१ विकलांगतेची दहा वर्षे मोबाईल डाटात खिळून त्यांची डाटखिळी बसलेली अकरावं वर्ष दृढ कि विकलांग ? माहीत असूनही चालणारे पाय अपघाताकडे चालत गेले अन फ्लॅश सदुपयोग न होता वाया गेला तेव्हापासून फ्रॅक्चर झालेले हात सोसत बॉलिवूडमधल्या करिअरचा दि एन्ड सोसत शिवासोबत मोक्षाला सावली नसते मोक्ष झाड नसतो मोक्ष फक्त असतो भाषा विकलांग झालेली पाहिल्यावर शारीरिक विकलांगता वेळ जावा म्हणून विद्यापीठात सुरु केलेली लेक्चर्स जायबंदी हातांनी दिलेली कबुतरे उडतायत डोळ्यातून करुणेची दोन्ही कानांत कावळे टीनिट्स एकात पाऊस दुसऱ्यात शास्त्रीय गायकी डॉक्टर म्हणतायत कान उडून चाललेत मी म्हणतोय अनहद शिल्लक आहे २ ह्या देशात चालता न येणाऱ्या माणसाला रिस्पेक्ट नाही दुसऱ्या अपघातात पायबंदी माईलस्टोन मोजणं सोडून द्यावं का ? मी चालतोय खुरटत एकट्या माणसाला जायबंदी पाय झेपत नाहीत पण मला चॉईस कुठाय मी पेनकिलर घेऊन चालतोय मुंग्यावरही पाय पडणार नाही ह्याची ...
पोस्ट्स
एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माननीय गजू तायडे साहेब , हे मी तुमच्यासाठी लिहीत नाही तर तुम्हाला लाईक करणाऱ्या लोकांसाठी लिहितोय मी तुमच्या अघोर वा नागा साधुंच्यावरच्या पोस्ट आणि चेष्टा वाचतो अभिव्यक्तिस्वातंत्र्य मला मान्य असल्याने मी आक्षेप घेत नाही पण दुसरी बाजू येणे आवश्यक असल्याने हे लिहितोय भगवान शंकरांनी जी ११४ तंत्रे दिली त्यातील एक तंत्र अघोर तंत्र आहे हे तंत्र शिव तत्वाची उपासना अघोर तत्व म्हणून करते व भगवान शंकराची साधना अघोरनाथ म्हणून करते ज्याला हे दिले गेले त्याला नंतर अघोरी म्हंटले गेले व हा नाग वंशी होता त्यामुळे साहजिकच नागांच्यात तो लोकप्रिय झाला आणि अनुयायांना नागा साधक म्हंटले गेले जे कालांतराने नागा साधू झाले ज्या माणसांच्या आयुष्यांना भीती आणि चिंता व्यापून आहे त्यांच्यासाठी हे तंत्र आहे घोर म्हणजे समग्र भय व चिंता व ह्या घोरापासून मुक्त होण्यासाठी करावयाची साधना म्हणजे अघोर साधना ! ही साधना करतात ते साधक ज्या साधकांना ह्या तंत्राद्वारे सविकल्प समाधी मिळते ते अघोर साधू होय आणि जे निर्विकल्प समाधीला उपलब्ध होतात ते अघोर नाथ वा अघोर सिद्ध होय ७ व्या शतकापर्यंत हे तंत्...