाचाळांच्या जगात हे अतिशय दुर्मिळ ! न्यायालयाचा निकाल , त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा व विधानपरिषदेचा राजीनामा हे सर्व अपेक्षित होते मात्र जाताना त्यांनी जनतेचे डोळे ओले केले हे निश्चित ! पुढची इलेक्शन भाजपला त्यामुळे जड जाणार हे निश्चित ! शेवटच्या बैठकीत त्यांच्यासोबत फक्त चारजण असावेत ह्या घटनेतून हा राजीनामा आलेला असावा अन्यथा फ्लोर टेस्टपर्यंत हे सर्व गेले असते अशोकरावांनी आम्ही बाहेरून पाठिंबा देतो हे केलेले सूतोवाच अखेरचे प्रयत्न होतं . आता प्रश्न असा कि भाजपशी युती झाल्यावर शिंदे सेना काय करणार ? अहंकार ही अशी गोष्ट आहे कि ती शिंदे ह्यांना मातोश्रीवर जाण्यापासून थांबवणार म्हणजेच शिंदेंना अहंकार